भगवंत हा परिपूर्ण आहे. तोच एक पूर्ण आहे. त्याच्या आपण जितके जवळ जाऊ तितके त्याचे गुण आपल्यात उतरतील. आपल्याला यश, श्री, धन, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य,औदार्य प्राप्त होईल. ही भारतीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा आहे. विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विकसित होणे, उत्क्रांत होणे हा निसर्गनियमच आहे. म्हणून प्रत्येकाने सतत विकासाची कास धरावी. आजकाल व्यक्तिमत्त्व विकास हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अनेक लोक व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे आक्रमकता अंगी बाणवणे, समोरच्याला खाऊन टाकणे असे समजतात. या विषयाशी संबंधित अनेक कोर्सेस सध्या चालतात. ते चूक नाहीत पण या ठिकाणी आपण…
Read MoreDay: December 13, 2017
कृषी परिवर्तन अर्धा प्याला भरलेला
-प्रशांत असलेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक निःशब्द क्रांती घडते आहे. कृषी पदवी घेतलेले तरूण प्रत्येक तालुक्यात तयार होत आहेत. शेतीबाबत नवनवे प्रयोग करीत आहेत आणि त्यांच्या प्रयोगांना चांगले यशही मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाचल्या की वाटते की शेतीची परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे.एका दृष्टीने पाहिले तर प्याला अर्धा रिकामा आहे. परंतू नवनवे प्रयोग करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या की वाटते सगळीच आशा अजून संपलेली नाही. बरेच काही आशादायकही घडत आहे. तोच प्याला अर्धा भरलेलाही आहे. एक नवा महाराष्ट्र घडतो आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची ओळख टँकरच्या देशा अशी बनत चालली आहे.…
Read More