नौदलातील उठावामुळे भारताला लवकर स्वातंत्र्य मिळाले.

भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना जेवढा आदर मिळायला हवा तेवढाच आदर भारतीय नौदलाच्या सैनिकांना मिळायला हवा. १८ फेब्रुवारी १९४६ हा दिवस २६ जानेवारी इतकाच महत्वाचा आहे. कारण त्या दिवशी सगळंच बदललं. भारतीय नौदलात भरती झालेले सगळेच त्यावेळी तरुण होते. जेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीतच दुसरे महायुद्ध संपवून सेना परतली तेव्हा ब्रिटिशांच्या कचाट्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने बोस बाबूंच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याची हकीकत तेव्हा कर्णोपकर्णी झाली होती. साहजिकच जे तरुण नौदलात नुकतेच भरती झाले होते त्यांना यामुळे प्रेरणा मिळाली. त्यांना नौदलात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि जो भेदभाव त्यांच्यात केला जात होता त्याबद्दल त्यांच्या मनात चीड होती. ब्रिटिशांच्या खोट्या आश्वासनांना भुलून काही तरुण भरती झाले होते. 

१९४६ साली २०,००० नौसैनिकांनी उठाव केला. २ दिवसांच्या आत त्यांनी ७३ जहाजे आणि २१ किनाऱ्यालगतच्या मालमत्तांवर कब्जा केला. आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक काढून त्याजागी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि कम्युनिस्टांचा झेंडा लावला. ब्रिटिशांना हे पक्के माहित होते की सर्व दलांनी उठाव केला तर भारतावरची त्यांची पकड सैल होईल. म्हणूनच इंग्लंड सरकारने सत्ता भारताच्या हाती सोपवण्यासाठीच्या विविध पद्धतींवर चर्चा करण्यासाठी समिती नेमली. आणि लवकरात लवकर भारताला स्वतंत्र्य करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या. तरीसुद्धा स्वातंत्र्य लढ्याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा १९४६ साली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नौदलानेही उठाव केला हे फार कमी लोकांना माहित असते. 

श्री प्रमोद कपूर लिखित भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एवढा महत्वाचा अध्याय का विस्मरणात गेला? त्यांच्या Last War Of Independence -1946 Royal Indian Navy Mutiny (1946 नौदलाचा उठाव ः भारताचे अखेरचे स्वातंत्र्य युद्ध ) या पुस्तकामुळे हा लढा जनमानसापर्यंत पोहोचेल.

१९४६ च्या नौदल उठावाबद्दल तुमच्या मनात कुतूहल कसं निर्माण झालं? आणि त्याबद्दल आताच काही लिहावं असं तुम्ही का ठरवलं?

जेव्हा मी २०१७ मध्ये महात्मा गांधींचं चरित्र लिहीत होतो, तेव्हा त्यांच्या कामाबद्दल १०० हुन अधिक  पुस्तकात मी वाचलं. मला वाटत ९० व्या पुस्तकात १९४६च्या सुरुवातीच्या काळाच वर्णन केल होतं. तिथे मला भारतीय नौदलाने केलेल्या उठावाचा उल्लेख सापडला. त्यात महात्मा गांधी आणि अरुण असफ अली (ज्यांनी ९ऑगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदानावर भारत छोडो अभियाना दरम्यान मुंबईचा झेंडा फडकवला होता.) यांच्यातील संभाषणाचा काही भाग लिहिला होता. त्यावेळी सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते. सरदार पटेलांनी गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं ‘महात्माजी मी नेहरूंना मुंबईस न जाण्याचा सल्ला दिला. कारण ते जर मुंबईस गेले तर तेथील परिस्थिती आणखी चिघळू शकते.’

आश्चर्याची गोष्ट तर पुढेच आहे ज्या रेटिंग्स नी (खलाशांना त्या काळात रेटिंग्स म्हणाले जायचे) त्यावेळी बंड केले ते १५ ते २४ वयोगटातील होते. त्यांच्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नॅशनल आर्मीचा प्रभाव होता. INA पूर्वेकडील राज्यात असं काय करत होती जे एवढं प्रभावी होतं? त्यावेळी वातावरणच तसं होतं जे नौदलात भरती झाले होते त्यांना ‘तू अजूनही ब्रिटिशांच्या पगारावर जगतोस.. अरे तिकडे INA बघ त्यांनी सर्वाना हरवलं आणि ते मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत असे हिणवले जाई. १९३९ साली जेव्हा दुसरं महायुद्ध सुरु झालं त्यावेळी भारतात मोठ्या प्रमाणावर नौदलात खलाशांची भरती सुरु झाली. खलाशांची संख्या २०००- ३००० वरून ३०,००० वर गेली. ब्रिटिशांनी लोकांनी सैन्यदलात भरती व्हावं म्हणून जाहिरात दिली.’ सैन्यदलात भरती व्हा तुमचं आयुष्य बदलेल’ अशी आश्वासन दिली गेली. ही खोटी आश्वासनच पुढे उठावाला कारणीभूत झाली.

जे भरती होत होते ते गरीब आणि गावाकडून आलेले होते. अशांची सैन्यदलात आणि नौदलात पटापट भरती करण्यात आली. पण लवकरच त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. अन्न अतिशय वाईट दर्जाचे होते. १० लोकांसाठी असलेल्या खोलीत २० लोकांना कोंबून भरले जायचे. फिरंगी खलाशांना मात्र अशा कोणत्याच समस्यांचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे भारतीय खलाशांनी उठाव केला. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे गांधीजींनी ८ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो मोहिमेत दिलेला ‘करो या मरो’ चा नारा. श्री. अच्युत पटवर्धन (१९४७ मध्ये सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली) मिनू मसानी (स्वतंत्रता पार्टीचे प्रमुख) जी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सी. राजगोपालाचारी भारताच्या शेवटच्या गव्हर्नरनी स्थापन केली) श्री. जयप्रकाश नारायण सोशालिस्ट पार्टीचे नेते आणि १९७५च्या आणीबाणीत इंदिरा गांधींबद्दल ज्यांनी आवाज उठवला ते) या सगळ्यांना अटक झाली.

तर काहीजण भूमिगत झाले. जिंजर ग्रुप संस्थेतील एक अनौपचारिक गट जो या सगळ्याची दिशा ठरवत होता. डाव्यांचा गट.  त्यांचा गांधीजींच्या कार्यपद्धतीवर विश्वास नव्हता. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळू शकणार नाही असे त्यांना वाटे. हे लोक जहाल मतवादी होते. याच काळात अरुणा असफ अली सुद्धा भूमिगत झाल्या. त्यांच्या मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्यांना खूप काही सहन करावे लागले. त्या १९४५च्या मध्यात तेव्हाच परत आल्या जेव्हा गांधीजींनी त्यांना बोलावलं. लवकरच त्यांचा सैन्यदलातील काही लोकांशी संबंध आला पहिल्यांदा त्यांची भेट श्री. पी. एन. नायर आणि कुसुम या जोडप्याशी झाली मारिन ड्राइव्हला त्यांच्या बंगल्यावर. बंडाचे बीज तिथेच रुजले.

तरुण खलाशी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी इतर लोकांची भाषणे ऐकायला येत. इंडियन पीपल थिएटर असोसिएशनचे सदस्य श्री सलील चौधरी, ख्वाजा अहमद अब्बास आणि श्री पृथ्वीराज कपूर पाठिंबा दर्शवायला येत. १ डिसेंबर १९४५ हा दिवस तेव्हा ब्रिटिश नौदल दिवस म्हणून साजरा केला जाई. त्यादिवशी मुंबईतील सर्व जहाजांना भेटी द्यायचे ठरले. भारतीयांना नौदलात भरती करून आम्ही त्यांच्यावर उपकारच केले आहेत. हे ब्रिटिशांना दाखवायचे होते. तेव्हाच श्री. बी सी दत्त (ज्यांनी पहिल्यांदा उठावाला सुरुवात केली) आणि श्री. आर डी पुरी (हे प्रेक्षक आणि इंडिया टुडे चा प्रमुख संपादक होते) त्यांनी HMIS तलवारच्या भिंतींवर रात्री Down the british, Kill british (ब्रिटिशांना मारा) अशा अर्थाच्या घोषणा लिहिल्या.

सकाळी जेव्हा सगळे जहाजावर आले तेव्हा त्यांना या घोषणा दिसल्या. दत्त आणि पुरी मात्र पळून गेले होते. १ फेब्रुवारी १९४६ ला जेव्हा ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल क्लॉड आचिलेक भाषण देणार होता तेव्हा त्यांनी परत तसेच केले. ज्या व्यासपीठावरून तो भाषण देणार होता त्याच्या खाली त्यांनी याच घोषणा लिहिल्या. पण दुर्दैवाने त्या रात्री ते पकडले गेले. कारण त्यांनी पत्रके चिकटवण्यासाठी ज्या डिंकाचा वापर केला होता त्या बाटल्या त्यांच्या हातात सापडल्या. जहाजाच्या कॅप्टन ने त्यांना ‘खलाशांची पोरं’ म्हणून हिणवले. सैन्यात ३ जणांनी काही कुरापती केल्या की त्याला ‘बंड’ म्हटले जाते. १८ फेब्रुवारीला सर्व खलाशांनी घोषणा दिल्या आणि बंडाची सुरुवात झाली. हे खलाशी दीपगृहाच्या जवळील वस्तीतले असल्यामुळे दोनच तासात सर्व जहाजावरील खलाशांना उठावाची बातमी समजली. फिरंगी बैचेन झाले.

१८ तारखेलाच इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ मध्ये चर्चा होती. सर्व अधिकार सुपूर्द करण्यासाठी समिती नेमली जाणार होती. या समितीत ब्रिटिश नौदलाचा प्रमुख अल्बर्ट अलेक्झांडर होता. त्याने त्यावेळेस भारतात येण्याचे काही कारण नव्हते. त्याचे काम फक्त एवढेच होते की उठाव दडपून टाकायचा आणि शांतता प्रस्थापित करायची. उठावाची बातमी सर्व वर्तमानपत्रात आली. खलाशांना हा उठाव शांततेत करायचा होता. आणि त्यावेळी रॉयल इंडियन नेव्ही भारत सरकारच्या स्वाधीन करावी असा त्यांचा मानस होता. त्यांना तसे वाटत होते कारण त्यांना भाबडी आशा होती.

किती खलाशांनी उठावात  भाग घेतला?

HMIS तलवारपासून याची सुरुवात झाली. सुरुवातीला १००० लोक होते. पण २ दिवसात २०,००० खलाशी, ७८ जहाजे आणि २१ किनाऱ्यावरील आस्थापनांनी संप पुकारला. ब्रिटिशांनी जशी समितीची स्थापना केली त्याबरोबर त्यांनी एक युद्धनौका क्रांतीकारकांना घाबरवण्यासाठी मुंबईच्या दिशेने पाठवली. त्यावरील विमाने डॉकयार्ड आणि गेटवे ऑफ इंडिया भोवती फिरत होती. मुंबईतील सर्व जहाजांवर खलाशांनी कब्जा केला. त्यांनी ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवला आणि त्या जागी काँग्रेसचा, मुस्लिम लीगचा आणि कम्युनिस्टांचा झेंडा लावला. जेव्हा आकाशात विमाने फिरायला लागली तेव्हा भारतीय खलाशांनी त्यांच्या बंदुका गेटवे ऑफ इंडिया आणि डॉकयार्डच्या दिशेने वळवल्या. आणि धमकी दिली जर आमच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सगळ्या इमारती उडवून टाकू. राजकीय नेत्यांना शेवटी मध्यस्ती करण्याची वेळ आली. सरदार पटेल, मौलाना आझाद यासारख्या जेष्ठ नेत्यांनी खलाशांशी वाटाघाटी सुरु केल्या. ‘उठाव करून काही उपयोग नाही, फिरंगी जोरावर आहेत. सर्व त्यांच्या अधिपत्याखाली आहे असे त्यांनी सांगितले. खलाशांना मार्गदर्शन करण्याचे सोडून त्यांना शरणागती पत्करण्याचा सल्ला दिला. तरुण नौसैनिकांनी वाद घालायला सुरुवात केली. आम्हाला बंदुकीने लढायला शिकवले आहे, चरख्याने नाही. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू मेलो तरी चालेल.

पण जेष्ठ खलाशी आणि तरुण खलाशी यात मतभेद होते. शेवटी संध्यकाळी साडेसहाच्या दरम्यान जेष्ठ खलाशांनी शरणागती पत्करली. सरदार पटेलांनी जेव्हा खलाशांना शरणागती पत्करायला सांगितली तेव्हा त्याचे कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत असे आश्वासन त्यांनी खलाशांना दिले. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. एकदा त्यांनी शरणागती पत्करली तर त्यांच्यापैकी ४०० जणांना तुरुंगात जावे लागले. स्वातंत्र्यानंतरही खलाशांनी सरकारकडे सुटकेची मागणी केली किंवा दुसरे काम द्यायला सांगितले. सरकारने त्यांना पत्रातून उत्तर दिले की उठाव केल्यामुळे कोणालाही सोडले जाणार नाही आणि त्यांना कोणतीही नोकरी मिळणार नाही.

राजकीय नेत्यांनी कोणतीच मदत का केली नाही ?

१९४६ साली भारतीय नेत्यांना स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात दिसू लागले होते आणि बंडाला पाठिंबा देऊन त्यांना स्वातंत्र्याचे श्रेय नौदलाला मिळू द्यायचे नव्हते. नौसेनेतील उठावामुळे आणि एकूणच सैन्यातील अस्थिर परिस्थितीमुळे  आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळाले. एकाही राजकीय नेत्याला याचे श्रेय दुसऱ्याला मिळू द्यायचे नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व नेते म्हणाले की सैन्यातील शिस्त कोणालाही मोडता येणार नाही. दुसरे कारण म्हणजे १९५८ पर्यंत नौसेनेतील स्टाफचे प्रमुख पद ब्रिटिशांकडे होते. (श्री रामदास कातरी यांनी २२ एप्रिल १९५८ साली नौसेनेचा पदभार स्वीकारला त्याअगोदर ४ ब्रिटिश अधिकारी नौदलात प्रमुख पदावर होते.) त्यांनी बंड करणाऱ्यांना नौसेनेत घेतलेच नसते.

१९४६ च्या नौदल उठावाबाबत इतिहासाच्या पुस्तकात कमी का लिहिलं गेलं?

कारण काँग्रेसला ते नको होतं. त्यांना याबद्दल खंत वाटत होती. १९६५ साली श्री उत्पल दत्त सारख्या कलाकाराने ‘कल्लोळ’ हे नाटक केलं. ते सुद्धा काँग्रेसने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. दत्त यांनी सुंदर सेट उभा केला होता. काँग्रेसच्या व्हॉलेंटियर्सने तिथे जाऊन घोषणा दिल्या. पण CPIM च्या नेत्यांनी सेट उध्वस्त करू दिला नाही. त्यावेळी ते नाटक खूप प्रसिद्ध झालं. काँग्रेस ते थांबवू शकली नाही. म्हणून त्यांनी श्री उत्पल दत्त यांना अटक केली आणि नाटक बंद पाडले.

खलाशांना कोणी प्रेरणा दिली?

सर्वचजण त्यांच्या ध्येयाप्रती एकनिष्ठ होते. नेहरूंनी सुरुवातीला नौसैनिकांविषयी सहानुभूती दर्शवली. पण नंतर ते दबावाला बळी पडले आणि सैन्यातील शिस्तीविषयी बोलू लागले. मुस्लिम लीगचा प्रश्नच नव्हता ती मुस्लिम खलाशांच्या बाजूने होती. पण जेव्हा उठाव झाला त्यावेळी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश एकाच बाजूचे झाले. काँग्रेसमध्ये फूट पडली तरुण नेते जसे की अरुणा असफ अली, श्री जयप्रकाश नारायण, श्री बिजू पटनाईक यांनी तरुण नौसैनिकांची बाजू घेतली. तर सरदार पटेल, मौलाना आझाद हे जेष्ठांच्या बाजूने उभे राहिले. त्यांची हयातच ब्रिटिशांशी लढण्यात गेली. आता आता आलेल्या या तरुण पोरांना त्यांनी स्वातंत्र्याचं श्रेय का घेऊ दिलं असतं? शेवटी लोकांचं झुकत माप जहालमतवाद्यांच्या बाजूनेच होतं. माझं हे पुस्तक लिहिताना एवढंच ध्येय होतं की नौसैनिकांना सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांइतकाच आदर मिळायला हवा. १८ फेब्रुवारी १९४६ ही तारीख २६ जानेवारीइतकीच लोकांनी लक्षात ठेवायला हवी. समिती भारतात पाठवण्यात आली आणि नौसेनेच्या उठावामुळे आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांना हे माहित होतं की तिन्ही दलांनी एकत्र उठाव केला तर परिस्थिती त्यांच्या हातात राहणार नाही.

गांधीजींचं यावर काय मत होतं?

गांधीजींनी हिंसेला कधीच पाठिंबा दिला नाही. ते म्हणाले नौसैनिकांना चुकीचा सल्ला दिला गेला आहे. त्यांना असं वाटत असेल की अविचारी आणि हिंसेच्या मार्गाने ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील तर ते कधीही शक्य होणार नाही.

नेहरूंची प्रतिक्रिया काय होती?

नेहरूंनी सुरुवातीला नौसैनिकांना पाठिंबा दर्शवला. २६ फेब्रुवारीच्या भाषणात नेहरूंनी नौसैनिकांची माफी मागितली कारण त्यांनी जी आश्वासने देऊन उठाव थांबवायला सांगितला होता ती वचने ते पाळू शकले नाहीत. मला वाटत नेहरूंना स्वतंत्र भारतातील कुठलं तरी मोठं पद खुणावत होतं. त्यामुळे नंतर त्यांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला नाही. काँग्रेसने या उठावाला स्वातंत्र्यलढा म्हटले नाही कारण स्वातंत्र्य प्राप्तीचे श्रेय त्यांना खलाशांना द्यायचे नव्हते.

आणि इतिहासाची पुस्तके ?

काँग्रेसला हे इतिहासाच्या पुस्तकात छापून यायला नको होतं. कारण तस झालं असतं तर भारताच्या स्वातंत्र्याचं श्रेय लोकांनी नौसैनिकांना दिलं असतं. त्यावेळी काँग्रेसच्या प्रगतीच्या मार्गात त्यांना कोणीही आलेलं चालणार नव्हतं. मुंबईत झालेली हिंसा वर्तमानपत्रात छापून आली. ४०० लोक मेले. पण या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची नावे इतिहासाला ठाऊक नाहीत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे लोक मारले गेले. आणि मुंबईचे रस्ते नौदलातील क्रातिकारकांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनी फुलून गेले.

०००

Related posts

Leave a Comment