संशोधक, समीक्षक, आंबेडकरी विचारवंत

– गंगाधर पानतावणे डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (जून २८, इ.स. १९३७-२७ मार्च इ.स. २०१८) हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. सुरुवातीचे जीवन व शिक्षण गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूर मधील पाचपावली वस्तीत झाला. त्यांचे वडील विठोबा जास्त शिकलेले नव्हते परंतु ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी जुळलेले होते. त्यांचे आडनाव ‘पानतावणे’चा अर्थ होता पाणी गरम करणारे. गरिबीमध्ये त्यांचे जीवन व्यतीत…

Read More