मंगळसूत्राला आपल्याकडे सौभाग्यालंकार असे म्हटले जाते. फार वर्षांपूर्वी हा फक्त एक धागा म्हणून अस्तित्वात होता. या धाग्याबरोबर इतरही दागिन्यांनी वधूला सजवले जात असे. पारंपरिक मंगळसूत्रामध्ये सुद्धा आता विविध समाजाच्या प्रथेप्रमाणे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वर्गीकरणच करायचं झालं तर काही मंगळसूत्र छोटी असतात, काही मोठी असतात, काही ठाशीव असतात. थोडक्यात मंगळसूत्रही आता आधुनिक होत आहे. मंगळसूत्राचा उल्लेख कोणत्याही धार्मिक ग्रंथात ’सौभाग्यालंकार’ म्हणून केलेला नाही.
हिंदू धर्मात ज्याला सौभाग्यालंकाराचे स्थान आहे. अशा मंगळसूत्राचा गैरवापर प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यसाचीने त्याच्या एका जाहिरातीत केला असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर येत आहेत. ही जाहिरात आता जरी मागे घेण्यात आली असली तरी यानिमित्ताने पुन्हा काही प्रश्न निर्माण झाले आहेत. जुन्या काळात मंगळसूत्र हा फक्त एक दागिना होता. वधूने इतर दागिन्यांसोबत घालायचा तो एक दागिना एवढयापुरतेच महत्व मंगळसूत्राला होते. ङ्गपूर्वीच्या काळी मंगळसूत्र विवाहाच्या प्रसंगी समारंभपूर्वक स्त्रीच्या गळ्यात घातले जात नसेङ्घ. जसे आजच्या काळात आपण मंगळसूत्राबरोबरच इतरही दागदागिने घालतो.

पूर्वीच्या काळी स्त्रीच्या अंगावर दागिने असणं हे शुभ मानलं जायचं. स्त्री दागिन्यांनी सजलेली आहे म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे असे मानले जाई, ज्या स्त्रिया विधवा आहेत किंवा ज्यांनी संसाराचा त्याग केला आहे, अशा स्त्रिया दागिने घालत नसत. अथर्ववेदात सांगितल्याप्रमाणे वधूचे वडील म्हणतात की दागिन्यांनी सजलेली माझी मुलगी मी तुला म्हणजेच वराला देतो. थोडक्यात कन्यादानाचा विधी. मनुस्मृती मध्ये वधूच्या दागिन्यांना ’स्त्रीधन’ म्हटले आहे. अशी संपत्ती जी तिच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये लग्नातले दागिने विधवा झाल्यानंतर आणि म्हातारपणी आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी कामाला येतात. मंगळसूत्र म्हणजे पवित्र धागा.
पूर्वीच्या काळात किंवा आजही हळद कुंकवामध्ये बुडवलेला धागा वधूच्या मानेवर किंवा मनगटावर बांधला जातो. थोडक्यात मंगळसूत्र म्हणजे वाईट ग्रहांच्या प्रभावापासून वाचण्यासाठी आणि धीर देण्यासाठी बांधलेला धागा. इतिहास काळात (500 BCE 500 AD) पण वराने वधूच्या गळ्यात धागा किंवा तार बांधल्याचा उल्लेख आला आहे. (३०० इउए, ३०० उए) जो मंगळसूत्र तेव्हा उपलब्ध असल्याचा पुरावा असू शकतो.

लग्नाच्या वेळी गळ्यात मंगळसूत्र घालण्याची पद्धत ही पारंपरिक आहे. धार्मिक नाही. जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीप्रमाणे वर-वधू एकमेकांना पवित्र धागा बांधत. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे गुरुकुलातील गुरुजी आपल्या शिष्यांच्या हातात धागा बांधत. पण नंतर हळूहळू ही पद्धत बंद झाली. त्या धाग्यालाच पुढे तिरुमंगलम किंवा मंगळसूत्र म्हटले जाऊ लागले. मंगळसूत्र जर एखाद्या स्त्रीच्या गळ्यात असेल तर ती ’विवाहित’ असे मानले जाऊ लागले.
’’या धाग्याबरोबर अनेकदा एखाद्या पवित्र झाडाचे पान, वाघाचा पंजा, किंवा प्रत्येक समाजात शुभ मानल्या गेलेल्या गोष्टी लॉकेटच्या स्वरूपात असायच्या’’. वर्षांमागून वर्षे गेली आणि त्याबरोबर मंगळसूत्रातील प्रकारही विविध समाजांमध्ये आणि जातीप्रमाणे बदलत गेले. उदा. केरळ आणि तामिळनाडू मंगळसूत्राला ताली म्हणतात. ताली म्हणजे पामच्या झाडाची एक जात किंवा पामच्या झाडाचे जंगल. आजही गोंड, सावरा, मुंडा या जातींमध्ये वर-वधूच्या गळ्यात पामचे पान असलेली एक तार बांधतात.

या जातीतील लोक निसर्गाच्या बाबतीत किती जागरूक असतात हे तालीतील विविध प्रकारांमधून दिसून येते. उदा. अमाई ताली वर कासवाचे चिन्ह असते तर पुलीपली ताली मध्ये महादेवाचे लिंग किंवा जातीवाचक ३ आडव्या रेषा असतात. तालीचा सर्वात सुंदर प्रकार तामिळनाडूमधील चेट्टीनाडच्या नट कोताई चेट्टीयारचा हार आहे. हे लोक पुहार या प्राचीन बंदरातून आलेले आहेत. आणि महादेव हे त्यांचे आराध्य दैवत आहे. चिदंबरम मधील नटराजाचं मंदिर हे त्यांचे महत्वाचे स्थान आहे.
या हारामध्ये दोन आडव्या मण्यांच्या ओळी असतात आणि मण्यांच्या मध्ये पेंडंटचे तुकडे असतात. आणि मध्यभागी तालीचे एक मोठे पेंडंट असते. पारंपरिक हारामध्ये इंग्रजी ‘च’चा आकार असतो आणि त्याच्या मध्यभागी चिदंबरम मंदिराची छोटी आकृती असते. या मंदिरात शिव पार्वतीची मूर्ती नंदीवर विराजमान आहे. दोन्ही बाजूच्या खांबांवर चेट्टीनाडच्या शिल्पकलेचे नमुने आहेत. मंगळसूत्र गळ्यात घालण्याची पद्धत हिंदूंव्यतिरिक्त इतरही धर्मात आहे. उदा.केरळमधील सीरियन ख्रिश्चन मध्यभागी क्रॉस असलेले मंगळसूत्र घालतात. काही जातींमध्ये मंगळसूत्र घालत नाहीत. तर मंगळसूत्रासारखीच पवित्रता असलेले दुसरे दागिने घालतात.

उत्तर भारतातील काही भागांमध्ये पायांमध्ये जोडव्या आणि बिचवा तसेच हातामध्ये बांगड्या घालण्याची पद्धत आहे. काश्मीरमध्ये कानाच्या पाळ्यांमधून एक लांब दोरी बांधून त्याच्या शेवटी दागिना घालण्याची पद्धत आहे. बंगालमध्ये शंख आणि शिंपल्यांच्या बांगड्या हातात असतील तर लग्न झाले आहे असे मानण्यात येते. पोळ्यातील लोखंड हे वेळ आल्यास एखादी स्त्री संकटकाळात किती खंबीरपणे उभी राहू शकते याचे प्रतीक आहे. यामध्ये शिष्याचाही समावेश होतो. असे मानले जाते की थोडे शिसे रक्तामध्ये मिसळलेले चांगले असते. गरोदर स्त्रियांसाठी हे खूप महत्वाचे आहे. गळ्यात शिंपला असणे हे कोळी बांधवांमध्ये शुभ मानले जाते. हा शिंपला म्हणजे सुबत्ता आणि दीर्घायुष्य यांचे प्रतीक आहे.
आताच्या काळात काही मार्केटिंग कंपन्यांनी हिऱ्याच्या अंगठीचे रूपांतर लग्नासाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंमध्ये केले आहे’ म्हणूनच प्रत्येक वधूला ती रिंग हवी असते. यावरून बायकोवर नवऱ्याचे किती प्रेम आहे हे कळते. यावरून पारंपरिक मंगळसूत्राच्या संकल्पनेमध्ये किती बदल झाला आहे हे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्रात मंगळसूत्र हा फक्त एक दागिना नसून मराठी स्त्रीसाठी ते तिचे स्त्रीधन असते. ते तिच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. अगदी साधे मंगळसूत्र म्हणजे दोऱ्यात ओवलेली काचेच्या काळ्या मण्यांची दोन पदरी माळ असते. माळेच्या मध्यभागी सोन्याचे चार गोल मणी व सोन्याच्या दोन वाट्या बसविलेल्या असतात. विवाहाची अर्थपूर्णता ‘मंगळसूत्र’ या प्रतिकाची मानली गेली आहे. मंगळसूत्र घातल्यावर कुमारिकेचे सवाष्णीत रुपांतर होते.
