कवायतीच्या मैदानावर जवानांची मुले, शेतकऱ्यांची मुले, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मुले, एलआयसी एजन्टची मुले, दुकानदारांची मुले कवायती करताना दिसतात. त्यातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील उज्वल कारकिर्दीची चमक दिसते आहे.
फोटो- यशस्वी संचलन करून दाखवल्यावर अग्नीवीर म्हणून निवड झालेली मुले जल्लोष करताना.
कवायतीच्या मैदानावर जल्लोष सुरु होता. प्रशिक्षणार्थी जोर बैठका काढत होते. कारण अग्नीवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुकाने एकमेकांची पाठ थोपटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या शाबासकीचा स्विकार करत ते आपल्या पालकांना भेटायला गेले.
आकाशातून सूर्य आग ओकत होता. पण त्यामुळे या जेमतेम विशीतल्या मुलांना काही फरक पडला नाही. कारण त्यांनी 22 दिवसांचे भारतीय वायुसेनेचे सर्वात खडतर प्रशिक्षण शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण केले होते.
फोटो- जोर काढून आनंदोत्सव साजरा करताना प्रशिक्षणार्थी.
कवायतीच्या मैदानावर जवानांपासून ते दुकानदारापर्यंत सगळ्यांची मुले होती. ती मुले प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होती. कारण पुढील आयुष्यात हाच प्रशिक्षणाचा कालावधी त्यांना कायम ध्यानात ठेवावा लागणार आहे. आता या घडीला मुलांनी अधिकृतपणे भारतीय वायुसेनेचा गणवेश कमावलेला आहे.
आणि आता 8 आठवड्यांच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी त्यांना वायुसेनेच्या बंगलोर ते आसाम यापैकी विविध प्रशिक्षण केंद्रावर जावे लागणार आहे.
कवायत झाल्यानंतर सर्वांनी मिळून आपल्या आईवडिलांशी गप्पा मारल्या. त्यावेळी आपल्या मुलाच्या अंगावरील निळा गणवेश पाहून आईवडिलांच्या डोळ्यात मुलांबद्दलचा सार्थ अभिमान दिसत होता.
फोटो- विविध प्रशिक्षण केंद्रात जाण्याआधी सर्व प्रशिक्षणार्थी एकत्र जमले होते.
पहिली तुकडी 2675 अग्नीवायूवीरांची आहे. ( भारतीय वायुसेनेने त्यांना दिलेले नाव )
त्यातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील उज्वल कारकिर्दीची चमक दिसते आहे. त्यांच्या बॅगा भरलेल्या होत्या कारण आता त्यांना वायुसेनेतील त्यांच्या विभागातील प्रशिक्षणासाठी विविध प्रशिक्षण केंद्रावर जायचे आहे. रडार, क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने यांच्या बाबतीतली सामान्य कामे शिकण्यासाठी.
दोन महिने झाल्यानंतर अग्नीवीरवायू भारतीय वायुसेनेच्या विविध विभागांमध्ये कमीतकमी 4 वर्षे काम करतील. त्यातील फक्त 25% कायमस्वरूपी सेवेत राहतील. आणि बाकीच्यांना 10.4 लाखांचे पॅकेज आणि प्रमाणपत्र देऊन सोडून दिले जाईल. जे बाहेर पडले आहेत त्यांना 10% आरक्षणासहित केंद्रीय पोलीस ताफ्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्याचप्रमाणे रेल्वे मध्ये सुद्धा त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी दिल्या जातील.
फोटो- कवायतीच्या मैदानावर भारतीय वायुसेनेच्या अग्नीवीरवायूंची पहिली तुकडी.
दीप गिरी, 20 जरग्राम जिल्हा, पश्चिम बंगाल, तो म्हणतो ‘मला खरे तर वायुसेनेत अधिकारी (ऑफिसर) म्हणून भरती व्हायचे होते. पण मला त्यात यश आले नाही. जेव्हा अग्नीवीर योजनेची घोषणा करण्यात आली त्यावेळी मी ठरवले की काहीही करून यशस्वी व्हायचेच. दीप गिरीने या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले आहे.
प्रशिक्षणार्थींचे त्यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारावर मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये त्यांना काही गोष्टी करण्यास सांगण्यात आले. जसे की 3-4 किलोचे वजन घेऊन 5 किमी धावणे, गोळीबार करणे, सामान्य सेवा प्रशिक्षण, शैक्षणिक, कवायती इत्यादी.
दीपला एअर मार्शल रधिश यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देण्यात आले. आता तो भारतीय वायुसेनेच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण संस्था बंगलोर इथे पुढील प्रशिक्षण घेत आहे .
फोटो – कु. दीप गिरी त्याच्या पश्चिम बंगालमधील गावातून सर्वोत्तम कामगिरी करणारा म्हणून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दीपच्या वडिलांचे फळांचे दुकान आहे. कलकत्त्याहून पुढे 150 किलोमीटर वर त्यांचं गाव आहे. तिथून ते मुलाचा पदवीदान समारंभ बघायला आले होते. काही दिवसातच ते परतीच्या प्रवासाला निघतील. त्यांनी एका मदतनीसावर दुकानाची जबाबदारी सोपवली आहे. दीप पुढे सांगतो की ‘प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या एका महिन्यात खूप चढ उतार अनुभवायला मिळाले. पण आमचे प्रशिक्षक खूपच छान होते. त्यामुळे मी पटकन गोष्टी शिकू शकलो.
त्याला वायू संरक्षण हा विभाग दिला आहे. पण त्याला वायुसेनेत अधिकारी (ऑफिसर) म्हणून भरती व्हायचे होते. त्यामुळे आता तो वायुसेनेतील स्पर्धा परीक्षा प्रवेश प्रक्रियेची तयारी करत आहे. वायुसेनेत अधिकारी (ऑफिसर) म्हणून भरती व्हावं ही प्रशिक्षणार्थींची इच्छा आहे. त्यामुळे अग्नीवीरवायू होणं हे त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे.
दीप पुढे म्हणतो की ‘मला भारतीय वायुसेनेची तीन तत्वे आवडतात. ध्येय, सचोटी आणि उत्कृष्ट काम करण्याची पद्धत. हाच तो पाया आहे ज्यावर भारतीय वायुसेना उभी आहे. मी त्याचा भाग आहे याचा मला आनंद आहे. ‘
फोटो- अग्नीवीरवायू (प्रशिक्षणार्थी) कवायतीच्या मैदानावर मोकळा श्वास घेताना.
शस्त्रास्त्र प्रशिक्षण केंद्रामध्ये AK-103 आणि इन्सास नावाच्या बंदुकांचे सिम्युलेटर सरावासाठी ठेवले आहेत. मोठा डिजिटल पडदा तिथे बसवण्यात आला आहे. ज्यावर आभासी नेम धरून सराव केला जातो. ज्यामुळे दिवसा किंवा रात्री हल्ला झाल्यास बंदुका कशा चालवाव्या हे प्रशिक्षणार्थीना कळते.
फोटो- आतमध्ये असलेले बंदूक सराव प्रशिक्षण केंद्र
साताऱ्याच्या कु प्रसाद बापूराव कदम याला सर्वोत्कृष्ट निशाणेबाज हे सन्मान चिन्ह देण्यात आले. हा एका शिंप्याचा मुलगा आहे. प्रसादच्या वडिलांना सैन्यात भरती व्हायचे होते. त्यांची ती इच्छा आता मुलगा पूर्ण करत आहे.
प्रसाद म्हणतो ‘या पाच महिन्यात मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त. ‘ चांगला निशाणेबाज कसा ओळखावा तर त्याच्या स्थिरतेवरून चांगल्या निशाणेबाजाच्या अंगी चंचलता असून उपयोग नाही असे तो सांगतो. तो पुढे म्हणतो की चांगला निशाणेबाज होण्यासाठी बंदुकीवर तुमची पकड चांगली हवी. ट्रिगर तुम्हाला नीट वापरता आला पाहिजे. तुमची नजर तुमच्या लक्षावरच असली पाहिजे. असे तो आत्मविश्वासाने सांगत होता. मधूनच इंग्रजी, मधूनच मराठीतून बोलत होता. प्रसाद सध्या भारतीय वायुसेनेच्या दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेत आहे.
फोटो- कु प्रसाद बापूराव कदम कमांडर इन चीफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल आर राधिश यांच्या कडून सन्मान चिन्ह स्वीकारताना.
राजस्थान जोधपूर इथे रघुवीर सिंग राहतो. तिकडे सतत पाऊस कोसळत होता. त्यामुळे गावातले सर्व लोक त्याच्या घरच्यांना कवायतीला जाऊ नका असे सांगत होते. त्यांनी शेवटच्या क्षणी येण्याचे रद्द केले. कारण पावसापासून शेताचे संरक्षण करणे गरजेचे होते. रघुवीर सांगत होता. सर्वोत्कृष्ट प्रात्यक्षिके करून दाखवल्याबद्दल त्याला सन्मान चिन्ह देण्यात आले.
ड्रिल हा स्वयंशिस्तीचा पाया आहे असे सैन्यातील लोक म्हणत असतात. त्यादिवशी सकाळीच रघुवीर त्याच्या आजोबांशी
(भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार) फोनवर बोलला.
फोटो- कु. रघुवीर सिंग हा जोधपूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे.
‘मी आजोबांचा खूप लाडका आहे. आणि त्यांना माझा अभिमान आहे. ‘ रघुवीर सांगत होता. रघुवीर सध्या पुण्याच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये रडार कसा चालवावा याचे प्रशिक्षण घेत आहे. प्रात्यक्षिकांचा सर्वात कठीण भाग कोणता यावर तो उत्तर देतो की जर तुम्ही सर्व करत राहिलात तर कठीण काहीच नाही.
रघुवीर सांगतो की सर्व केल्याने तुमच्या हातून चुका होत नाहीत. चार बहिणींमध्ये हा सर्वात धाकटा भाऊ आणि एक भाऊ बांधकाम क्षेत्रात व्यवस्थापक आहे. आमच्या कुटुंबाच्या मालकीची 80 हेक्टर जमीन आहे . तो जेव्हा त्याच्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असे ते दिवस त्याला आठवतात. त्याचे काका कॅप्टन म्हणून निवृत्त झाले असून आतेभाऊ भारतीय नौदलात आहे. आता तो फौजेत भरती व्हायला उत्सुक आहे. त्याने जयहिंद म्हणून आपले बोलणे संपवले. त्या दिवशी आम्ही ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो त्या सगळ्या अग्नीवीरांनी असेच केले.
फोटो- बहुतेक अग्नीवीरवायूंना वायुदलात अधिकारी म्हणून भरती व्हायचे आहे.
या 22 आठवडयांनी त्यांच्यात पूर्णपणे परिवर्तन घडवून आणलं आहे. त्यांना शिस्तबद्ध, दुसऱ्यांवर प्रभाव पाडणारे व्यक्ती बनवलं आहे. ही भारतमातेच्या सेवेची एक नवी सुरुवात आहे. त्यांना पाहिलं की उर अभिमानाने भरून येतो.
