Kuldevta – diwali 2017

आपली देवस्थाने फार प्राचीन काळापासून उभी आहेत. प्रत्येक देवस्थानास इतिहास आहे. ती उभी राहण्यामागे काही कथा आहेत. प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व वेगवेगळे आहे. या कुलदेवतांबाबत म्हणाल तर देवता अशी एकच लक्षात आली आणि ती म्हणजे ‘पार्वती’. मात्र या पार्वतीने वेळोवेळी निरनिराळी रूपे घेऊन भक्तांना आधार दिलेला आहे. भक्तांची संकटे दूर केलेली आहेत आणि तिची निरनिराळ्या ठिकाणी श्रद्ध-ास्थाने निर्माण झाली आहेत.

संस्कृतीच्या प्रभावाने व्यक्तिमत्त्व घडते व त्यातूनच जीवन सफल पावते. या प्रक्रियेत कुलदेवतेचे महत्त्व अपार आहे. आयुष्यात शक्ती, धन, विद्या व भक्ती यांची प्रेरणा आपणास आपल्या कुलदेवतेपासून मिळत असते. म्हणूनच आदिशक्ती, आदिमाया असलेल्या आपल्या कुलदेवतेची उपासना करण्यास सांगितले जाते.

आज अनेकांना आपल्या कुलदेवतेच्या नावाशिवाय इतर काहीच माहिती नसते. काही जणांना तर नावही माहीत नसते. एखादे संकट, अरिष्ट वगैरे आले की आजुबाजूची ज्येष्ठ, जाणती मंडळी कुलदेवतेच्या उपासनेची महती सांगतात, तेव्हा शोध सुरू होतो. स्थान, पूजाविधी, व्रते, आरत्या इत्यादी माहिती सहजपणे मिळत नाही. शिवाय धर्माच्या नावाखाली लुबाडणारे लोक गैरफायदा घ्यायला तयारच असतात. त्यामुळे माणूस कुलदेवतेचा नादच सोडतो आणि या सर्व पवित्र व गंभीर विषयाला थोतांड समजू लागतो.

या गोष्टींचा विचार करून या वर्षीचा विशेषांक म्हणून ‘कुलदेवता’ हा श्रद्ध-ेचा विषय निवडला आहे. या विषयाची विस्तृत माहिती देऊन खऱ्या धर्मभावनेला आवाहन करण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. गेल्या वर्षी ‘आई’ या विशेषांकास महाराष्ट्रभर उदंड प्रतिसाद मिळाला. त्याचे भरपूर कौतुकही झाले. त्यामुळे उत्साह वाढून या वर्षीच्या अंकाची तयारी केली आहे.

महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी लोक याला नाके मुरडणार हे स्पष्ट आहे. आपल्या श्रद्ध-ास्थानांना नावे ठेवून भक्तांच्या भावना दुखविण्याचे त्यांचे ‘समाजकार्य’ चालूच असते. महत्त्वाचे सण आले की त्यातील बाह्य उपचारांचे अवडंबर माजवून लोकांच्या मनात भ्रम निर्माण करणे त्यांना सहज शक्य होते. मग नागपंचमी आणि दूध, दिवाळी व फटाके, गणपतीच्या जगावेगळ्या रूपाची नको ती चिकित्सा, शनी शिंगणापूरच्या प्रथेवरून वादंग, वटपौर्णिमेची कुचेष्टा असे अनंत प्रकार सतत सुरू असतात. भारतीय मानस या सर्वांना पुरून उरले असले तरी श्रद्ध-ेची अंधश्रद्ध-ा कधी झाली ते आपल्याला कळलेच नाही. एखाद्या प्रथेचा खरा अर्थ न समजल्याने त्यातून अन्यायाची परंपरा कधी चालू झाली ते आपल्या लक्षातच आले नाही. आजच्या विज्ञानयुगात ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध- कर’ हा नियम असल्याने आपल्या परंपरांचे समर्थन कसे करायचे हा एक गहन प्रश्न बनला आहे. आपल्या संस्कृतीचे अंतरंग विसरून केवळ बहिरंगाचा पाठपुरावा वर्षांनुवर्षे करीत राहिल्याने ही गंभीर समस्या

 

समाजासमोर निर्माण झाली आहे. यासाठी विचारमंथन, चर्चा, परिसंवाद, लेखन, प्रवचन या सर्व माध्यमांची मदत घेऊन लोकजागर करणे आवश्यक ठरते. हे सत्कार्य करणारे महापुरुष समाजात सदैव असतात. त्यांची संख्या कमी-जास्त असू शकते. पण त्यांचे प्रयत्न याच दिशेने अविरत चालू असतात, याचे असंख्य दाखले आहेत.

असा सर्व विचार करून या वर्षीच्या विशेषांकाचा हा विषय निवडला आहे. एवढा गहन विषय एखाद्या छोट्या अंकात मावणे केवळ अशक्य आहे. पण आमचा आमच्या वाचकवर्गावर गाढ विश्वास असून त्यांना काही प्रमाणात प्रेरणा मिळून समाजप्रबोधनाच्या कार्यास ते हातभार लावू शकतील, असे मनापासून वाटते.

आपली देवस्थाने फार प्राचीन काळापासून उभी आहेत. प्रत्येक देवस्थानास इतिहास आहे. ती उभी राहण्यामागे काही कथा आहेत. प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व वेगवेगळे आहे. या कुलदेवतांबाबत म्हणाल तर देवता अशी एकच लक्षात आली आणि ती म्हणजे ‘पार्वती’. मात्र या पार्वतीने वेळोवेळी निरनिराळी रूपे घेऊन भक्तांना आधार दिलेला आहे. भक्तांची संकटे दूर केलेली आहेत आणि तिची निरनिराळ्या ठिकाणी श्रद्ध-ास्थाने निर्माण झाली आहेत.

माणूस श्रद्ध-ावान असावा. कोठेतरी त्याची श्रद्ध-ा असावी. कारण आपल्या देव-देवतांच्या मंदिरात लाखो-करोडो माणसे नित्यनेमाने उत्साहाने जातात. खरोखरच त्यांना त्यांच्या नित्य जीवनांत अशा दर्शनाने फायदा होतो का नाही हे त्यांनाही माहीत नसते; पण ते दर्शन घेण्यास चुकत नाहीत. स्वत:ची आर्थिक क्षमता असो वा नसो, पण भाविक देव-देवतांचे दर्शन घेताना दिसतात. अनेक अडचणींना तोंड देऊन दर्शन घेतात व जेव्हा परततात तेव्हा त्यांचे चेहरे आनंदाने, समाधानाने पुलकित झालेले असतात.

असे असूनही भक्तांनी, श्रद्ध-ावानांनी देवदेवतांची माहिती घेण्याचा दर्शनासोबत प्रयत्न करावा. त्याने आपले गैरसमज दूर होऊ शकतील. नित्य सामोऱ्या येणाऱ्या अपप्रवृत्ती नजरेस येतील व तदनंतर मात्र अपप्रवृत्ती दूर सारून आपण निर्मळ मनाने वारंवार होणाऱ्या त्रुटी दूर सारून आपली श्रद्ध-ास्थाने भव्य-दिव्य रुपांत आणखी दिमाखाने उंचावत राहतील हे निश्चित.

प्रत्येकाने आपले स्नान उरकल्यावर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करणे आवश्यक आहे. कारण आपली कुलदेवताच आपणास मदत करीत असते. कुलदेवतेचे विस्मरण झाल्याने संकटावर मात करण्याची शक्ती कमी होऊ शकते म्हणून कुलदेवतेचे दर्शन मात्र अवश्य घ्यावे.

या अंकासाठी अनेकांनी हस्ते परहस्ते साहाय्य केले आहे. लेखकांनी व कवींनी उत्तम साहित्य वेळेवर दिल्याने हा अंक संपूर्ण सजला आहे. या अंकाचा मजकूर निवडताना आम्हाला गजानन शं. खोले, यांचे कुळधर्म-कुळाचार-कुलदैवते, सौ. गीता आदिनाथ हरवंदे यांचे महाराष्ट्रातील तीर्थयात्रा कुलदैवते आणि विविध संप्रदाय, सौ. विद्या नाले यांचे श्री कुलदेवता उपासना, नर्मदा प्रसाद यांचे मराठी सणवार – कुळाचार – व्रतवैकल्ये, अजित पटवर्धन यांचे कुलदैवत या पुस्तकांची खूप मदत झाली आहे. या सर्वांचे मन:पूर्वक आभार. सुमारे १७ वर्षांपूर्वी कुलदेवी नावाचा विशेषांक श्री. हरिभाऊ लिमये यांनी केला होता. त्याची प्रत त्यांनी आवर्जून पाठवली. त्या अंकाचाही खूप उपयोग झाला. श्री. हरिभाऊ लिमये यांचेही आभार!

लेखन झाल्यावर लागते उत्कृष्ट छपाई, याबाबतीत ‘महानगरी वार्ताहर’ नेहमीच जागरूक असतो. उत्तम कागद व उत्तम रंगीत छपाई हे आमचे व्रत आहे. त्यानुसारच या अंकाची निर्मिती झाली आहे. अंकाचे आर्थिक गणित बसविण्यामध्ये आमच्या जाहिरातदारांचा मोलाचा वाटा आहे. या वर्षी महानगरी वार्ताहरला २५ वे वर्ष लागले. २५ वर्षांच्या या वाटचालीत वाचकांबरोबर खरे सामर्थ्य दिले ते आमच्या जाहिरातदारांनी! या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडे ठरतील.

संपादकीय सहकारी, जाहिरात विभागातले सहकारी, टंकलेखन, मुद्रित तपासणी व मुद्रण यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे सहकारी व असंख्य हितचिंतक यांचेही आभार! सर्वांना ही दीपावली सुखाची, समाधानाची व कुलदेवतेच्या कृपाप्रसादाची लाभो, हीच ईशचरणी प्रार्थना!

 

Related posts

Leave a Comment