गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी संरक्षण दल दुबईमध्ये प्रात्यक्षिके करून दाखवणार.

संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना सरकारने दुबई आणि अबुधाबी मध्ये भव्य रोडशो आयोजित करण्यास सांगितले आहे. जेणेकरून या क्षेत्रात जास्तीतजास्त लोक गुंतवणूक करतील. हिंदुस्थान ऐरोनौटिक्स (HAL) भारत डायनॅमिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांनी तसेच गार्डन रिच शिप अँड इंजिनियर आणि मिश्र धातू निगम यांनी स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे की ते १२-१५ सप्टेंबर दरम्यान लोकांपर्यंत पोचण्यासाठी खास कार्यक्रमात भाग घेतील. आणि भव्य रोडशो चे आयोजन करतील.

ते या कार्यक्रमात त्यांच्या नजीकच्या काळातील योजनांविषयी माहिती सांगणार आहेत. तसेच बाजारातील स्टॉक विषयी आणि आर्थिक व्यवहारांविषयी माहिती देणार आहेत. जरी या रोडशो मधून सरकार कोणतीही शेअर विक्री करणार नसले. तरी या रोडशो मुळे लोक सरकारी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतील. असा रोडशो केल्यामुळे पीएसयु च्या शेअर्स विक्रीत फरक पडेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

पीएसयू ना मार्केट मध्ये मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या कामाविषयी लोकांना माहित करून देणे. हा या रोडशो मागील उद्देश आहे. यामुळे आता सरकारी क्षेत्रातील कंपन्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या बरोबरीने बाजारात उतरू शकतील. खाजगी क्षेत्रापेक्षा सरकारी क्षेत्राकडे लोकांनी वळावे म्हणून सरकार विशेष मेहनत घेत आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने पीएसयूने सरकारसोबत केलेल्या करारामध्ये काही नवीन गोष्टी घातल्या आहेत. ज्यामध्ये ३ महिन्यातून एकदा डिव्हिडंड दिल्यानंतर भागधारकांची बैठक घेण्यास सांगितले आहे. आणि तेव्हाच कंपनीच्या भविष्यातील योजनांबद्दल गुंतवणूकदारांना माहिती देण्यात येईल. याचे परिणाम हळू हळू दिसू लागले आहेत. सरकारी शेअर्सच्या किमती वाढू लागल्या आहेत.

कंपनीतील व्यवस्थापन सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांमध्ये उत्तम पद्धतीचे भांडवल व्यवस्थापन करणे, जेव्हा आर्थिक मदत किंवा कर्ज घ्यावे लागेल तेव्हा विश्वासार्ह पद्धतीने घेणे, एखाद्या प्रकल्पाला निधी पुरवायचा असेल तर तो कंपनीतील जमा पैशातून घेणे या सगळ्याचा समावेश होतो.

एलआरा कॅपिटल चे उपाध्यक्ष आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ श्री हर्षित कपाडिया यांच्या मते संरक्षण क्षेत्रातील पीएसयू हे संरक्षण क्षेत्रात नसलेल्या पीएसयू पेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. सरकारला सरकारी क्षेत्रातील पीएसयूना खाजगी क्षेत्रातील पीएसयू च्या बरोबरीने उभे करायचे आहे असेही ते म्हणाले. रोडशो आयोजित करणाऱ्या  ५ पीएसयुपैकी हिंदुस्थान अरोनॉटिकस वगळता सर्वांनी किमान शेअरहोल्डिंग चे निकष पूर्ण केले आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स मध्ये ७५.१५ % हिस्सा सरकारचा आहे.

Related posts

Leave a Comment