पाकिस्तानी लष्कराची भारत विरोधी भूमिका यापुढेही कायम राहील, देवशर यांची भूमिका 

भारताच्या बाबतीत बहुतेक सर्वच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे एकमत असते. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांची त्यांच्या निवासस्थानी इस्लामाबाद येथे भेट घेतली. 

कोणत्याही नवीन लष्कर प्रमुखांची नेमणूक हा भारतासाठी सावधगिरीचा इशारा असतो. त्या अनुषंगाने जनरल सय्यद मुनीर यांच्या नियुक्तीबद्दल आपण काय सांगाल?

वैयक्तिक रित्या सांगायचं झालं तर कोणताही लष्करप्रमुख पाकिस्तानी सैन्याचे भारताविषयीचे आधीपासून चालत आलेले धोरण बदलू शकत नाही. मग त्यांची नियुक्ती नव्याने झालेली का असेना. त्यामुळे पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख सुद्धा त्याच धोरणाचा अवलंब करतील जे मागील ७० वर्षांपासून पाकिस्तानने भारतविरोधी आखलेलं आहे. थोडक्यात नव्या लष्करप्रमुखांकडून फार काही अपेक्षा नाहीत. भारताविषयीचं पाकिस्तानचं धोरण झटक्यात बदलणार नाही. तेव्हा आपणच सावध असायला हवे कारण जनरल असीम मुनीर यांना नियंत्रण रेषेवर (LOC) काम करण्याचा अनुभव आहे. आणि जेव्हा पुलवामा हल्ला झाला तेव्हा ते इंटर सर्विस इंटेलिजन्सचे डायरेक्टर जनरल होते.

   

पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मुनीर ISI चे प्रमुख होते. आता पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नेमणूक झाल्यावर भारताने त्यांच्या कार्यकाळात कशा प्रकारे सावधगिरी बाळगायला हवी ?

फक्त मुनीर लष्करप्रमुख झाले म्हणून सावधगिरी बाळगायची असे नाही. तर भारताने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तान कडून होणाऱ्या प्रत्येक कारवाईला चोख उत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज राहायला हवे. जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. पण त्याहूनही आणखी काही मोठे होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक सावध राहणं गरजेचं आहे.

फोटो- जम्मू काश्मीर येथील पुलवामा या ठिकाणी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैशे महोमदच्या अतिरेक्यांनी सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स (CRPF) च्या तळावर हल्ला केला होता. 

जनरल मुनीर हे धार्मिक वृत्तीचे आहेत. कुराण त्यांना तोंडपाठ आहे. या गोष्टीचा पाकिस्तानी सैन्यावर काही परिणाम होईल का ? ते कडक शिस्तीचे लष्करप्रमुख असतील का ?

भक्त असणे आणि कठोर शिस्तीचे असणे यात फरक आहे. आतापर्यंत तरी त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचललेले नाही. त्यांना कुराण पूर्ण पाठ आहे याचा अर्थ असा नाही की ते कडक शिस्तीचे असतील. धर्माचा अभिमान हा असायलाच हवा. पण तो रास्त असायला हवा.

तुलना करायचीच झाली तर त्यांची इतर पाकिस्तानी लष्कर प्रमुखांशी कशी तुलना करता येईल?

सर्वच माजी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे भारताविषयीचे धोरण सारखेच होते. त्यामुळे मुनीर याहून काही वेगळे करतील अशी अपेक्षा नाही. त्यांची काम करण्याची पद्धत कदाचित वेगळी असू शकते. पण पाकिस्तानचे भारतविरोधी धोरण कायम राहील हे नक्की.

फोटो- पाकिस्तानचे प्रधान मंत्री इम्रान खान जनरल कमर जावेद बाजवा यांच्या समवेत एका आनंदाच्या क्षणी. बाजवा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून ३० नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त झाले.

पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या इम्रान खान यांना पाकिस्तानी सेना कसे तोंड देईल?

जनरल मुनीर हे देशांतर्गत कारवाईवर जास्त लक्ष देतील. सर्वप्रथम इम्रान खान यांनीच त्यांच्या कारवाईने खराब केलेली पाकिस्तानी लष्कराची प्रतिमा मुनीर यांना सुधारावी लागेल. त्यांना सैन्यात एकजूट निर्माण करावी लागेल. कारण सैन्यात फूट पडली आहे. त्यानंतर इम्रान खान अजूनही पाकिस्तानी सैन्याशी संघर्ष सुरु ठेवतात का हे पाहावे लागेल. जसे त्यांनी बाजवांच्या कार्यकाळात केले होते. इम्रान खान यांनी बाजवा यांना देशद्रोही म्हटले होते. 

इम्रान खान सुद्धा पूर्वीचेच धोरण कायम ठेवतात. की वागण्यात बदल करून सैन्याला सहकार्य करतात ते पाहावे लागेल. पण जर त्यांनीच पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला तर त्यांची प्रसिद्धी घातक ठरू शकते. त्यामुळे जोपर्यंत इम्रान खान स्वतःला सिद्ध करत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी सैन्य त्यांच्याविषयी सावधगिरी बाळगेल.

जनरल बाजवा हे गेल्या ७ दशकांपासून सैन्याच्या राजकारणातील हस्तक्षेपाविषयी बोलत होते. ते यापुढे असेही म्हणाले होते की यापुढे पाकिस्तानी सैन्य कोणत्याही राजकीय गोष्टीत हस्तक्षेप करणार नाही. आताच्या परिस्थितीत पाकिस्तानी सैन्य राजकारणात हस्तक्षेप करणार नाही हे शक्य आहे का?

देशाच्या राजकारणात पाकिस्तानी सैन्य हस्तक्षेप करणे पूर्णतः बंद करेल अशी अपेक्षा ठेवणे कठीणच आहे. कारण गेल्या ७० वर्षांपासून हेच सुरु आहे. पाकिस्तानी सैन्याने राजकारणातील हस्तक्षेप एकदम बंद केला तर तो राजकारण्यांसाठीही धक्काच ठरणार आहे. पाकिस्तानी सैन्याला राजकारणात हस्तक्षेप करण्यापासून थांबवायचे असेल तर आधी राजकारण्यांना त्यांचे वागणे सुधारावे लागेल.

सध्या पाकिस्तानातील नेते त्यांना काही अडचण आल्यास सरळ पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयाकडे धाव घेतात. त्याऐवजी त्यांनी आपल्या समस्यांची उत्तरं सभागृहात शोधायला हवीत. त्यांनी तसे केले नाही तर मात्र पाकिस्तानी सैन्याला राजकारणात हस्तक्षेप करावा लागेल. त्यामुळे दोन्ही बाजूंची परिस्थिती कठीण आहे.

जनरल बाजवा लष्करप्रमुख म्हणून ६ वर्षांच्या कार्यकाळात कोणता वारसा मागे ठेऊन गेले आहेत?

त्यांनी इम्रान खान यांना सत्तेत आणले. आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. तर पाकिस्तानी सैन्याने सुरक्षा, परराष्ट्र धोरण, आणि संरक्षण यांची काळजी घेतली. पण बाजवा अयशस्वी ठरले. हे अपयश ते मागे सोडून जात आहेत. दुसरे म्हणजे त्यांच्या कार्यकाळात डागाळलेली पाकिस्तानी लष्कराची प्रतिमा. 

ही प्रतिमा सुधारण्यासाठी नव्या लष्करप्रमुखांना खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. बाजवा यांच्या कार्यकाळात दहशतवाद उफाळून आला. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे ,कमावलेल्या संपत्तीमुळे पाकिस्तानी लष्कराचे नाव खराब झाले.

नवनियुक्त जनरल मुनीर यांनी सध्या भारतावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा देशांतर्गत समस्या सोडवाव्यात त्यांच्यासमोर (TTP) तहरीक ए तालिबान पाकिस्तान ही समस्या उभी आहे. TTP ने हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

 

Related posts

Leave a Comment