गोळा नका करू !!! तुकडे करा….त्याचे !!!!

ब्रिटीशांनी अत्यंत हुशारीने ज्या व्यवस्था आपल्या देशावर लादल्या आहेत. त्यामध्ये न्यायव्यवस्था ही एक व्यवस्था आहे. भारतीय लोक मुळात चोर, दरोडेखोर आहेत त्यांना आम्ही आमच्या कायद्याच्या चौकटीत कसा न्याय देतो हे दाखवून कठोर शासन करायचे होते. तीच आजची आपली न्याय रचना आहे. रांझ्याच्या पाटलाने कुकर्म केले हे लक्षात येताच छत्रपती शिवाजी राजांनी त्याचा तात्काळ चौरंग (दोन्ही हातपाय तोडणे) करण्याचा आदेश दिला आणि पुढे स्वराज्यात असे कृत्य घडल्याचा दाखला नाही. कारण एखादे वाईट कृत्य घडल्या नंतर शासनकर्त्यावरचा आणि न्यायावरचा विश्वास टिकवायचा असेल आणि समाजात योग्य संदेश जायचा असेल तर न्यायपद्धती विलक्षण गतिमान असावी लागते. 
 
  
 
जर आफताब स्वत:हून सांगतो आहे की मी गुन्हा केला आहे आणि परिस्थितिजन्य पुराव्यात ते सिद्ध होते आहे तरीही पोलिस जंगलभर त्या दुर्दैवी कन्येच्या शरीराचे तुकडे गोळा करत फिरत आहेत. काल झारखंड येथे असेच कृत्य करणार्‍या दिलदार कबाडेवाल्याच्या बाबतीत हेच करत बसणार मग त्या मुलींना न्याय कधी मिळणार. ब्रिटीशांनी जो नालायकपणा केला आहे तोच आपण पुढे नेत आहोत. एखाद्या क्रांतिकारकाला शिक्षा देतांना त्यांनी साळसूदपणाचा आव आणून बघा आम्ही कसा सर्व बाजुने विचार करून, चौकशी करून, शोध घेवून खर्‍या गुन्हेगाराला शिक्षा देत आहोत याचा देखावा उभा केला आणि शेवटी जे करायचे तेच केले. आपणही त्याचाच कित्ता गिरवीत आहोत. फक्त त्यांनी शिक्षा दिल्या आपण वेळकाढूपणा करतो आहोत.  
 
एखाद्या प्रकरणात गुन्हेगार सापडतच नसेल तर सर्व प्रक्रिया जरूर पार पाडावी. पण एकदा का गुन्हेगार सापडला आणि सर्व धागे जुळले तर त्याच्यावर खटले, तारीख पे तारीख कशासाठी ? शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकही निर्दोष फासावर लटकायला नको. ही आदर्श स्थिति ठीक आहे. पण जेंव्हा गुन्हा करणारा कुठल्या जातीचा, धर्माचा यावर दिशाभूल सुरू होते ना तिथे न्यायाचा स्तर खालवलेला असतो हे निश्चित. काही दिवसांपूर्वी कुठल्याशा तज्ञाचे विचार ऐकायला मिळाले. त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. खून या गुन्ह्याच्या प्रकाराला 302 हे एकमेव शिक्षेचे कलम आहे. पण खुनाचे अनेक प्रकार आहेत. त्याची पद्धती, प्रकार, हेतु वेगवेगळे आहेत. राजकीय खुनापासून ते स्वसंरक्षणासाठी केलेला खून या करता न्यायाची आणि शिक्षेची तरतूदही वेगवेगळी असली पाहिजे. 
 
 
आता केंव्हातरी श्रद्धा वालकरचा खटला कोर्टात उभा राहील. त्याच्यावर सवाल जबाब होतील. कधीतरी त्याला शिक्षा होईल. होईलच असे आज सांगता येणार नाही. पुढची वीस पंचवीस वर्ष निघून जातील आणि तिच्या क्रूर खुनाची तीव्रता कमी होऊन गेलेली असेल. तो पर्यन्त अनेक श्रद्धा वालकर बळी पडलेल्या असतील. 
 
आजतागायत प्रिया सोनी – एजाज अहमद, प्राची – वासीम, मानसी दिक्षित – सैयद मुजम्मिल, अंकिता सिंग- शाहरुख, निकिता तोमर- तौसिफ अहमद, अंजली आर्य- मोहम्मद यामिन, नितू-लईक खान, प्रिया आणि कशिष- शमशाद, तनिष्का शर्मा – साहिल, नैना कौर- शेरखान, शिवानी-आरीफ खान, दिक्षा मिश्रा-इमरान, बबली राणा-शाहजाद, वर्षा चौहान-वारीस, एकता देशवाल-शाकिब, खुशी परिहार-अशरफ, अंकिता- रिजवान, हीना तलरेजा-आदनान. यांच्या खटल्याचे काय झाले हे कुणाला माहिती नाही. कारण काळ जसजसा पुढे जातो तशी त्याची तीव्रता कमी होत जाते. लोकांचा त्या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो. 
 
राजकारणी लोकांच्या दृष्टीने अशी वेळकाढू व्यवस्था बरी असते. कारण त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सोय होऊन जाते. म्हणून गेल्या सत्तर, बहात्तर वर्षात राजकारणी लोकांना शिक्षा झाली असे चित्र नाही. काही प्रकरणात ते जेल मध्ये गेले पण नंतर निर्दोष सुटले आणि पुन्हा सन्मानाने सक्रिय झाले.
 
 
केंव्हातरी तपास रचना लावली गेली ती त्या काळाची गरज असावी. आजही तीच पद्धत त्याच रटाळ पद्धतींनी वापरली जाते. काही वर्षापूर्वी पोलिस स्टेशन (नगर) मध्ये जाण्याचा प्रसंग आला होता. तिथे असलेल्या एका पोलिसाने आपल्या दिलेल्या कामाचा रिपोर्ट तयार करून तो साहेबांच्या टेबलवर ठेवला. अहवालात खाली ‘हुहुचीपूपु केली’ हा शब्द लिहिला होता. मला त्या शब्दाची उत्सुकता वाटली म्हणून त्याला विचारले तर त्याने सांगितले की ‘हुजूर हुकूमाची पूर्ण पुर्तता केली’ असे आहे. 
 
साहेबी वर्चस्ववादी कायदा आणि ती राबवणारी यंत्रणा याचे मुळातून चिंतन होऊन कालानुरूप बदल होणे अपेक्षित आहे. त्यातील बदलाची वर्तमान सामाजिक स्थितीची सांगड घातली गेली पाहिजे. धर्म, जात, वर्ग, प्रांत याच्या पलीकडे जावून न्यायाची बुज राखली गेली पाहिजे. कायद्याचा आणि कायदा राखणार्‍यांचा धाक टिकवून ठेवायचा असेल तर विकृत आणि क्रूर गुन्हेगाराला विनाविलंब तितकीच कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. तिथे कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही पाहिजे. 
 
तर आणि तरच ….. “देहांत प्रायश्चिताशिवाय दूसरा पर्याय नाही” अशी खणखणीत निर्भय आज्ञा देवून ती आमलात आणणारे न्यायपीठ उदयास येईल. अन्यथा न्यायाच्या प्रतीक्षेत असंख्य श्रद्धांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यात देशाचा वेळ खर्च होत राहील.
 
सुहास वैद्य
9922915254

Related posts

Leave a Comment