खान्देशातील अक्षय्यतृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीचा मुक्तीदिनच. मुली महिलांचा आनंदोत्सव! एवढेच नव्हे तर लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपणसुद्धा. चैत्र वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था. – लतिका चौधरी, दोंडाईचा, जि.धुळे भारतीय सण, बोलीभाषा, रितीरिवाज, परंपरा ही स्वतंत्र सांस्कृतीक वैशिष्ट्ये जपून आहेत. त्यात अक्षय्यतृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाखशुद्ध तृतियेस साजरा केला जातो. याच दिवशी कृतयुग प्रारंभ होतो असे म्हणतात. या दिवशी , हा पवित्रदिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय…
Read MoreDay: April 8, 2018
महात्म्य अक्षय्य तृतीयेचे
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय्य या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे.) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया हे व्रत कसे…
Read Moreखान्देशातील दिवाळी – आखाजी (Akshaya Tritiya)
अक्षयतृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते. जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्य़ांच्या भूप्रदेशाला ‘खान्देश’ म्हणून ओळखले जाते. स्त्री वर्गाला माहेरची ओढ लावणारे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. त्यात विदर्भातील आखाडी, तर मराठवाडय़ातील नागपंचमी आणि खान्देशातील आखाजी या सणांचा समावेश करता येईल. खान्देशाची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहेत. – अेिशनी माजल-कर वैशाख शुद्ध तृतीयेला देशावर अक्षयतृतीया म्हटले जाते, त्यालाच खान्देशात आखाजी असे म्हणतात. याच…
Read Moreहयग्रीव अवतार
हयग्रीव म्हणजे घोड्याचे मस्तक. नृसिंहावतारात भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा नाश केला, अशी कथा आहे. हयग्रीवावताराची ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जनमेजयाला सांगितली ती अशी – भगवंतानी नुकतीच सृष्टी निर्माण केली होती. त्यानंतर लगेचच अगस्ती ऋषींना एक मोठा यज्ञ करावा असे वाटू लागले. त्यांनी सर्व ऋषींना एकत्र बोलावले. सर्वांनी मिळून यज्ञासाठी लागणारे हत्ती, उंट वगैरे प्राणी तसेच इतर सामग्री गोळा केली. पूर्णाहुती देण्यासाठी त्यांनी घोड्याचे मस्तक कापून बाजूला ठेवले. यज्ञाचे दुष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी ऋषींनी भगवंताकडे मदतीची याचना केली. ऋषींच्या विनंतीला मान देऊन भगवंत धनुष्यबाण घेऊन आले व यज्ञमंडपाच्या दाराशी उभे राहून रक्षण…
Read More