NDTV या प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा शेवट.

आम्हाला दिवाळीत बोनस सगळ्यांना सारखाच मिळत असे. आम्ही एकत्र जेवायचो. चित्रीकरणाच्या वेळीही उपकरणे एकत्र घेऊन जायचो. जेव्हा एखादा नवखा पत्रकार ही उपकरणे खांद्यावर घेऊन पायऱ्या उतरायचा प्रयत्न करत असायचा. तेव्हा प्रणॉय पटकन त्याच्या मदतीला जायचा. आणि त्या पत्रकाराच्या खांद्यावरील ट्रायपॉड आणि इतर उपकरणे स्वतः घ्यायचा. आणि त्याच्या खांद्यावरील भार हलका करायचा. सौ रेवती लौल सांगत होत्या.



फोटो- प्रचाराच्या धुमश्चक्रीत श्री प्रणॉय रॉय रिपोर्टींग करताना.

NDTV ने या आठवड्यात ज्यावेळी त्यांचा world this week हा कार्यक्रम दाखवला त्या भागाच्या शेवटी REM Rock Band चा एक म्युझिक विडिओ दाखवला गेला. त्यांनी ग्रामी पुरस्कार जिंकल्यामुळे Losing my religion हे गाणे दाखवले गेले. त्या विडिओ मध्ये निर्माता तारकोवस्की च्या बरोबर एक विचित्र माणूस होता. त्यांच्यातील आघाडीचा गायक मायकल स्ट्राइप म्हणाला” त्या कोपऱ्यात आहे तो मी आहे. तो प्रसिद्धीच्या झोतात असलेला मी आहे. माझा धर्म माझ्या हातून निसटतो आहे”. NDTV बद्दल आपल्या सगळ्यांच्याच काही ना काही तरी आठवणी आहेत. मी जेव्हा NDTV बद्दल भावूक पोस्ट फेसबुक वर लिहिली, तेव्हा श्री कमल कांताजी यांचा मला फोन आला. जे NDTV मध्ये ड्रायवरचे काम करत. ते अतिशय भावूक झाले होते. त्यांना आपल्या जुन्या दिवसांबद्दल  बोलायचे होते. तसेच NDTV च्या सध्याच्या स्वरूपाबद्दल बोलायचे होते.

समतेचा पुरस्कार करणाऱ्या एका वृत्तवाहिनीचा हा शेवट आहे. जिथे मी. कमलजी, कांताजी बाकीचे निवेदक, कॅमेरा असिस्टंट, अगदी साफसफाई करणारे कामगार या सर्वांनी एखाद्या कुटुंबाप्रमाणे काम केलंय. कोणताही भेदभाव नव्हता. आम्हाला दिवाळीत बोनस सगळ्यांना सारखाच मिळत असे. आम्ही एकत्र जेवायचो. चित्रीकरणाच्या वेळीही उपकरणे एकत्र घेऊन जायचो. जेव्हा एखादा नवखा पत्रकार ही उपकरणे खांद्यावर घेऊन पायऱ्या उतरायचा प्रयत्न करत असायचा. तेव्हा प्रणॉय पटकन त्याच्या मदतीला जायचा. आणि त्या पत्रकाराच्या खांद्यावरील ट्रायपॉड आणि इतर उपकरणे स्वतः घ्यायचा. आणि त्याच्या खांद्यावरील भार हलका करायचा. 

कामाच्या ठिकाणाशी  आमच्या काही सुंदर आठवणी जुळल्या आहेत. ज्या कायम स्मरणात राहतील. एकदा कोणीतरी पहाटे २ वाजता  रॉयच्या घरी जाऊन त्याला चहा करायला लावला होता. आणि कोणीतरी चर्चा अर्धवट सोडून स्टुडिओतुन बाहेर पडले होते. कारण त्यांना अस्वस्थ वाटत होते.

फोटो- NDTV चे सहसंस्थापक श्री प्रणॉय रॉय.

मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात याच वाहिनी वरून Production assistant म्हणून केली. तेव्हा गुडमॉर्निंग इंडिया हा सर्वात पहिला कार्यक्रम सकाळी न्याहारीच्या वेळी दाखवला जात असे. कार्यक्रमाचा पहिलाच भाग चित्रित केला जाणार होता. आणि मी रेकॉर्डिंग करण्यासाठी टेप्स न्यायची विसरले. एके दिवशी लिफ्ट बंद पडल्यामुळे मला सातव्या मजल्यावरील आमच्या कार्यालयात जिने चढून जावे लागले होते. एकदा तर गंमत म्हणून शूट करण्यासाठी मी म्हशीच्या पाठीवर बसल्याचे आठवते. माझे हिंदी तर इतके भयानक होते की विचारूच नका. गुजरात मधील एका छोट्याश्या गावाच्या सरपंचाला मी म्हशीऐवजी तोच किती दूध देतो असे विचारले होते. NDTV च्या वार्षिक कार्यक्रमाच्या वेळी मला साडीसुद्धा नीट न नेसता आल्यामुळे फजिती झाली होती. पण आम्ही जेवढे मजामस्ती करायचो तेवढेच कामाच्या बाबतीत सिरीयसही होतो. एकदा काय झालं कामातून थोडावेळ विरंगुळा म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. तिथून परत कार्यालयात यायला बराच उशीर झाला. आणि नेमकी त्याच दिवशी वाजपेयी आणि मुशरफ यांची भेट ठरली होती. आणि ती बातमी आम्हाला बातमीपत्रात घ्यायची होती. त्यामुळे त्या दिवशी उशीर झालेला असला तरी त्या बातमीचे काम मी पूर्ण केले. 

कधीतरी अचानक कामानिमित्ताने मला कारगिलला जायची संधी मिळाली. तेव्हा माझ्यासोबत  न जायला मिळाल्यामुळे बाकीच्या सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. एका गावात आम्ही बातमीसाठी गेलो होतो. बातमी करून झाली. शूटिंग पूर्ण झाले. तेवढ्यात मला तिथे एक उंट दिसला. मला उंटावर बसून फेरी मारायची होती. पण माझे वजन जास्त असल्यामुळे मला गावकऱ्यांनी उंटावर बसू दिले नाही. इंदोर मधील एका वेड्यांच्या रुग्णालयासंबंधी बातमी तयार करायची होती तेव्हा बातमी तयार करण्यासाठी आणि तेथील रुग्णांना भेटण्यासाठी मी भिंत चढून वर गेले होते. अशा कितीतरी आठवणी आहेत ज्या कायम सोबत राहतील.

आम्ही नित्यनेमाने NDTV बघणारे आहोत. आम्हाला एखादे वाक्य आवाजातील आरोह अवरोहांसकट मोठ्याने म्हणायला आवडते. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा वेड्यासारख्या गप्पा मारत असतो. आम्हाला कल्ला करायला आवडतो. न्युज रूम मध्ये असताना भलेही आम्ही एकमेकांवर त्वेषाने आरोपप्रत्यारोप करत असू ओरडत असू, पण तिथून बाहेर पडल्यावर आम्ही नॉर्मल वागायाचो. हे जरी १०-२० वर्षांपूर्वी घडलेले असले. तरी अगदी काल घडल्यासारखे आठवत आहे. बातम्यांमधला आशय जेवढा गंभीर असायचा. तेवढेच आमच्या स्टुडिओ मधील वातावरण खेळीमेळीचे असायचे. कारण रॉयने ते तसे ठेवले होते.

फोटो- मानसशास्त्रज्ञ श्री दोराब आर सोपारीवाला गेल्या २ दशकांपासून NDTV वर संपादकीय सल्लागार आहेत.

NDTV स्थापनेपासून आतापर्यंत त्यात खूप बदल झाले आहेत. मी तेव्हा पासून या प्रवासाची साक्षीदार आहे जेव्हा पासून NDTV ने निर्मिती संस्था म्हणून दूरदर्शन साठी कार्यक्रमांची निर्मिती करायला सुरुवात केली होती. त्यानंतर स्टार टीव्ही साठी सुद्धा बातमीपत्राची निर्मिती केली होती. त्यानंतर अगदी आता आता पर्यंत स्वतःच्या वृत्त वाहिन्यांचा ग्रुप असे पर्यंत हा सगळा प्रवास मी जवळून अनुभवला आहे.

मला आजही आठवते आमच्या स्टुडिओ मध्ये लांब केस असलेला, पोट पुढे असलेला एक माणूस येत असे. तो त्यावेळी सेन्सॉरचे काम करत असे. मघाशी मी आमच्या ब्रेकफास्ट शोचा उल्लेख केला. तर आम्ही त्या कार्यक्रमात चित्रपटाची गाणी, चुंबन दृश्य तर दाखवत नाही ना.. ते तपासण्यासाठी हा माणूस येत असे. टीव्ही वर कार्यक्रम प्रसारित होण्याआधी तो या कार्यक्रमाच्या टेप्स तपासून पाहत असे. एकदा असच कुठलातरी चुकीचा आवाज बातमीपत्रात मिसळला गेला. आणि ते आमच्या लक्षात आले नाही. त्यामुळे चुकीच्या आवाजासह ते बातमीपत्र प्रक्षेपित केलं गेलं. त्यामुळे दिग्दर्शकाच्या सूचनांनुसार त्यामध्ये परत बदल करून ते प्रसारित केलं गेलं. अर्थातच श्रोत्यांना पाहिलं बातमीपत्र विस्कळीत ऐकायला मिळालं. कालांतराने आम्हाला ‘Go live’ म्हणजे काय असत ते कळलं. कारण त्या काळात आम्ही असलं काही करण्याच्या भानगडीत पडत नव्हतो .

NDTV च्या वाहिनीमध्ये बोर्ड मध्ये भागधारकात बरेच बदल झाले. शेवटी शेवटी तर बातम्यातल्या खरेपणापेक्षा पैसा महत्वाचा झाला. आम्हाला गुजरात मधील एक बातमी दाखवायची होती. आणि मी वाहिनीची पत्रकार म्हणून गुजरातला गेले होते. त्या विभागातला मार्केटिंगचा माणूस म्हणाला. आपण जरा सौम्य प्रकारची बातमी दाखवू. कारण बातमीत आपण ज्या व्यक्तीला दाखवणार आहोत. ती व्यक्ती त्या भागातील केबल नेटवर्क चालवते. तू माझ्याशी हे असलं काही बोलणार असशील तर खबरदार… मी त्याला चांगलेच खडसावले. प्रेक्षकांपर्यंत खरी बातमी पोहोचावी यासाठी आम्हाला किती कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. याचे आज मागे वळून पाहताना आश्चर्य वाटत आहे. एखाद्या संस्थेच्या दबावाला बळी न पडता सरळमार्गाने पैसे कसे येतील हे पाहावं लागायचं. NDTV वर गुजरात मधील मुस्लिम हत्याकांडाची बातमी जशी होती तशी दाखवली गेली नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या काळातील कोळसा घोटाळा टेलिकॉम घोटाळ्याच्या बाबतीतही हेच झाले. 

काही काळानंतर आम्हाला सगळ्यामध्ये व्यवस्थित समतोल साधणारा वेगवेगळ्या राज्यसरकारांसाठी जाहिराती करणारा, आणि काही हुशार पत्रकारांना आणणारा रवीश सारखा माणूस मिळाला. पण वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्यात झालेली शांतता चर्चा चित्रित करून नंतर त्यातील फोलपणा देशाला दाखवण्यासाठी प्रणॉय सारखा धाडसी माणूसच हवा. निवडणुकीमध्ये जातीवरून होणारे राजकारण देशासमोर मांडण्यासाठी प्रणॉय सारखे लोकच हवेत, जे स्टुडिओ डेस्कवर बसून त्यांच्याच वयाच्या राजकारणातील लोकांशी शांतपणे चर्चा करू शकतील. प्रत्येक निवडणुकीनंतर आम्हाला तरी आम्ही टीव्ही सुरु केला आणि प्रणॉय आणि दोराब त्यावर दिसत नाहीत ही कल्पनाच सहन होणारी नव्हती.



फोटो- श्री शेखर गुप्ता NDTV वर जवळ जवळ १५ वर्ष walk the talk हा मुलाखतीचा कार्यक्रम घ्यायचे ज्यात त्यांनी ६०० जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

दिवस भलेही कसेही असोत. आमच्या गोष्टी जेवढ्या पडद्यावर असायच्या तेवढ्याच पडद्यामागेही असायच्या. आज हे सगळं सांगताना त्या आठवणी चलचित्रासारख्या डोळ्यापुढून सरकत आहेत. कोणत्या तरी नको असलेल्या भागामुळे अख्खा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. संकलकाच्या कार्यालयातील काही आठवणी आहेत. कोणालातरी थोबाडीत खायला लागली होती. आणि मला सारखे भास व्हायचे की माझ्यावर कोणीतरी नजर ठेऊन आहे. कारण तेव्हा मी कार्यालयात एकटीच होते. असं तीनदा घडलं. मग मात्र माझी घाबरगुंडी उडाली. आणि मी तिथून पळ काढला. आणि निर्माता कार्यालयात आल्यावरच मी पण आले. बातमीपत्राच्या ऐन मध्यात कोणाचा तरी गुडघा निखळला. मी लगेच डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी उपचार केले. दरम्यान आम्ही कार्यक्रम पुढे सुरूच ठेवला.

माझ्या शेजारीच बसलेला शिफ्ट इंजिनियर नाकात बोटं घालत होता. आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करणार एवढ्यात तो माझ्याजवळ आला आणि त्याच घाणेरड्या हातांनी माझे इअरफोन काढले. आणि बरोबर नसल्याचे त्याने मला सांगितले. आणि त्याच हातांनी बदलून सुद्धा दिले. आमच्या आठवणी न संपणाऱ्या आहेत. सगळ्याच सांगायला गेले तर वेळ पुरणार नाही. आम्हाला सतत बोलायला खूप आवडायचं. शांत बसणं आमच्या स्वभावातच नव्हतं. आणि त्यातूनच मग किस्से तयार व्हायचे.



फोटो- NDTV चे कार्यकारी संपादक श्री रवीश कुमार यांनी या आठवड्यात राजीनामा दिला.

आज मागे वळून बघताना.. आजच्या पत्रकारितेच्या बदललेल्या स्वरूपाकडे पाहिल्यावर आमचा तो काळ कुठेतरी मागे पडल्यासारखा वाटतो. साखरझोपेत असताना पडलेल्या एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे. आता पुढे काय हा प्रश्न पडतो. प्रणॉय सारखी, दोराब सुपारीवाला सारखी, शेखर गुप्तासारखी माणसे पत्रकारितेच्या क्षेत्रात पुन्हा बघायला मिळतील का ? आता आयुष्यात काही गोडवाच राहिला नाही. जेवणात मीठ नसल्यावर जस जेवण आळणी लागतं तस आता आयुष्य झालं आहे. कंटाळवाणं.. NDTV च्या बातम्या एकांगी असायच्या असं ज्यांचं म्हणणं आहे. त्यांना मला एकच विचारावंसं वाटतं. रशियाच्या पुतिन बद्दल किंवा इराणच्या खेमाणी बद्दल किंवा टर्कीच्या एडोगन बद्दल त्यांचं काय मत आहे. प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. शेवटी हे व्यक्तिसापेक्ष आहे. आजकाल बातम्या सुद्धा तराजूत तोलून मापून ठेवल्यासारख्या देतात. म्हणजे कुठला भाग सांगायचा. आणि कुठला वगळायचा हे आधीच ठरलेलं असतं.

म्हणूनच R.E.M गाण्याचा विडिओ NDTV च्या सांगतेसाठी योग्य वाटतो ज्यात मुख्य गायक हावभाव करत रंगमंचावर येतो आणि हळू हळू अर्धवट राहिलेले चित्र पूर्ण होऊन एक सुंदर कलाकृती आपल्यासमोर साकार होते. मग पुढे काय ?

 पुढे गाणे सुरूच राहते.  मी खूप काही सांगितले. मी काहीच नाही सांगितले.. म्हणजे आपल्या सभोवतालच्या काही गोष्टी अशा असतात. ज्यांचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. श्रीमती रेवती लौल या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९६ साली NDTV तुन केली. त्या २००९ पर्यंत तिथे कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी तेहलका, हिंदुस्थान टाइम्स, द वायर, द क्विन्ट या वृत्तपत्रांसाठी लेखन केले आहे. ‘The anatomy of hate’ या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. 

Related posts

Leave a Comment