डॉ. वॉल्टर विरिया यांचे डोळ्यात अंजन घालणारे अनुभव

 माणसाने भूतकाळात झालेल्या चुकांपासुन काहीतरी शिकायला हवे, असं म्हणतात. पण शिकेल तो माणूस कसला? त्यामुळे तो नेहमीच तोंडावर पडत असतो. आणि चुका सुधारायच्या सोडून आणखी चुका करत जातो. पण काही गुण माणसामध्ये आवश्यक असतात. जसे की माणसाच्या अंगी समजूतदारपणा असावा. तुमचं काम पाहून कंपनीला विश्वास वाटायला हवा की याला एकदा काम दिले की तो ते काम अचूक करू शकेल. असे गुण असलेली माणसं कंपनीला/मॅनेजरला हवी असतात. आपल्या कामाशी नेहमीच प्रामाणिक राहणे शक्य आहे का? की बदमाशी करण्यासाठी सुद्धा वाव आहे. हे विचार माझ्या मनात आले जेव्हा मी वर्तमानपत्रातील एक लेख वाचला. एका झोपडीत राहणारा सात वर्षांचा मुलगा त्या झोपडीबाहेर खेळत होता. 

तेवढ्यात त्याने रिक्षातून एक मोठं पाकीट जमिनीवर पडताना पाहिलं. साहजिकच प्रवाशाच्या ते लक्षात आलं नसावं. त्या मुलाने ते पाकीट उचललं आणि घरी घेऊन आला. त्याच्या बाबांनी ते पाकीट उघडलं तर त्यात ५ लाख रुपये होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिकडे बाबा आपल्या मुलाला घेऊन गेले. आणि थोडावेळ दोघंही थांबले. कारण त्या पाकिटाचा मालक ते शोधत येण्याची शक्यता होती. आणि झालेही तसेच. १५ मिनिटातच रिक्षातून एक माणूस आला (या आशेवर की त्याचे पाकीट कोणीही उचललं नसावं.) त्याला खूप आनंद झाला. त्याने पाकीट शोधणाऱ्याला काही पैसे बक्षीस दिले.

 

ज्याला वस्तू सापडली त्याच्या मालकीची ती झाली या न्यायाप्रमाणे बापलेक ते पाकीट स्वतःजवळ ठेऊ शकले असते. कारण ते पाकीट कोणाचं आहे हे त्यांना माहित नव्हतं. पण त्यांना असं वाटलं असावं की त्या पाकिटाच्या मालकाला शोधल्याशिवाय असं काही करू नये. मला असं वाटत की या बातमीला जास्त जागा द्यायला हवी होती. (नाहीतरी आजकाल आपण बलात्काराच्या, भोंग्यांच्या बातम्या पान भरून आणि मोठ्या चवीने वाचत असतो.) यामुळे प्रामाणिकपणाच्या मर्यादांबद्दल आणि तोट्यांबद्दल मी विचार करायला लागलो. बँकाकडून लाखांचे कोटी करून ग्राहकांना फसवल्याच्या घटना घडल्या आहेत.

Veeta इंजिनेरींग कंपनीला गुणवत्तेबाबत काही तक्रारी होत्या. त्या कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर आणि क्वॉलिटी कंट्रोल मॅनेजर दोघंही आपसात काहीतरी बोलले आणि त्याने एका क्षणात सर्व तक्रारींचा निकाल लावला. आमची उत्पादने ISI (ISI ही प्रमाणपत्र योजना आहे.) प्रमाणित आहेत. जर ग्राहकांना त्याहून उच्च दर्जाची उत्पादने हवी असतील तर त्यांनी दुसरीकडे जावे. चांगली गुणवत्ता देऊन विक्री करणे हेच आमचे ध्येय आहे. उच्च प्रतीची गुणवत्ता आम्ही देऊ शकत नाही. म्हणजेच मार्केटिंग आणि कॉलीटी कंट्रोल अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी देवाणघेवाण झाली हे स्पष्ट आहे.

खूप वर्षांपूर्वी मी लंडनमध्ये असताना मी माझ्या राज नावाच्या मित्राला भेटलो. तो म्हणाला की तुझ्या कुटुंबाला काही मेसेज द्यायचा आहे का? (माझे कुटुंब तेव्हा मुंबईला वास्तव्यास होते. आणि तेव्हा मोबाईल फोनचा शोध लागला नव्हता.) मी म्हणालो हो पण दिवसभरात कधीतरी टेलिफोन बूथ वर जाऊन मी हे काम करेन. त्यावर तो म्हणाला की मेसेज जर जास्त वैयक्तिक नसेल तर तो स्वतः माझ्या कुटुंबापर्यंत मेसेज पोचवेल. तो ज्या विमा कंपनीत कामाला होता तिथून तो त्याच्या कुटुंबाला आठवड्यातून दोनदा फोन करत असे. ‘त्यांना काही फरक पडत नाही रे. हे असले छोटे खर्च मॅनेज करणं म्हणजे त्यांच्या हातचा खेळ आहे.’ असे तो म्हणायचा. शेवटच्या वाक्यावरून सर्व काही लक्षात येतं. मी हो म्हणायला हवं होतं का ?

ऑफिस ९.३०ला सुरु व्हायच्या आधी भल्या सकाळी अरविंद येऊन फोटो कॉपी मशीनच्या जवळ उभा होता. त्याच्या बाजूला कागदांचा गठ्ठा दिसत होता. एरवी तो ऑफिसमध्ये लेट लतीफ म्हणून लोकप्रिय होता. मी त्याला हटकले. तर तो म्हणाला की त्याच्या मुलाला शाळेच्या पुस्तकांच्या काही प्रति काढून हव्या होत्या. म्हणून म्हणलं की ऑफिसच्या कॉपी मशीन वर काढू.

रोहित माझ्याबरोबर बंगलोर ट्रिपला आला होता. आम्ही तिथे २ दिवसांच्या परिषदेसाठी जात होतो. आम्ही सकाळच्या विमानाने जाणार होतो. आणि २ दिवसांनी संध्याकाळी मुंबईला परतणार होतो. रोहितकडे मोठी सामानाची बॅग होती. जी तपासणे आवश्यक होते. मला आश्चर्य वाटले की दोन दिवसांसाठी तो एवढं सामान घेऊन जात होता. वास्तविक दोन दिवसांसाठी एक छोटी हॅन्डबॅग पुरली असती. नंतर मला कळलं की तो जेव्हा अशा टूर्सना जायचा तेव्हा सर्व कपडे ड्रायक्लिन करायचा. आणि अगदी क्वचित स्वतःचे पैसे वापरायचा. त्याच्या दृष्टीने एवढा प्रवास खर्च म्हणजे उसमे क्या है?

एका मोठ्या औषध बनवणाऱ्या कंपनीचा वैद्यकीय प्रतिनिधी सेकंड क्लासने प्रवास करतो. आणि खर्च दाखवताना मात्र फर्स्ट कलासचा दाखवतो. जो त्याला कंपनी कडून मिळतो. हे त्यांनी बरेच वर्ष केलं. त्याला वाटत होतं की दोन भाड्यांमधला फरक त्याला कंपनीने मासिक भत्ता म्हणून द्यायला हवा. कारण तो फिरतीचं काम करत असे आणि घरातून बराच वेळ बाहेर राहत असे. कंपनी कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लासच भाडं देते कारण कर्मचाऱ्यांना आरामात प्रवास करता यावा आणि काम करताना त्यांनी उत्साही आणि ताजेतवाने राहावे. पण तसे होताना दिसत नाही. रेलवे कडून फर्स्ट क्लासच्या भाड्यातवाढ झाली की विक्री एजेंटच्या उत्पनात वाढ होते. जेव्हा कंपनी ने नियम काढला की प्रत्येक प्रवासासोबत व्हाउचर बरोबर रेल्वेचे तिकीट लावणे अनिवार्य आहे. तेव्हा सर्व कर्मचारी संपावर गेले. त्यांच्या दृष्टीने हा नियम बरोबर नव्हता.

आता काही जण म्हणतील की टेलिफोन मुळे किंवा फोटो कॉपी खर्चामुळे मोठ्या कंपनीला काही फरक पडत नाही, वगैरे कारण हे छोटे खर्च असतात. ज्यामुळे कंपनीच्या नफ्यातोट्यात काही मोठा फरक होत नाही. म्हणून काय आपण अशा गोष्टींकडे कानाडोळा करून फक्त मोठ्या घोटाळ्यांवर लक्ष केंद्रित करायचं का? पण आपण हे लक्षात घ्यायला हवं की मोठे घोटाळे हे या छोट्या चुकांपासुन सुरु होतात. ज्यामुळे ऑडिटरवर आणि सरकारवर बट्टा लागतो.

श्री वाल्टर विरिया हे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कंसल्टंट ऑफ इंडियाचे सभासद आहेत. ते १४ वर्ष कोर्पोरेट एक्सिक्युटीव्ह होते. आणि १९७५ मध्ये त्यांनी भारतात मार्केटिंग कंसल्टंसी सुरु केली. कंसल्टंट म्हणून त्यांनी जगभरातल्या कंपन्यात काम केले आहे. ते ICMCI चे पहिले आशियायी चेरमन होते. ज्यात ४५ देशांचा समावेश होता. आता पर्यंत त्यांनी १६ पुस्तके लिहिली आहेत. ते व्यावसायिक लिखाण करतात. अमेरिका, आशिया आणि युरोप मध्ये मार्केटिंग शिकवायला जातात. त्यांची दोन नवीन पुस्तके आताच प्रकाशित झाली आहेत. १) ५ जीज ऑफ फॅमिली बिजिनेस सहलेखिका डॉ मिता दीक्षित आणि २) मार्केटिंग इन डिजिटल डेटा वर्ल्ड सहलेखक बियान अल्मेडा. आता ते एका NGO च्या कामात लक्ष घालतात.

Related posts

Leave a Comment