मोदींनी राजकारणाची व्याख्या कशी बदलली

भाजपने भारतीय राजकारणाची व्याख्या पूर्णपणे कशी बदलली आहे ते जर कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आजचा नरेंद्र मोदींचा वाराणसी लाईव्ह हा कार्यक्रम पाहावा. ‘‘हर हर महादेव’’ चा नाद आसमंतात घुमला आणि मोदीजींनी काशीविश्वनाथ कॉरिडॉर चा शुभारंभ केला. गंगेत स्नान केले आणि कालभैरवाचे दर्शन घेतले. आणि गंगामैयाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि रहिवाश्यानी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करणारे टि्वट केले.    

मोदींव्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी आपण स्वतः करत असलेल्या प्रार्थनेचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाईव्ह टेलिकास्ट (थेट प्रक्षेपण) केले नव्हते. भाजप सारखा हिंदुत्ववादी पक्षही धर्म आणि राजकारण यांची सांगड घालण्यात फार उत्साही नव्हता. जेवढा तो मोदींच्या काळात आहे. आता तुम्ही म्हणाल की मोदी स्वतः भोवती धार्मिक गूढ वलय तयार करत आहेत. पण हीच आयडियाची कल्पना काम करते हे तुम्ही नाकारू शकत नाही. काशीचा हा लाईव्ह टेलिकास्ट हा लवकरच येणाऱ्या यूपी मधील निवडणुकांसाठी केल्या जाणाऱ्या प्रचाराचा एक भाग आहे. आणि हे केल्यामुळे मते जास्त मिळतील असा विश्वास भाजपला आहे.  

नरेंद्र मोदी कालभैरवाची आरती करताना.

आता काही जण म्हणतील की एवढा तामझाम करायची काय गरज होती. तर उद्देश हाच की पुढील काळात इतर राजकीय पक्षांनी असेच करावे. अखिलेश यादव यांचे म्हणणे आहे की काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे श्रेय त्यांच्या पक्षाचे आहे. या प्रोजेक्टला त्यांच्या सरकारने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्या आधी अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टी (आप) ने दिल्ली अयोध्या यात्रा पूर्ण केली. ज्यात मोदींसारख्या दिसणाऱ्या कोणा एका संताची तसबीर होती. मोदींच्या काशी दौऱ्याच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी एका सभेत हिंदू धर्म किती महान आहे हे सांगितले. ममता बॅनर्जी देखील त्यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान हिंदुत्वाचे गोडवे गात होत्या. मोदींनी या मधून एवढे मोठे उदाहरण समोर ठेवले आहे की सर्व पक्ष जे भाजपच्या हिंदुत्वाच्या कल्पनेविरोधात होते ते आता स्वतः हिंदू धर्माचा प्रचार करताना दिसतात.

याचे एक कारण हे असेल की कुठेतरी त्यांना आपण हिंदू विरोधी म्हणून ओळखले जाऊ की काय अशी भीती वाटत असावी. काँग्रेस पक्षाच्या आपसातील मतदानावरून असे कळले आहे की मतदारांनी त्यांना हिंदूंची पर्वा न करणारा आणि मुसलमानांचे समर्थन करणारा पक्ष म्हणाले आहे. काँग्रेस हिंदूंचे समर्थन करत नाही हा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे स्वतः सोनिया गांधींनी म्हणाले आहे. काँग्रेस हिंदू विरोधी नाही तर हिंदूंच्या बाजूनी आहे हे दाखवून देण्यासाठी भाजपनेच काँग्रेस पक्षाची इमेज धुळीला मिळवली असा जो उलट प्रचार काँग्रेस वाले करत आहेत ती खेळी आहे. खरे तर असे काहीच नाही. गेल्या निवडणुकीत आपने मुस्लिमांची मते घेतली होती पण आता हिंदूंनाही मतांसाठी अपिल करावे असे केजरीवाल याना वाटत आहे.

दुसरे मुख्य कारण म्हणजे बरेचसे विरोधी पक्ष नेते जे हिंदुत्वाची कास धरून आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मते जिंकण्यासाठी हिंदू धर्माच्या मुद्द्यावरून राजकारण केले जात आहे किंवा हिंदू धर्माचा आधार घेतला जात आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. आणि त्यामुळेच हिंदूंकडून मते मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांमुळे ते संतापले आहेत. खाजगीत ते अनेकदा राजकीय हिंदुत्व आणि धार्मिक हिंदुत्व यावरून बोलत असतात.अलीकडे राहुल गांधीनी हिंदुत्व आणि हिंदू धर्म यातील फरक सांगून लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी पक्षाच्या सभेत जाहीरपणे सांगितले. आणि काल राजस्थानमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी हा फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. गांधीजी हिंदू होते पण त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होता असे ते म्हणाले. हा फरक बरोबर आहे पण तोच मुद्दा लावून धरण्याची काही गरज नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा तुम्ही राजकीय सभेत मुद्दा समजावून देण्याचा प्रयत्न करता तेव्हा मतदारांना खरंच तो समजतो का?

त्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया वर काँग्रेस समर्थकांचे म्हणणे होते की हिंदुत्ववादी हा शब्द गुंतागुंतीचा आहे. राहुलजी फक्त ‘संघी’ म्हणू शकले नसते का? दुसरी मेख अशी आहे की तुम्ही जर हिंदुत्वावर टीका करणार असाल तर तुम्ही हिंदुविरोधी आहेत असे न दाखवता तुम्हाला हिंदुत्वाचे समर्थन करावे लागेल. त्यामुळे तुम्ही स्वतः हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होण्याचा धोका आहे. पण भाजपकडून हिंदुत्वाविषयी बरेच काही शिकण्यासारखे आहे असे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. यावरून असे दिसते की जोपर्यंत इतर पक्ष हिंदुत्व विरोधात बोलत नाहीत तोपर्यंत भाजपचे हिंदुत्व अभियान चालू राहील. पण प्रत्येक पक्षाने हिंदू धर्म आणि परंपरांचा मान राखला तर भाजपला हिंदूंची काळजी घेणारा एकमेव पक्ष हे बिरुद मिरवावे लागणार नाही कारण तेव्हा लोकांकडे अनेक पर्याय असतील . 

या विधानांमध्ये काही तथ्य आहे पण धोकाही आहे. हिंदुत्व म्हणजे केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार करणे नव्हे आधुनिक राजकारणानुसार हा मुस्लिम विरोधी पाया असू शकतो. मोदीजी त्यांच्या भाषणातून याचा उल्लेख करत नसतीलही पण योगी आदित्य नाथ आणि इतर भाजप नेत्यांच्या भाषणातून तुम्हाला हा उल्लेख वारंवार ऐकायला मिळतो. प्राचीन धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर किती मते मागावीत याला काही मर्यादा आहेत. पण दुर्दैवाने जातीचे हिंदू मुस्लिम धर्मावरून जातीचे राजकारण खेळून तुम्ही जिंकू शकणाऱ्या मतांना मर्यादा नाहीत. विरोधी पक्ष जेव्हा अचानक हिंदुत्वाचे गुणगान गाऊ लागतात. आणि अशा वेळी जेव्हा भारतातील सर्वात मोठा अल्पसंख्याक धोक्यात आहे. तेव्हा त्यांची बाजू घ्यायची सोडून सर्वच पक्ष हिंदुत्वाचा जप करतात तेव्हा आपल्याला हा गोंधळ लक्षात येतो. आश्चर्याची गोष्ट अशी की हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये तेढ निर्माण झालेली असताना भाजपने एकहाती जास्त मते मिळवली आहेत. जेव्हा जातीवरून तंटे सुरु होतात तेव्हा तुम्ही काय करता? या प्रश्नावर हिंदू धर्माबाबत थोडाफार सॉफ्टकॉर्नर असणाऱ्या सर्व पक्षांची बोलती बंद होते.

हिंदूंकडे असलेल्या सर्व धर्माना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या परंपरेबद्दल (शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये असलेला मदारी मेहतर हा त्यांचा सेवक मुसलमान होता) बोलून तुम्ही त्यांची मते मिळवू शकत नाही. मग तुम्ही तुमचे हे म्हणणे मागे घेऊन पुन्हा एकदा अल्पसंख्यांकांच्या आणि सर्वधर्म समभावाच्या बाजूने उभे राहाल का? भाजपला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर फक्त केंद्र सरकार करत असलेल्या गोष्टींवर अवलंबून राहून चालणार नाही. जिंकण्यासाठी त्यांना वेगळे काहीतरी करावे लागेल. त्यांना हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्याला हात घालावा लागेल. जिथे बाहेरच्यांपासून हिंदूंचे रक्षण करणारा एकमेव पक्ष अशी भाजपची ओळख होती. विरोधी पक्ष हिंदुत्वाचे गुणगान करू शकतात पण भाजप इतके नाही. पण हेही तितकेच खरे की हिंदूंचा विरोध करून हिंदूंच्याच राज्यात ते निवडणुका जिंकू शकत नाहीत. एक प्रकारे मोदीजींनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली आहे. ज्याचा पुढे जाऊन भाजपलाच फायदा होईल.

Related posts

Leave a Comment