वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटलं जातं. आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. अक्षय्य तृतीया हा सण सरत्या चैत्राचा आणि उगवत्या वैशाखाचा म्हणजेच संधीकाळाचा. चैत्रासंगे आलेल्या वसंत ऋतूचा हिरवा बहर अजूनही अगदी तजेलदार व रसरशीत असतो. शिशिराच्या थंडीनं गारठलेली सृष्टी पुन्हा नव्या उमदीनं वसंताचा म्हणजे हिरवाईचा शेला पांघरून चैत्र पालवीनं पुन्हा नव्या रूपात नवचैतन्याची आशा मन मोहरून टाकते. याच पार्श्वभूमीवर वैशाखाच्या सुरुवातीलाच ग्रीष्माला साद देत अक्षय्य तृतीया येते. हा दिवस खऱ्या अर्थानं वसंतोत्सवाचा. – सुगंधा मिसाळ अक्षय्य तृतीया हा अक्षय्य सुखाची साठवण करण्याच्या प्रयत्नांना उत्तेजन देऊन सुखाची बरसात करणारा…
Read MoreDay: April 11, 2018
सौख्यसुखाची लयलूट
आपल्या आनंदाचं अक्षय धन उधळण्यासाठीचं निमित्त शोधत, प्रसंगी रितीरिवाजांचं बोट धरून हे सण-समारंभ येत असतात. अशाच अनेकानेक आनंदभरल्या मैफलीत अक्षय्य सुखाचं मधाळ बोट लावणारा हा अक्षय्य तृतीयेचा सण प्रत्येकाच्याच सुखेनैव आयुष्याला फुलवण्याचं काम करतो. – मंजिरी कदम आपले धर्मग्रंथ, त्यातून ठळकपणे समोर येणारे नीतिनियम, परंपरा आणि चालीरिती हे सारं काही सर्वसामान्य लोकांच्या जीवन जगण्याच्या पारंपरिक पद्धतींशी संबंधित आहे. त्यातलाच एक भाग आहे साडेतीन मुहूर्तांचा. दसरा, दिवाळी पाडवा, चैत्र पाडवा आणि त्यामागून लगोलग येणारा अक्षयतृतीयेचा सण म्हणूनच आजही आपले महत्त्व राखून आहे. कोणतंही, कसलंही नवं काम वा चांगल्या कार्याची सुरुवात या…
Read More