धार्मिक कट्टरता आणि धर्मांतराचे वाढत्या प्रभावाबद्दल प्रतिनिधी सभेत व्यक्त झाली चिंता!

१२ मार्च २०२२ रविवार रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात रा. स्व संघाने राष्ट्रीयत्वाबद्दल, सांस्कृतिक मूल्यांबद्दल, आपल्या परंपरांबद्दल समाजात जो काही अपप्रचार केला जात आहे तो थांबवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. अहमदाबाद इथे झालेल्या रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत वाढती धार्मिक कट्टरता हा 

खरोखरच भारताच्या दृष्टीतून चिंतेचा विषय असल्याचे सांगितले आहे. आणि एक विशिष्ट समूह सरकारी यंत्रणेत येण्याचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे’ असे ही सांगितले.

वार्षिक अहवालात रा.स्व. संघाकडून व्यक्त करण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे –

१. हिंदू समाजातच काही समाजकंटक प्रवृत्तींकडून समाजात दुही माजवण्याचे प्रयत्न होत आहेत.

जनगणनेचे वर्ष येऊ घातले असताना ‘तुम्ही हिंदू नाही’ असा अपप्रचार करून काही लोकांना भडकवले जात आहे. 

२. याच पार्श्व्भूमीवर वार्षिक अहवालात म्हटले आहे की राष्ट्रीयत्व, हिंदू समाजाचा इतिहास, मूल्ये, परंपरा याबद्दल खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी आणि त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.

३. या वाढत्या धार्मिक कट्टरतेचे रूप भयानक आहे. हीच समस्या देशात बऱ्याच ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. केरळ तसेच कर्नाटक मधील संघटनांच्या कार्यकर्त्यांची झालेली निर्घृण हत्या हे याचे उदाहरण आहे.

४. सामाजिक मोर्चे, निषेध, सामाजिक नियम मोडणे, हिंसाचार करणे आणि त्याच्याशी निगडित कृतींना प्रोत्साहन देणे हे प्रकार वाढत आहेत.

५. सरकारी यंत्रणेत शिरून यंत्रणा कब्जात घेण्यासाठी विशिष्ट समुदाय सक्रिय असल्याचे जाणवते आहे. कदाचित हे खूप मोठे  षडयंत्र असू शकेल जे दीर्घकाळ चालणारे आहे.

६. देशाच्या विविध भागात हिंदूंचे धर्मांतरण सुरु असल्याची माहिती सतत समोर येत आहे. या घडत असलेल्या गोष्टी थांबवण्यासाठी समाजातून आणि धार्मिक संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत यात शंका नाही. पण ते अजून योग्य पद्धतीने, सामूहिक रित्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले गेले तर उद्याच्या भारताचे चित्र काही वेगळेच असेल.

(क्वान्ट मध्ये आम्ही जनतेला उत्तरे द्यायला बांधील आहोत पत्रकारितेला योग्य आकार देण्यासाठी आमचे सभासद व्हा.)

Related posts

Leave a Comment