– सतीश सिन्नरकर. हिन्दी सिनेमाच्या इतिहासात ‘मुघले आझम’ सिनेमाची निर्मिती म्हणजे एक महद् आश्चर्य मानले जाते. के. असिफ यांनी आपले सर्वस्व ओतून सतत ९ वर्षे मेहनत केली व हा अद्वितीय चित्रपट बनविला. त्या काळच्या चित्रपट निर्मितीच्या खर्चाचा विचार केला तर मुघले आझमचा खर्च किमान १०० पट जास्त झाला. या सिनेमाची कहाणी म्हणजे एक स्वप्ननगरी असून प्रत्येक बाबतीत तिचे अनोखेपण अधोरेखित होते. पहिला सिनेमा कृष्णधवल असूनही २५ आठवडे सतत चालला व त्यानंतर ४४ वर्षांनी २००४ मध्ये हा चित्रपट रंगीत केला त्यावेळीही तो २५ आठवडे चालून त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले. हा सिनेमा…
Read MoreCategory: चित्रपट / नाटक
‘गांधी – द म्युझिकल’ : प्रभावी संगीत नाटक
आपल्याकडे काही विषय असे आहेत की त्यावर प्रत्येक कलेच्या माध्यमातून सादरीकरण करता येते. महात्मा गांधी यांच्यावर आजपर्यंत पुस्तके, कविता, सिनेमा, नाटके सर्व झाली आहेत. पण या विषयावर संगीत नाटक होऊ शकते असा मात्र कधी विचार कोणाही कलाकाराच्या मनात आला नसेल. पण हे आव्हान दानेश खंबाटा या व्यक्तीने स्वीकारून त्याचे लेखन व दिग्दर्शन करीत ‘गांधी-द म्युझिकल’ हे इंग्रजी संगीत नाटक सादर केले आहे. दोन तासांच्या अवधीत संपूर्ण गांधी चरित्र संगीताच्या माध्यमातून सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. पण हे नाटक पाहिल्यानंतर त्याच्या यशस्वी प्रयोगाने मन प्रसन्न होते आणि आश्चर्यचकितही! मुंबईच्या…
Read More