या अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटलं जातं. आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. अक्षय्य तृतीया हा सण सरत्या चैत्राचा आणि उगवत्या वैशाखाचा म्हणजेच संधीकाळाचा. चैत्रासंगे आलेल्या वसंत ऋतूचा हिरवा बहर अजूनही अगदी तजेलदार व रसरशीत असतो. शिशिराच्या थंडीनं गारठलेली सृष्टी पुन्हा नव्या उमदीनं वसंताचा म्हणजे हिरवाईचा शेला पांघरून चैत्र पालवीनं पुन्हा नव्या रूपात नवचैतन्याची आशा मन मोहरून टाकते. याच पार्श्वभूमीवर वैशाखाच्या सुरुवातीलाच ग्रीष्माला साद देत अक्षय्य तृतीया येते. हा दिवस खऱ्या अर्थानं वसंतोत्सवाचा. – सुगंधा मिसाळ   अक्षय्य तृतीया हा अक्षय्य सुखाची साठवण करण्याच्या प्रयत्नांना उत्तेजन देऊन सुखाची बरसात करणारा…

Read More

सौख्यसुखाची लयलूट

आपल्या आनंदाचं अक्षय धन उधळण्यासाठीचं निमित्त शोधत, प्रसंगी रितीरिवाजांचं बोट धरून हे सण-समारंभ येत असतात. अशाच अनेकानेक आनंदभरल्या मैफलीत अक्षय्य सुखाचं मधाळ बोट लावणारा हा अक्षय्य तृतीयेचा सण प्रत्येकाच्याच सुखेनैव आयुष्याला फुलवण्याचं काम करतो.  – मंजिरी कदम आपले धर्मग्रंथ, त्यातून ठळकपणे समोर येणारे नीतिनियम, परंपरा आणि चालीरिती हे सारं काही सर्वसामान्य लोकांच्या जीवन जगण्याच्या पारंपरिक पद्धतींशी संबंधित आहे. त्यातलाच एक भाग आहे साडेतीन मुहूर्तांचा. दसरा, दिवाळी पाडवा, चैत्र पाडवा आणि त्यामागून लगोलग येणारा अक्षयतृतीयेचा सण म्हणूनच आजही आपले महत्त्व राखून आहे. कोणतंही, कसलंही नवं काम वा चांगल्या कार्याची सुरुवात या…

Read More

मोरपंखी आठवणी आखाजीच्या

खान्देशातील अक्षय्यतृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीचा मुक्तीदिनच. मुली महिलांचा आनंदोत्सव! एवढेच नव्हे तर लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपणसुद्धा. चैत्र वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था. – लतिका चौधरी, दोंडाईचा, जि.धुळे भारतीय सण, बोलीभाषा, रितीरिवाज, परंपरा ही स्वतंत्र सांस्कृतीक वैशिष्ट्ये जपून आहेत. त्यात अक्षय्यतृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाखशुद्ध तृतियेस साजरा केला जातो. याच दिवशी कृतयुग प्रारंभ होतो असे म्हणतात. या दिवशी , हा पवित्रदिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय…

Read More

महात्म्य अक्षय्य तृतीयेचे

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय्य या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे.) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी  अक्षय्य तृतीया हे व्रत कसे…

Read More

खान्देशातील दिवाळी – आखाजी (Akshaya Tritiya)

अक्षयतृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते. जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्य़ांच्या भूप्रदेशाला ‘खान्देश’ म्हणून ओळखले जाते. स्त्री वर्गाला माहेरची ओढ लावणारे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. त्यात विदर्भातील आखाडी, तर मराठवाडय़ातील नागपंचमी आणि खान्देशातील आखाजी या सणांचा समावेश करता येईल. खान्देशाची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहेत. – अेिशनी माजल-कर वैशाख शुद्ध तृतीयेला देशावर अक्षयतृतीया म्हटले जाते, त्यालाच खान्देशात आखाजी असे म्हणतात. याच…

Read More

हयग्रीव अवतार

हयग्रीव म्हणजे घोड्याचे मस्तक. नृसिंहावतारात भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा नाश केला, अशी कथा आहे. हयग्रीवावताराची ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जनमेजयाला सांगितली ती अशी – भगवंतानी नुकतीच सृष्टी निर्माण केली होती. त्यानंतर लगेचच अगस्ती ऋषींना एक मोठा यज्ञ करावा असे वाटू लागले. त्यांनी सर्व ऋषींना एकत्र बोलावले. सर्वांनी मिळून यज्ञासाठी लागणारे हत्ती, उंट वगैरे प्राणी तसेच इतर सामग्री गोळा केली. पूर्णाहुती देण्यासाठी त्यांनी घोड्याचे मस्तक कापून बाजूला ठेवले. यज्ञाचे दुष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी ऋषींनी भगवंताकडे मदतीची याचना केली. ऋषींच्या विनंतीला मान देऊन भगवंत धनुष्यबाण घेऊन आले व यज्ञमंडपाच्या दाराशी उभे राहून रक्षण…

Read More

अक्षय्य तृतीयेचे भारतीय संस्कृतीमधील- महत्त्व

अक्षय तृतीया संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. या मुहूर्ताचे भारतीय संस्कृतीमधील महत्त्व आणि पारमार्थिक अर्थ उलगडणारा हा विशेष लेख.. – अनिता लिमये ‘जशी उसात हो साखर। तसा देहात हो ईशवर’ अशी एक गीतपंक्ती आहे. ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा’ असं संतश्रेष्ठ चोखामहाराज म्हणतात. तसंच अध्यात्माचं आहे. ते आपल्या सगळ्या आयुष्याला व्यापून आहे. साऱ्याच व्यवहारात, सणवारात, रूढी-परंपरांध्ये ते मिसळून गेलं आहे. ‘अध्यात्मविद्या विधानां’ असं भगवंत स्वत: भगवद्गीतेत विभूतियोग सांगताना म्हणतात. ‘जसे दुधामध्ये लोणी। तसे देही चक्रपाणि.’ तो सर्वगत असला तर गुप्त आहे. विरजण, मंथन या प्रक्रिया जशा लोण्यासाठी आवश्यक…

Read More

‘अक्षय्य’ सुखाचे दान

– विनय सारंग चैत्रमासाची चाहूल लागली की नवनिर्मितीचे, नवसृजनाचे कोंभ फुटून सरासरा वर येतात, घटकापळाचा आश्रय घेत असीम इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद यांच्या सोबतीने स्थिरावतात आणि पानगळीचं निमित्त करून पुन्हा अनंताच्या प्रवासाला निघतात. हा काळ अतिशय भारलेला आणि भारावलेला असतो. क्षितीजाची कड हाती येणार नाही हे माहीत असलं तरीही त्यामागे धावण्याचा जबर अट्टाहास असतो. या जीवनातली प्रत्येक गोष्ट शाश्वत आहे, अक्षय्य आहे, या बेफिकिरीने प्रत्येकजण अदृश्याची वाट चालत असतो. आपल्याला सुखसौख्याचं अक्षय्य वरदान लाभलं आहे या जाणिवेतून तो आपलं ‘आयुष्य’ जगत असतो. त्याच्या या जाणिवेला समृद्ध करत असतात ते सणासुदीचे…

Read More

अक्षय मूल्यांचा ठेवा!

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक  असलेला सण होय. यालाच ‘आखिती’ असेही  म्हणतात. रखरखत्या वैशाखात, क्षय न होणाऱ्या  सद्गुणांचा अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा  संगम या सणात आहे. उष्ण कोरड्या हवेचा  आणि रसाळ आम्रफळाचा आस्वाद देणारा  अक्षय तृतीयेचा दिवस.- अर्चना म. दळवी अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाण्याचा घट म्हणजेच जलकुंभ, आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती अक्षय तृतीयेलाच. आज विज्ञान तंत्रज्ञान युगात…

Read More