गुरू-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून याच परंपरेमुळे मानवी प्रतिभेचा परमोत्कर्ष झाला. आपल्या पूर्वजांनी जीवन समृद्ध- करणारी चिरंतन सूत्रे प्रस्थापित केली. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानात गुरूचे स्थान सर्वोपरि असून प्रत्यक्ष परमेश्वराहून श्रेष्ठ मानले जाते. काय आहे ही संकल्पना? गुरू हे असे तेज आहे की ते प्रगट होताच सारे संशय, सारा अंधार समाप्त होतो. गुरू वचनांचे अमृत प्राशन केल्यावर सर्व प्रकारची क्षुधा शांत होते. गुरू हा असा एक मृदंग आहे की ज्याचा स्वर उमटताच अनाहत ध्वनी ऐकू येतो. बासरी वाजू लागताच जसे मन तल्लीन होते, तसा निर्भेळ आनंद देणारे गुरूचे…
Read More