युथ काँग्रेस अजमेर (राजस्थान) चा प्रमुख फारूक चिस्ती याने सोफीया उच्च माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचे अश्लील फोटो काढले होते. आणि त्या मुलीला धमकावले होते की जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो ते फोटो लोकांना दाखवेल. त्याची मागणी होती की फारूकला आणि त्याच्या टोळीला त्या मुलीने आणखी मुलींची ओळख करून द्यावी. आणि तसेच झाले. आणि मग सुरु झाली अजमेर मधील सामूहिक बलात्कारांची मालिका.
या सगळ्यामध्ये एक गोष्ट सामायिक होती. ती म्हणजे बलात्कार करणारे मुस्लिम होते. आणि त्यांना बळी पडणाऱ्या होत्या हिंदू मुली. हळू हळू पीडित मुलींची संख्या १०० हुन अधिक झाली. अंदाजे १००० तरी झालीच. या सगळ्या प्रकरणाला बळी पडणाऱ्या मुली या ११ वर्ष ते २० वर्ष वयोगटातील तरुण मुली होत्या. बलात्कार करणे आणि त्यांचे फोटो काढून पसरवणे म्हणजे पीडित आणखी मुली घेऊन येतील असा हा सगळा प्रकार होता. बरेचसे बलात्कार हे शेतातील घरात झालेले होते.
हा खटला अत्यंत भीतीदायक आणि दुर्दैवी होता. मुख्य म्हणजे गुन्हा करणाऱ्या व्यक्तीकडे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पाठबळ होते. फारूक आणि नफीस हे युथ काँग्रेसचे नेते होते. आणि तिसरा अन्वर हा काँग्रेसचा सहसचिव होता. या तिघांना राजकीय पाठबळ होते. त्याच्या जोरावर यांनी बलात्कार करून झाल्यावर पीडितांच्या कुटुंबीयांची छळवणूक केली. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय भयंकर घाबरले. त्यापैकी काही जणांनीच पोलिसात
तक्रार करण्याचे धाडस दाखवले. बाकीच्यांनी मृत्यूला जवळ केले. नंतर परिस्थिती इतकी वाईट झाली की पीडितांना उगाच न्याय मागण्याच्या भानगडीत पडलो, त्यापेक्षा जीव दिला असता तर बरे झाले असते असे वाटायला लागले.
जेव्हा आपल्याला पोलिसांची सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच नेमके ते कुचकामी ठरतात. इथेही तेच झाले. या तिघांचा दराराच एवढा होता की पोलिसही त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला घाबरायचे. असेच एक वर्ष सरले. मुलींची अब्रू वेशीवर टांगणारे मोकाट होते. अन्यायाची मालिका सुरूच होती. पण त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला कोणी पुढे येत नव्हते. मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या येतच होत्या. पण स्थानिक पोलीस राजकारण्यांची हाजी हाजी करण्यातच धन्यता मानत होते. अखेर एक माणूस असा होताच जो या सगळ्याविरुद्ध उभा राहिला. स्थानिक नियतकालिक ’नवज्योती’ चे संपादक श्री दीनबंधू चौधरी. हा खटला पुन्हा सुरु व्हावा यासाठीचे त्यांचे सर्व सुरु असलेले प्रयत्न निष्फळ ठरत होते. कारण पोलीस जाणूनबुजून गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करत होते.
अखेर अटकसत्र तेव्हा सुरु झाले जेव्हा दीनबंधूंनी त्यांच्या नियतकालिकातून पोलिसांवरच अग्रलेख लिहिला. गुन्हेगारांनी स्वतःच काढलेले गुन्ह्यांचे फोटो हा सर्वात मोठा पुरावा होता. यातील काही फोटो लोकांसमोर आले होते. एक वर्ष या सगळ्याकडे दुर्लक्ष केल्यावर पोलिसांनी पहिला एफआयआर आठ जणांविरुद्ध नोंदवला. तपासाअंती या अन्यायाच्या मालिकेत एकूण अठरा जण सामील असल्याचे स्पष्ट झाले.
लोक न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यावेळचे डीजीपी म्हणाले होते की काही जण गुन्हेगार बरेवाईट करतील या भीतीने न्याय मागायला पुढे आले नाहीत. तर काही कायद्याच्या विरोधात गेले. फारूक, नफीस, सलीम, सोहेल, अन्वर, इशरत अली शमसुद्दीन हे बलात्कारी टोळीतील प्रमुख होते. १८ जणांना न्यायालयासमोर सादर करण्यात आले. पैकी आठ जणांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. पण फारूकला २०१३ साली सोडण्यात आले. २० वर्ष सलीम चिस्ती फरार होता. त्याला २०१२ मध्ये अटक करण्यात आली. सोहेल चिस्तीने २६ वर्षांनंतर शरणागती पत्करली. आणखी एक आरोपी अलमास अजूनही फरार आहे .