चांगली न्यायव्यवस्था, प्रशासन हा चांगल्या अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्राचा पाया आहे.

चांगली न्यायव्यवस्था, प्रशासन हा चांगल्या अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्राचा पाया आहे. ज्या राष्ट्राची न्यायव्यवस्था प्रशासन चांगले असेल त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम असते आणि तेच राष्ट्र बलशाली असते. प्रत्येक देशामध्ये हजारो कायदे असतात, नियम असतात. ज्यामुळे त्या देशात सुव्यवस्था टिकून राहते. खरतर हजारो केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आणि तेवढ्याच केसेस रोज दाखल होत आहेत. यावरून आपल्याला असे दिसते की एक व्यक्ती म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला समान वागणूक देण्यात कमी पडतो. बहुतेक वेळा आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण लोकांशी संबंध ठेवतो. एका कंपनी बाबत बोलायचे झाले तर जिथे शेर होल्डर्स चे २ प्रकार आहेत एक म्हणजे ज्यांनी कंपनी सुरु केली ते फाउंडर्स आणि इतर ग्राहक वैगरे. दोघांनाही समान वागणूक मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकतो का? कोणताही कायदा किंवा नियम याची खात्री देऊ शकत नाही आणि कोणतीही जबरदस्ती करून चांगलं कोर्पोरेट वातावरण तयार होत नाही. ते मुळात असावं लागतं. कॅडबरी कमिटी च आपण उदाहरण पाहू ज्याची सुरुवात लंडन स्टॉक एक्सचेन्ज ने १९९१ साली केली. कंपनी मध्ये चांगले कोर्पोरेट वातावरण निर्माण करण्यासाठी जगभरात कितीतरी नियम कायदे केले जातात पण वाईट वर्तणूक कशानेही थांबलेली नाही.

मोठ्या कंपन्यांमधील घोटाळे हळूहळू समोर येतच आहेत. आपण एखाद्याच्या स्वार्थापायी निर्माण झालेला आर्थिक घोटाळाही पाहिला आहे. हे कशामुळे झाले तर कंपनीतील चुकीच्या वागणुकीला प्रोत्साहन दिल्यामुळे. अशा परिस्थितीत जर कंपनी मध्ये चांगले कॉर्पोरेट वातावरण असेल, नियमांचे पालन केले जात असेल तर स्टेकहोल्डर्स, शेर होल्डर्स इतकेच नाही तर सप्लायर्स, काँट्रॅक्टर्स, कर्मचारी, गुंतवणूकदार यांना समान वागणूक मिळू शकते. बरीच मोठी यादी तयार होईल. काही चांगल्या कंपन्या आपल्या मॅनेजमेंट ने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसतात. जसे की कंपनी च्या बोर्ड वर कोण व्यक्ती आहेत त्यांचा खुलासा करणे, कंपनी चे आर्थिक व्यवहार लोकांसमोर स्पष्टपणे मांडणे, कोर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटीचे (CSR) पालन करताना दिसतात. तर काही कंपन्या फक्त दिखावा करतात की आम्ही नियम पाळत आहोत म्हणून. प्रत्यक्षात मात्र नियम पाळत नाहीत. या बाबतीत मनी लाईफ फाउंडेशन ही माझी पहिली जबाबदारी आहे. आमच्या कंपनी तील कॉर्पोरेट वातावरण ही चांगले आहे. कंपनीला मिळालेला गव्हर्नन्स अवॉर्ड ही त्याचीच पावती आहे.

ही कल्पना जेव्हा २०१९ मध्ये पहिल्यांदा मला सुचली तेव्हा आम्हाला या पुरस्काराला पात्र असलेल्या व्यक्ती मिळतील की नाही अशी शंका होती. आम्हाला फक्त आमच्या टेक्निकल टीमलाच पुरस्कार द्यायचा नव्हता. तो तर आजकाल बऱ्याच कंपन्यांमध्ये दिला जातो. आम्हाला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. मग आम्ही आमच्या इतर कंपन्यातील मित्रांशी चर्चा केली. मनी लाईफ चे मेंबर्स, गुंतवणूकदार अँलिस्ट, यांच्याशी बोललो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की आम्हाला ३५ जणांची पुरस्काराला पात्र असणाऱ्यांची यादी मिळाली. बरेच गुंतवणूकदार आमच्या काम करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करत आहेत. आणि पुरस्कारामागील हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून यात सहभागी व्हायचे की नाही हे त्यांना ठरवता येईल.

शेवटच्या फेरीत पोचलेले पाच स्पर्धक सर्वोत्तम आहेत त्यांनी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे, काम करताना दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी स्टेक होल्डर्स च्या मनात स्थान निर्माण केले आहे. महत्वाचे म्हणजे ते काम करताना मन लावून काम करतात. आपल्याला नियम पाळायचे आहेत. काम केलंच पाहिजे म्हणून ते काम करत नाहीत. आणि हेच तर त्यांच्यातील वेगळेपण आहे. एखाद्या कंपनीबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हेच प्रमोटर्स चे आणि पर्यायाने त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे काम असते.

तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी आमच्या मुलाखती पहिल्या असतील त्यांना वाटत असेल हे किती मुलाखती देत असतात. पण खरं सांगायचं तर हे दिसत तितकं सोप्प नाही. त्यासाठी आम्हाला आभार मानायला हवेत गौतम बाफना आणि त्यांच्या टीम चे ज्यांनी मॅनॅजमेण्टचे पगार, थर्ड पार्टीचे व्यवहार हे सगळं सांभाळायला आम्हाला मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच आम्ही आज इथपर्यंत पोचू शकलो. आम्ही प्रत्येक स्पर्धकाला कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल विचारलं. सगळ्यांनी एकच उत्तर दिलं. प्रमोटर्स कंपनीबद्दल काय विचार करतात ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स मुळे कळतं. एखादी कंपनी चालवताना सर्वांना समान वागणूक देणे, कोणावरही अन्याय होऊ न देणे, आपल्या सहकाऱ्यांशी चांगले वागणे थोडक्यात कंपनीतील वातावरण चांगले ठेवणे ही तत्वे जर प्रमोटर्स नी पाळली तर ती कंपनी चांगली आहे असे आपण म्हणतो.

एखाद्या कंपनीचा मालक हा कुठल्यातरी घोटाळ्यात सामील असेल तर ती कंपनी वाईट असते. पण मी असेही लोक पाहिले आहेत ज्यांना कंपनीबद्दल, मालकाबद्दल बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी माहित असतात तरी सुद्धा ते त्याच कंपनी त पैसे गुंतवतात. जेव्हा नियमांचा प्रश्न येतो तेव्हा कुटुंबाला महत्व द्यायचे की कामाला हा वादाचा मुद्दा असतो. एका स्पर्धकाने यावर समर्पक उत्तर दिले. एखाद्या कंपनीतील कर्मचारी खूप काम करत असेल, तर कुटुंबाने हे समजून घ्यायला हवे की त्याने जर आज मेहनत घेऊन काम केले तर भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. आज जो वेळ तो कंपनीला देतो आहे . १०वर्षानंतर हाच वेळ तो कुटुंबासाठी देईल. एखादा व्यावसायिक किती वर्ष काम करेल सांगता येत नाही. विशेषतः जेव्हा गुंतवणूकदारांचा त्याच्यावर दबाव असतो.

मला खटकणाऱ्या आणखीही काही गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कंपनीचा मालक स्वतःच स्वतःसाठी वॉरंट काढतो. ही खूप चुकीची गोष्ट आहे. पहिली म्हणजे कंपनीचा मालक स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणतो. ही खूप चुकीची गोष्ट आहे तो शेर होल्डर्स ना असे सांगून भुलवतो की आमची कंपनी इंटरेस्ट फ्री लोन देते. तुम्हाला एकही हफ्ता भरण्याची गरज नाही सर्व हफ्ते आम्ही भरू वैगरे. मला नेहमी प्रश्न पडतो की एवढ्या सगळ्यांचे हफ्ते भरण्यासाठी त्या मालकाजवळ एवढे पैसे येतात कुठून? असे प्रकार करून शेर होल्डर्सचे नुकसान करणाऱ्या कंपन्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स च्या नियमांचे पालन करत नाहीत.

असाच प्रकार वोटिंग राईट्स नसलेल्या शेअर्सच्या बाबतीत पाहायला मिळतो. खूप वर्षांपूर्वी जगलजीत इंडस्ट्री च्या बाबतीत हाच प्रकार घडला होता प्रत्येक शेअर ला दोनदा वोट्स दिले गेले. प्रत्येक शेअर ला सारखेच वोटिंग व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही आणि यावर कोणतीही कारवाई ही केली गेली नाही. कोणतेही वोटिंग न करता जर कोणी शेअर्स विकत घेत असेल तर ठीक आहे. पण मग त्याला शेअर्स तरी का म्हणायचे? ते बँकांनी दिलेले कायमस्वरूपी कर्जच म्हणावे लागेल. मला खटकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे कंपनी साठी डायरेक्टरची नेमणूक करणे. मला असे वाटते की सर्वकाही कंपनीच्या मालकावर अवलंबून आहे. मालकच जर आपल्या कामाशी प्रामाणिक नसेल तर डायरेक्टर नेमून तरी काय उपयोग? कारण डायरेक्टर शेवटी मालकाचीच 'भाषा' बोलणार. (अर्थात यावर सगळ्यांचे एकमत होईल असे नाही).

मी पुष्कळ अशा बोर्ड मिटींग्स पाहिल्या आहेत. जिथे बोर्ड मेंबर्स ना फक्त तेवढंच माहित असत जेवढं कंपनीचा मालक त्यांना सांगतो. जर नियमांचे पालन करताना कंपनीसाठी डायरेक्टर नेमायची वेळ आली तर त्यांच्या पासून मालकाने काही लपवू नये. पण बरेच वेळा असे होताना दिसत नाही. पण काही चांगले लोकही आहेत. पण पुरेशी माहिती नसल्यामुळे ते काही करू शकत नाहीत. काही चांगल्या कंपन्यांनी डायरेक्टर्सना काढून टाकले कारण मॅनॅजमेण्टमध्ये गैरप्रकार होत असताना त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. डायरेक्टर्स घालून दिलेले काही नियम त्यांनी पाळले तर हळू हळू कंपनी चांगल्या मॅनॅजमेण्टच्या दिशेने वाटचाल करेल. कंपनी चांगली मॅनेज करणे म्हणजे सगळ्या स्टेकहोल्डरना समान रिटर्न्स मिळतील हे पाहणे.

ज्या व्यक्तींनी कष्ट करून, दिवसरात्र मेहनत घेऊन कंपनी सुरु केली त्यांना योग्य तो पगार मिळणे गरजेचे आहे. पण मग मालकानेही कंपनीतील कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक द्यायला हवी. कर्मचाऱ्यांना फक्त पगार देऊन मालकाची जबाबदारी संपत नाही. तर कंपनीमध्ये कामासाठी योग्य वातावरण ठेवणे, कामाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांची विचारपूस करणे, कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येणार नाही हे पाहणे ही सुद्धा मालकाची जबाबदारी असते. पण बऱ्याच मोठ्या कंपन्या असे करताना दिसत नाहीत. त्यांना असे वाटते की फक्त वेळेवर पगार आणि बोनस दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली. कंपनी चांगल्या प्रकारे चालवणे म्हणजे ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बरोबरीने वागवणे. कंपनी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे पण सगळेच नियम पाळले जात नाहीत.

पहिला मनी लाईफ गव्हर्नन्स पुरस्कार ग्राहकांसाठी फक्त झलक आहे. यामध्ये अशा काही कंपन्यांच्या मालकांना बोलवलं जाणार आहे ज्यांच्या मनात त्यांच्या स्टेकहोल्डर्स विषयी आदर आहे. ५००० कंपन्यांच्या यादीतून आम्ही यावेळेस फक्त ३५ कंपन्यांना नॉमिनेशन दिले आहे. काही चांगल्या कंपन्या या त्यांच्या ग्राहकांमुळे आणि स्टेकहोल्डर्समुळे ओळखल्या जातात. अशा कंपन्या इथे जास्त आहेत. मी कंपनीच्या ग्राहकांना एकच सांगेन की जर तुम्ही गुंतवणूक करत असलेली कंपनी सर्व दृष्टीनी चांगली असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही. मग असे खूप पुरस्कार मिळतच राहतील. मला असं वाटत की आपण जर चांगल्या आणि नियमांशी बांधील असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर उद्या कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत ग्राहकांचे हित जपले जाईल हे नक्की. हाच खरा गुंतवणूक करून निर्धास्त राहण्याचा मार्ग आहे. कोर्पोरेट गव्हर्नन्स पुरस्कार सोहळा ६ जानेवारी २०२२ लासंध्याकाळी ६ वाजता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्की पहा.   

Related posts

Leave a Comment