भारताच्या हरित क्रांतीचे शिल्पकार एम. एस. स्वामिनाथन यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन.

दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरित क्रांतीचे शिल्पकार डॉ मानकोंबू सांबशिवन स्वामिनाथन यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते चेन्नई इथे राहत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना, कन्या सौम्या, मधुरा आणि नित्या असा परिवार आहे.

डॉ स्वामिनाथन यांचा जन्म तामिळनाडू राज्यात कुंभकोणम इथे 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला. तिकडेच त्यांचे बालपण व्यतीत झाले. आणि शालेय शिक्षण देखील तिथेच झाले. त्यांचे वडील एम के सदाशिवन हे डॉक्टर होते तर आई पार्वती थांगमल ही गृहिणी होती. स्वामिनाथन यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज तिरुअनंतपुरम इथून पूर्ण केले तर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कोईम्बतूर शेतकी महाविद्यालय (तामिळनाडू शेतकी विद्यापीठ) इथून पूर्ण केले.

त्यांनी हरितक्रांतीच्या यशासाठी श्री सी सुब्रमनियन आणि श्री जगजीवनराम या कृषिमंत्र्यांसोबत काम केले होते. रासायनिक आणि जैविक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आखलेल्या हरितक्रांतीच्या कार्यक्रमामुळे गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

श्री स्वामिनाथन हे 2007 ते 2013 या काळात राज्यसभेचे सदस्य होते. या काळात त्यांनी राज्यसभेत भारतीय शेतीतील समस्यांबाबत भाष्य केले होते. 1987 साली त्यांना जागतिक अन्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मद्रास इथे एम एस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली.

Related posts

Leave a Comment