ज्या पद्धतीने त्यांनी अत्यंत कठीण मोहिमांमध्ये निर्णय घेतले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो किती महान होता. भारतीय हवाईदलाचे एअर कमांडर नितीन साठे यांनी एअर वाईस मार्शल चंदन सिंग याना सलाम केला कारण त्यांच्याच नेतुत्वाखाली आणि नियोजनामुळे भारतीय सैन्याला १९७१ मध्ये ढाका काबीज करण्यात यश मिळाले होते. एअर वाईस मार्शल चंदन सिंग MVC,AVSM,VrC,VSM सज्जन सिंग यांच्याकडून. हा आहे १९७१ च्या युद्धाचा खरा हिरो ज्याच्याबद्दल युद्धानंतर फारसे लिहले गेले नाही. त्यांच्या जवळच्या मित्राने मेजर चंद्रकांत सिंग यांनी लिहिलेले चंदन सिंग यांचे चरित्र आकाशातील एक उत्साही वीर (A Cavalier In a Sky) त्यांच्या मृत्यनंतर २९ मार्च २०२० मध्ये प्रकाशित झाले.
हे पुस्तक आपल्याला एअर वाईस मार्शल चंदन सिंग यांच्या जीवनाविषयी तर माहिती देतेच त्यासोबत भारतीय वायू सेना त्या काळात कशी होती याची सफर सुद्धा घडवते. १९७१ च्या युद्धाच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा मेघना नदीच्या काठावर जेव्हा सैन्य तैनात केले. तेव्हा केलेल्या स्पेशल हेली बॉर्न ओप्रेशन दरम्यान चेतक हेलिकॉप्टर वर वैमानिक म्हणून ग्रुप कॅप्टन चंदन सिंग आणि चंद्रकांत सिंग यांची भेट झाली. मेजर चंद्रकांत आठवणी सांगताना म्हणतात की स्क्वारडेन लिडर पुष्प वेद चेतक हेलिकॉप्टर उडवत होते तर मी आणि चंदन हेलिकॉप्टर ला उतरवण्यासाठी योग्य जागा शोधत होतो.
ज्या पद्धतीने त्यांनी अत्यंत कठीण मोहिमांमध्ये निर्णय घेतले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो किती महान होता. युद्धानंतर चंदन ने मला त्याचा मुलगा म्हणून ‘दत्तक’ घेतले होते आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा युद्धामध्ये काय काय घडले याबद्दल बोलत बसायचो जोधपूरला आता राहत असलेले अधिकारी सांगतात चंदन सुद्धा निवृत्तीनंतर जोधपूरला राहायला गेले होते. त्यादिवशी आम्हाला खूप गोळ्या लागल्या आमचा को पायलट ऑफिसर सिद्धू ही जखमी झाला. जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात चंदनने वेद याना सिद्धूला बाहेर काढायला सांगितले. आणि तो जनरल सागत सिंग यांच्या बरोबर सरावाचे प्लांनिंग करण्यासाठी निघून गेला. त्यांच्या चरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी जिवंत असावे अशी माझी फार इचछा होती. जगाला एका महान व्यक्तीला भेटायला मिळाले असते.
जोधपूर लान्सर्स मध्ये कॅप्टन.
३ डिसेंबर १९२५ रोजी जोधपूर जवळील बागवास येथे जन्मलेल्या चंदनला लान्सर्समध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून भरती करून घेतले. तेव्हा तो १६ वर्षांचा होता. दुसऱ्या महायुद्धात इराक, पॅलेस्टाईन, पर्शिया आणि इजिप्त इथे सैनिक म्हणून भाग घेतल्यानंतर महाराजा उमेद सिंग यांनी त्याला रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये भरती होण्यास सांगितले. महाराजांना योगायोगाने रॉयल एरफोर्सने मार्शल ही पदवी दिली होती. खरं तर चंदनला नेमले होते स्पिटफायर्स उडवणारा फायटर पायलट म्हणून. पण एका अपघातामुळे ट्रान्सपोर्टचे विमान उडवायला जावे लागले. इंडियन एअर फोर्समध्ये एअर वाईस मार्शल म्हणून त्याने १९८० मध्ये निवृत्त होण्यापूर्वी ३४ वर्षे काम केले. त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी आणि समर्पणासाठी त्यांना वीर चक्र (१९६५ मध्ये ) आणि महावीर चक्र (१९७१ मध्ये)
तसेच अति विशिष्ट सेवा पदकाने आणि उत्तम सेवेसाठी विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला. ढाका येथे आत्मसमर्पण केल्याच्या प्रसंगानंतर सज्जन सिंग यांनी लगेच एक प्रसंग सांगायला सुरुवात केली. लढाई न करताच इतक्या लवकर आत्मसमर्पण का केले असे कोणीतरी अत्यंत अस्वस्थ असलेल्या जनरल AAK नियाझी यांना विचारले. नियाझी बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते. ते जवळच उभ्या असलेल्या एरफोर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ गेले. आणि मागून त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. खरे तर ते वरिष्ठ अधिकारी दुसरे तिसरे कोणी नसून ग्रुप कॅप्टन चंदन सिंग होते. ते जे काही घडले त्याला एरफोर्सची कारवाई म्हणायची की माझ्या बाबांचे शौर्य मला माहित नाही. पण कोणत्याही परिस्थितीत पूर्वेला जी काही कारवाई झाली त्यासाठी माझे बाबा म्हणजे नियाझी जबाबदार होते. खरतर माझा विश्वास बसत नाही पण हे खरं आहे.
वाईस मार्शल चंदन सिंग त्यांच्या पत्नी समवेत.
माझ्या बाबांची सर्वात जुनी आठवण १९७६ सालातील आहे. त्यांचे लग्न उशिरा झाले आणि जेव्हा ते विंग कमांडर झाले तेव्हा मी फक्त २ वर्षाचा होतो. मला आजही आठवतं मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा बाबा मला रोज खिडकीतून बाय बाय करायचे. लवकरच ते ग्रुप कॅप्टन झाले आणि आम्ही जोरहाटला राहायला गेलो. तिथे त्यांच्यावर वाहनतळाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली. मूलभूत सोयी नसलेले आणि भरपूर डास असलेले असे ते ठिकाण होते. असे जरी असले तरी जोरहाट हे महत्वाचे होते. कारण ईशान्येकडील वाहतुकीला जी काही रसद किंवा इतर सामान पुरवले जायचे ते येथूनच केले जायचे. बाबांचे पोस्टिंग होईपर्यंत जोरहाट मधील राहणीमानात आणि एकूणच सोयीसुविधांमध्ये बराच बदल झाला होता. त्यांनी त्या ठिकाणाला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने तिथे पोल्ट्री फार्म, फिशरी प्लांट, डुक्कर पालन व्यवसाय, डेअरी आणि बऱ्याच गोष्टी सुरु केल्या. इतकेच नाही तर रनवेच्या बाजूला वाढलेल्या घनदाट सिट्रोनेला वनस्पतीच्या वापराने डासांचा उपद्रवही कमी झाला. बाबांच्या प्रयत्नाने नंतर मध्ये परेड आणि पदग्रहण समारंभ मोठ्या प्रमाणात होऊ लागले.
एअर वाईस मार्शल चंदन सिंग यांची मेडल्स.
जोरहाट एका एकत्र कुटुंबासारखे होते. खरंच ते किती आनंदी दिवस होते. आम्ही मुले बिनधास्त न लाजता एकमेकांच्या घरी जात असू, एकत्र खेळात असू, राहत असू, खात असू, दंगा घालत असू. लहानपणी सज्जनला त्याचे बाबा युद्धावर जातात म्हणजे नेमके काय करतात हे कळत नव्हते. मला वाटायचं की ते एका ऑफिसमध्ये डेस्क जॉब करतात. कारण सकाळी ते नेहमी एक ब्रिफकेस घेऊन जात आणि रात्री उशिरा ऑफिसच्या गाडीने परत येत. कधी ते काही दिवसांसाठी बाहेर जात आणि आई आम्हाला सांगायची की ते लाल अंकल किंवा सागतला भेटायला गेले आहेत. (एअर चीफ मार्शल पी सी लाल आणि लेफ्टनंट जनरल सगत सिंग) कधीतरी ते दोघेही सहकुटुंब चहाला आमच्या घरी येत असत. दिमापूरमध्ये पाकिस्तानी पायलट्सना प्रशिक्षण देण्यात आणि किलो फ्लाईटमध्ये बाबांचा वाटा होता हे आम्हाला खूप वर्षांनी कळले. तसेच बांगलादेश एअर फोर्सची पायाभरणी करण्यात बाबांचा मोठा वाटा होता. बाबा क्वचित कधीतरी त्यांच्या एरफोर्स मधील यशाबद्दल बोलायचे. पण फार कमी. जवळ जवळ नाहीच.
मला चांगलं आठवतं ते म्हणायचे आम्हाला जे करायचं होत ते आम्ही केलं पण अतिशय कमी वेळात केलं मला कळायचं नाही की हा सगळं काय प्रकार आहे. मी म्हणायचो एअर फोर्स ने तुम्हाला उगीचच MVC आणि VRC पद बहाल केले ते फक्त खांदे उडवून हसायचे. हाच त्यांचा मोठेपणा होता. AVM चंदनसिंग यांनी आग्रा येथे एका नाटकात चार्ली चॅप्लिनची भूमिका केली होती. त्यांच्या निवृत्तीवेळी चंदनसिंग आणि त्यांचा भाऊ हरी हे युद्धाबद्दल चर्चा करत होते म्हणजे युद्धामध्ये काय करायला हवं होत काय केलं वैगरे. मी जेव्हा ऐकायला बसायचो तेव्हा ते विषय बदलायचे. रेझान्गचा हिरो शैतान सिंग याची गोष्ट मी खूप वेळा ऐकली आहे. माझ्या बाबांपेक्षा एक वर्षाने मोठे असून सुद्धा शैतान सिंगने शाळेत उशिरा प्रवेश घेतला. ते माझ्या काकांचे वर्गमित्र होते. ते दोघे एकाच बाकावर बसायचे आणि जोधपूर मिलिटरीमध्ये त्यांनी एकत्र ट्रेनिंग घेतले. माझे काका आणि शैतानसिंग उत्तम स्पोर्ट्स पर्सन होते. ते आसपास नसतानाही त्यांच्या खेळाच्या चर्चा होत असत.
बाबा सांगायचे की त्यांनी मेजर रेंगझला फ्रॉस्टबाईट झाल्यानंतर कसे हॉस्पिटलमध्ये नेले होते. त्यांच्या गोष्टी ऐकताना माझे भान हरपत असे. मी ठरवलं होत की मोठं झाल्यावर त्यांच्यासारखं व्हायचं. फोटो एअर वाईस मार्शल त्यांच्या फ्लाईंग कोटमध्ये जनरल सागत सिंग याना मी जोहरातमधेच नव्हे तर निवृत्ती नंतर त्यांच्या मेघना नावाच्या बंगल्यावर जाऊन भेटलो. ते उंचेपुरे आणि छाप पाडणारे होते. बाबा आणि त्यांचे अनेक कारणांमुळे चांगले मेतकूट जमले होते. दोघे मूळचे राजस्थान मधील होते. अतिशय नम्र परिवारातून आले होते दोघेही मिल्ट्रीमध्ये होते आणि एकमेकांना बरीच वर्षे ओळखत होते. बाबा एरफोर्समध्ये भरती होण्यापूर्वी सैन्यात होते त्यामुळे एका आर्मी मधील माणसाचे मन चांगले जाणून होते. AVC,AVSM,VRC
काही वर्षांपूर्वी एअर वाईस मार्शल चंदनसिंग यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहायला घेतले. जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त पाने त्यात होती. जेव्हा आम्ही मुलांनी त्यांना ते छापायला सांगितले. तेव्हा त्यांनी ते फाडून टाकले. ते म्हणायचे कोणीतरी आपणहून माझ्या आयुष्याविषयी जाणून घ्यावे इतके काही मोठे काम मी केलेले नाही त्यामुळे हे पुस्तक छापण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते. जेव्हा जेव्हा त्यांच्या एरफोर्स मधील आयुष्याबद्दल विचारायचो तेव्हा ते सांगायला ते नेहमीच नकार देत मेजर चंद्रकांत यांना Cavalier in the sky (आकाशातील उत्साही वीर) हे पुस्तक छापायला बरीच वर्ष प्रयत्न करावे लागले. आणि तेवढाच सय्यम ही ठेवावा लागला.
इंडियन एअर फोर्स च्या एका शूर पायलटचा मुलगा म्हणून आज कसं वाटतंय?
त्यावेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तेव्हाचे विंग कमांडर चंदन सिंग यांना १९६५ च्या युद्धात दाखवलेल्या शौर्याबद्दल वीर चक्र प्रदान केले. सुरुवातीला बाबांचा मुलगा असणं कठीण वाटायचं कारण बाबांचे मित्र आणि आमचे नातेवाईक यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांचं ओझंच खूप होतं इतकं की कधी कधी मला स्वप्न पडायचं की मी डोक्यावर या अपेक्षांचा एक मोठा दगड घेऊन चालतो आहे. पण वर्षामागून वर्षे गेली मी मोठा होत गेलो तस हे फीलिंग कमी होत गेलं. हळू हळू मला समजायला लागलं तस माझ्या लक्षात यायला लागलं की लोक मला आणि माझ्या कुटुंबाला खूप मान देतात आदराने वागवतात. आमच्या कुटुंबाला जे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले होते त्यातून बाबांनीच मार्ग काढला होता. एअर वाईस मार्शल चंदन सिंग लोकांना नेहमीच लक्षात राहतील कारण त्यांनी कोणाच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलला होता, तर कोणाला नोकरी मिळवून दिली होती, तर कोणाला सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे लोकांची आयुष्य बदलली होती.
अगदी शेवटपर्यंत त्यांनी ही खबरदारी घेतली की त्यांच्या पेन्शनचा मोठा भाग अभ्यासू, होतकरू मुलींच्या शिक्षणासाठी खर्च व्हावा ज्यांना खरोखरच शिकण्याची इच्छा आहे. निवृत्ती नंतर त्यांनी बऱ्याच गरीब लोकांना आमच्या कौटुंबिक चुनखडीच्या व्यवसायामध्ये कामावर ठेवले. त्यांना सैन्यातील राजकारण आवडत नसे लष्करी बाबींमध्ये लोकांच्या हस्तक्षेप त्यांना आवडत नसे त्यांनी त्याविषयीची आपली मते वेळोवेळी मांडली. चोखंदळ वाचक असल्याने त्यांना भारतातच नव्हे तर जगात काय सुरु आहे याची माहिती असायची. बाबा लाहानांशी लहान आणि मोठ्यांशी मोठ्या माणसांप्रमाणे वागायचे ज्या लोकांना ते माहित होते त्यांना ते किती मनमिळाऊ आहेत हे माहित होते. एखाद्या समस्येवरील उपाय जाणून घेण्यासाठी लोक त्यांच्याकडे येत. माझ्या मुलानेही सैन्यात जावे असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी त्याच्या मुलाखतीची आणि परीक्षेची तयारीही करून घेतली. माझा मुलगा आता सैन्यात मेजर आहे मला आशा आहे की तो सुद्धा त्याच्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात राहील.
एअर वाईस मार्शल चंदन सिंग त्यांच्या कुटुंबासमवेत.
माझ्या आईचा बाबांना मोठा आधार होता. हे तिच्यासाठी सोपे नव्हते कारण ती खूप वेगळ्या वातावरणात वाढली होती. इंडियन एरफोर्समधील एकूणच वातावरणाशी जुळवून घ्यायला तिला वेळ लागला. पण तिने ते खूप सुंदर निभावले. आणि इंडियन एरफोर्सच्या एका अधिकाऱ्याची बायको असण्याचे कर्तव्य तिने सर्वच अर्थाने पार पाडले. जरी तिने एरफोर्सच्या वातावरणात १७ वर्षेच आयुष्य घालवले असले तरी बाबांच्या निवृत्ती नंतर जोरहाट, युनाइटेड किंग्डम, दिल्ली अलाहाबाद इथे जे कोणी तिला ओळखत ते तिची आजही आठवण काढतात.
१९६२ च्या युद्धादरम्यान एक गंमत झाली.
चायनीज रेडिओवर सांगितले गेले की त्यांनी बाबांना पकडले आहे आणि त्यांचे सर्व डिटेल्स ही त्यांनी सांगितले. नाव वैगरे ही माहिती त्यांना चायनाने केलेल्या उलटतपासणीमध्ये मिळाली असे त्यांचे म्हणणे होते. आम्हाला सांगितले गेले की चिनी सैनिक भारतीय सैनिकांचे धैर्य तोडण्यासाठी मुद्दाम हे करत आहेत. भारतीय सैनिक त्यावेळी पूर्वेकडील आघाडीवर लढत होते. जेव्हा आम्ही वृत्तपत्रातून आणि बातम्यातून आणखी जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळी आमच्या घरचे लाईट आश्चर्यकारकरित्या गेले आणि बरेच दिवस वृत्तपत्रही घरी आले नव्हते. आमचे कुटुंब गोंधळले. आणि काही ऑफिशीयल माहिती येते का ते पाहू लागले. जी कधीच आली नाही. एके दिवशी मुलं शाळेच्या बसमधून घरी येत असताना बस अचानक एका अनोळखी ठिकाणी थांबली. आमची नावे घेतली आणि आम्हाला बसमधून खाली उतरण्यास सांगितले गेले. खाली उतरून पाहतो तो काय बाबा समोर उभे होते. त्यांचे डोळे लकाकत होते. ती इतकी भावनिक घटना होती. अजूनही मला लख्ख आठवते. अगदी काल परवा घडल्यासारखी.
एअर वाईस मार्शल चंदन सिंग त्यांची MG गाडी चालवताना.
२९ मार्च २०२० ला जेव्हा एअर वाईस मार्शल चंदन सिंग यांचे निधन झाले. तेव्हा कोविडचे नियम. कडक केले होते तरी सुद्धा अनेक लोक त्यांना मानवंदना देण्यासाठी अंत्ययात्रेत सामील झाले. इंडियन एरफोर्स ने हियर्स आणि एस्कॉर्ट आम्हाला सुपूर्द केले. प्रधानमंत्री मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे शोकसंदेश ही प्राप्त झाले. ज्यांनी वयक्तिक मेसेज पाठवले त्यामध्ये जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत जे जोधपूर लोकसभेचे खासदार आहेत, राजस्थानचे मुख्य मंत्री अशोक गहलोत सचिन पायलट ज्याचे वडील राजेश पायलट चंदनसिंग यांच्या हाताखाली कामाला होते राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, चीफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदोरिया आणि बांगलादेश एअर फोर्सचे चीफ यांचा समावेश होतो . जिथे जिथे त्यांची पोस्टिंग झाली तिथे त्यांनी नाव कमावले आणि एक वारसा ठेऊन गेले पुढील पिढयांना देण्यासाठी.
१९७१च्या युद्धातील सहभागाबद्दल बाबांना महावीर चक्र देण्यात आले. जे आजही आमच्या जोधपूर च्या घरी आहे. त्यावर लिहिले आहे की ग्रुप कॅप्टन चंदन सिंग AVSM VRC हे पूर्वेकडील हवाई तळाचे कमांडींग ऑफिसर आहेत पाकिस्तान सोबतच्या युद्धात बांगलादेश मुक्त करण्यासाठी केलेल्या हवाई कारवाईत ते आघाडीवर होते. सिल्हेट भागातील दोन कंपन्यांच्या हेलिकॉप्टरची एरलिफ्ट आणि पुढील नियोजनही चंदन सिंग यांचे होते. ढाकाच्या दिशेने जेव्हा सैन्य निघाले तेव्हा प्रत्येक अडथळ्यांवर मात करत ३०००चे सैन्य आणि ४० तोफा एवढे सामान वाहून न्यायचे होते. आणि हेलिकॉप्टर्सची संख्या कमी होती. रात्रीच्या वेळी सैन्य सुरक्षित जागेवर उतरवणे, पोहोचणे गरजेचे होते. त्यात शत्रूची नजर होतीच पण प्रत्येक मिशनच्या वेळी बाबांनी शत्रू सैन्याला चोख उत्तर दिले. डिसेंबर ७ आणि ८ तारखेला जी एरलिफ्ट करायची होती त्याची सगळी जबाबदारी बाबांवर होती शत्रूच्या प्रदेशात जाऊन एरलिफ्ट करणे काही सोपे नव्हते.
जे सैनिक शत्रूचा समोरासमोर सामना करत होते त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर बाबांनी १८ वेळा अशा प्रकारची मिशन्स लीड केली. बऱ्याच वेळा शत्रूच्या रडारवर त्यांचे हेलिकॉप्टर असायचे. पण तरीही ते आपल्या ध्येयापासून ढळायचे नाहीत. आणि कामगिरी फत्ते करूनच परत यायचे. या मोहिमेमुळे ढाकावर विजय प्राप्त करण्यात आणि पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करायला लावण्यात भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले. चंदनसिंग यांनी दाखवलेले शौर्य, नेतृत्व, हवाईदलाच्या नेहमी लक्षात राहील. एका वीर योध्याचा मुलगा असण्याचे जसे फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. लोक माझ्याकडून खूपच अपेक्षा ठेवतात कारण मी चंदनसिंगचा मुलगा आहे. पण त्यांचा नाही. हे लोकांच्या लक्षातच येत नाही एका अर्थाने चंदनसिंगचा मुलगा असणे माझ्यासाठी फायद्याचे आहे कारण मी जर कोठे बाहेर गेलो तर AVM साबचा मुलगा अशी माझी ओळख करून दिली जाते.
आणि मग लोक माझ्याशी गप्पा मारायला येतात. आणि मी जर एखाद्या सरकारी कामात अडकलो असें तर मी बाबांचे नाव सांगितल्यावर माझी कामे लवकर होतात. त्यांचा मुलगा असण्याचा एक फायदा असाही आहे की लोकांकडून मला त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतात ज्या बाबांनी एरव्ही कधीच सांगितल्या नसत्या. एरफोर्स मधील काही जणांचे प्रमोशन झाले आहे. तर काहींचे होण्याच्या मार्गावर आहे. बाबा जर आजच्या आधुनिक इंडियन एअर फोर्स मध्ये असते तर. आधुनिक शस्त्रांसोबत काय करू आणि काय नको असे त्यांना झाले असते. असा एक मजेशीर विचार माझ्या मनात नेहमी येतो. AVM चंदन सिंग तेव्हाचे भारताचे संरक्षण मंत्री जगजीवनराम यांच्या सोबत १९७१ च्या युद्धादरम्यान. AVM चंदनसिंग यांचा अर्धकृती पुतळा.
– नितीन साठे एअर कमांडर