लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष GMC बालयोगी ते आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांच्यापर्यंत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात गेल्या काही दशकांमध्ये देशातील अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.

१६ डिसेंबर १९७८ रोजी जनरल बिपीन रावत तरुण सेकंड लेफ्टनंट म्हणून. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल LS रावत (तत्कालीन ब्रिगेडियर)
बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर जवळ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात अपघाती मृत्यू झाला. अशा प्रकारचा अपघात २२ नोव्हेंबर १९६३ रोजी सशस्त्र दलाच्या वरिष्ठ जवानांच्या बाबतीत झाला होता. लेफ्टनंट जनरल दौलत सिंग एअर वाईस मार्शल EW पिंटो, लेफ्टनंट जनरल विक्रम सिंगमे जर जनरल KND नानावटी, ब्रिगेडियर जनरल SR ओबेराय, फ्लाईट लेफ्टनंट SS सोधी यांना घेऊन जाणारे चेतक हेलिकॉप्टर जम्मू क्षेत्रातील पूंछ जिल्ह्याजवळ कोसळले.
२ फेब्रुवारी २०१५ ला ते लेफ्टनंट जनरल असताना रावत यांना घेऊन जाणाऱ्या चित्ता हेलिकॉप्टर ने नागालँडच्या दिमापूर जिल्ह्यातील रंगापहार येथील हेलिपॅड वरून उड्डाण केल्यावर काही सेकंदात पेट घेतला होता तेव्हा ते थोडक्यात वाचले होते. हेलिकॉप्टर अपघातात अनेक राजकारण्यांचाही मृत्यू झाला आहे.

२ सप्टेंबर २००९ रोजी हैदराबादहून उड्डाण केल्यावर तासाभराच्या आतच आंध्रप्रदेशातील कर्नल पासून पूर्वेकडे सुमारे ४९ मैल (७९किलोमीटर) अंतरावर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात रेड्डी आणि इतर चार जण ठार झाले होते. ३ मार्च २००२ रोजी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथून बालयोगी यांना घेऊन जाणारे खाजगी हेलिकॉप्टर आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूर जवळ तलावात कोसळल्याने बालयोगी यांचा मृत्यू ओढवला. ३० एप्रिल २०११ रोजी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू आणि इतर चार जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.हे हेलिकॉप्टर त्यांना तवांगहुन इटानगरला घेऊन जात असताना राज्याच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात कोसळले.

३१ मार्च २००५ रोजी हरियाणाचे कृषिमंत्री सुरेंदर सिंग आणि ऊर्जा मंत्री ओ पी जिंदाल जे प्रसिद्ध उद्योगपती होते. या दोघांचा उत्तर प्रदेशातील साहारणपूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. मेघालायचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा आणि बाकी ९ जण पवन हंसच्या हेलिकॉप्टरने २२ जानेवारी २००४ला शिलॉँगला जात असताना राज्याच्या राजधानी जवळ २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बारापानी तलावाजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मरण पावले.
८ मे २००१ रोजी झालेल्या एका अपघातात अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री डेरा नातूंग पवन हंसच्या हेलिकॉप्टरने इटानगरहून वेस्ट कामेंगला जात असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळून नातूंग यांचा मृत्यू झाला होता. १४ नोव्हेंबर १९९७ रोजी अरुणाचल प्रदेशातील बर्फाच्छादित हिमशिखरांवर भारतीय हवाई दलाचे (IAF)
हेलिकॉप्टर कोसळून संरक्षण राज्यमंत्री N V N सोमू यांचा मृत्यू झाला होता.
