परफ्युम व्यापारी पियुष जैन यांच्या रेड चा दुसरा भाग  बनवणार कुमार मंगत पाठक ज्याचे नाव असेल रेड २ डिटेल्स सांगितले.

बॉलीवूड हंगामा न्यूज नेटवर्क. निर्माते कुमार मंगत पाठक त्यांच्या २०१८ मधील रेड या सिनेमाचा पुढील भाग रेड ची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी मंगळवारी जाहीर केले. अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कानपुर येथे असलेल्या पियुष जैन यांच्या घरावरील रेड तसेच कनौज मध्ये असलेल्या त्यांच्या कारखान्यावरील रेड्स या चित्रपटात दाखवल्या जातील. वाराणसीतील तीन दिवसांच्या काशी चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या सत्रात झालेल्या चर्चेदरम्यान पाठक यांनी ही घोषणा केली. पाठक यांनी दृश्यम, खुदा हाफिज यासारखे चित्रपट बनवले आहेत. ते म्हणाले की रेड २ मध्ये घराच्या भिंतीतून पैसा बाहेर येताना दाखवला जाणार आहे. जसे पियुष जैन यांच्या बाबतीत घडले होते. त्यामुळे ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही.

या व्यतिरिक्त पाठक यांनी एका मॅगझीन च्या वक्त्याशी संवाद साधला आणि चित्रपटाची स्क्रिप्ट (संहिता) तयार असल्याचे सांगितले. स्क्रिप्ट एका माजलेल्या, अहंकारी राजकारण्याबद्दल आहे. ज्याला त्याचे हक्क मिळाल्यावर त्यांचा दुरुपयोग केल्यामुळे माणूस यशाच्या शिखरावरून कसा क्षणात खाली येतो हे दाखवले आहे. या कथेत त्याचा एक सामान्य माणूस ते एक मुरलेला पोचलेला राजकारणी जो सत्तेसाठी काहीही करू शकतो त्याचा हा प्रवास आहे. मालमत्तेवर छापा घालूनच तो एवढा गर्भश्रीमंत झाला असे यात दाखवण्यात आले आहे. वरिष्ठ इनकम टॅक्स ऑफिसर अमेय पाठक ( जो अजय देवगण ने साकारला आहे) त्याची धाडसी कामगिरीही यात दाखवण्यात आली आहे. अजय एका भ्रष्ट राजकारण्याला पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या जीवनशैलीपर्यंत घेऊन जाताना दिसणार आहे.

Related posts

Leave a Comment