आजकाल एकट्याने भाड्याने घर घेऊन राहण्यापेक्षा दोघातिघांसोबत फ्लॅट शेअर करणे सोयीचे आहे. 

आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना कामानिमित्ताने,शिक्षणासाठी, किंवा इतर कोणत्याही कारणास्तव घरापासून लांब परक्या शहरात राहावे लागते. जर असे राहायची वेळ आली तर बरेच जण. एकटे न राहता खोली दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करतात. असे करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे काय कारण असावे?

भाड्याच्या घरात एकटे राहण्यापेक्षा खोली शेअर करून २-३ जणांनी एकत्र राहणे काही नवीन नाही. पूर्वी मोठ्या घरात लोक पेयिंग गेस्ट म्हणून राहत. आता ही पद्धत मागे पडत चालली असली तरी अजून बंद झालेली नाही. Co-living मध्ये राहणारे लोक हे साधारणतः १८ ते ३५ वर्ष वयोगटातील असतात. यामध्ये गावाहून शहरात आलेले, विविध कारणामुळे शहरात आलेले, गाव सोडून शहरात राहायला आलेले लोक असतात. गावाहून शहरात आल्यावर स्वतःचं घर घ्यायला वेळ हा लागतोच. म्हणून मग भाड्यानेच घरे बघितली जातात. पूर्वीची पेयिंग गेस्टची पद्धत हळूहळू कमी होऊन आता.  

Co living ची पद्धत आली आहे. आजकाल स्टार्टअपचा जमाना आहे. काही लोकांनी बिल्डींग्स किंवा अपार्टमेंट्स मध्ये जागा भाडेतत्वावर देण्याचा स्टार्टअप सुरु केला. आणि त्यातूनच भारतात Co-living ची संकल्पना अस्तित्वात आली. Co- Living म्हणजे नक्की काय ? दोन किंवा तीन रूममेट्स रूम शेअर करून राहतात. मग त्यातील मूलभूत सुविधा ते वापरू शकतात. माणूस हा खरतर समूहप्रिय आहे. त्याला घोळक्यात राहायला आवडते. त्यामुळे ही पद्धत जरी पूर्वापार चालत आलेली असली तरी आता त्याचं स्वरूप बदललं आहे. हौसिंग स्टार्टअप मध्ये तरुणाईच्या गरजांकडे जास्त लक्ष दिले जाते.

Co living मध्ये सुद्धा बरेच प्रकार आढळतात. उदा. एखादे छोटे कुटुंब मोठ्या घरात राहत असेल. तर त्या कुटुंबातील सदस्यांना लागणाऱ्या रोजच्या वापरातील खोल्या सोडून इतर खोल्या ते भाड्याने देऊ शकतात. असे केल्याने भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला काही सवलती मिळतात. किंवा भाड्याची रक्कम त्याच्या सोयीनुसार ठरवता येते. घरमालकाचे फर्निचर सुद्धा भाडेकरू वापरू शकतात.

Co living ची पद्धत भारतात वाढत जाण्याचं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि लोकांच्या बदलत्या राहणीमानाला साजेशी अशी आणि खिशाला परवडणारी अशी भाड्याची घरे उपलब्ध करून देणे. आपल्या देशाची लोकसंख्या अतिशय वेगाने वाढते आहे. एकूण लोकसंख्येपैकी ३४% लोकांचे वय हे २८ वर्षांच्या आसपास आहे. आणि तेच लोक घरातले कमावते असतात. एकूण लोकसंख्येपैकी ४७% लोक नोकरी करतात. आजकाल नोकरी करणाऱ्या लोकांचे पगारही लाखोंच्या घरात असतात. आणि मुख्य म्हणजे हे लोक टेक्नोसॅव्ही असतात. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

आजची तरुण पिढी टेक्नो सेवी आहेच. त्याचबरोबर कामानिमित्ताने आणि शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात किंवा परदेशात सुद्धा जाणारी आहे. पूर्वी  कर्ज घेतलं तर मग त्याचे हप्ते फेडता फेडता पगार कमी पडत असे. पण आजकाल तरुण पिढीचे पगारच एवढे असतात की कर्ज घेतलं म्हणून सुद्धा त्यांना आर्थिक दृष्ट्या काही फरक पडत नाही. गेल्या काही वर्षात असे दिसून आले आहे की भारतात राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचे घर असायला हवे असे काही नाही. भाड्याचे घर असले तरी चालते.

या बदलाचे महत्वाचे कारण म्हणजे ९० च्या दशकापासून उत्पन्नामध्ये झालेली वाढ. त्यातूनच स्वतःच्या मालकीचे घर घेण्यासाठी लोक पुढे येऊ लागले. आजकाल एकाच व्यक्तीच्या नावावर २ ते ३ घरे असतात. जर एकाच व्यक्तीच्या नावावर २-३ घरे असतील तर त्या व्यक्तीच्या मुलांना घर घेण्याची गरज पडत नाही. त्यांना वडिलोपार्जित घर राहण्यासाठी मिळू शकते. भाड्याच्या घरात २-३ जणांनी मिळून राहणे ही संकल्पना नवीन नाही. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त बरेच जण हा पर्याय निवडतात. पण पेयिंग गेस्ट म्हणून राहताना समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की घरात मूलभूत सोयीसुविधा नसणे वैगरे.

भाड्याने किंवा पेयिंग गेस्ट म्हणून राहायचा सर्वात मोठा तोटा म्हणजे घरमालकाच्या नियमांप्रमाणे आपल्याला राहावे लागते. त्यामुळेच कदाचित पेयिंग गेस्ट म्हणून राहणे कोणी पसंत करत नसावे. करारभंग करणे, छुपे खर्च, देखभाली साठी जर वाढीव खर्च होत असेल तर, सेक्युरिटी डिपॉझिटची रक्कम गहाळ होणे या सगळ्या कारणांमुळे सुद्धा घर भाड्याने दिले जात नाही. भाड्याने दिलेल्या घराची अवस्था जर चांगली नसेल तरीही कोणी भाड्याने घर देत नाही. Co living च्या तुलनेत घर भाड्याने देणे आता कमी होत चालले आहे.

Co living चे फायदे काय आहेत ?

भाडेकरूंना त्यांची वैयक्तिक स्पेस मिळते. उत्तम प्रकारे राहता येतं. 

एका खोली मध्ये एक जण किंवा २-३ जण राहू शकतात. जेणेकरून परस्परांमध्ये संवाद होईल.

कोणत्याही धर्माचे लोक Co living मध्ये एकत्र राहू शकतात.  

Co living मध्ये भाड्याची रक्कम जास्त नसते. आणि आपल्याला हव्या त्या शहरात राहता येते.

पूर्वी सारखा वर्षभराचा करार करणे वैगरे भानगडी Co-living मध्ये नसतात. आपण आपल्याला हवी तेव्हा जागा सोडू शकतो किंवा राहायला येऊ शकतो.

सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी घरे Co-living  मध्ये पाहायला मिळतात.

भाड्याच्या करारामध्ये केव्हाही बदल करता येतो. आणि इतर गोष्टीतही सवलती मिळतात. भाड्याच्या घरातील आणि Co- living मधील फरक

 

Co living ची घरे

भाड्याची घरे

मासिक भाडे

घर चालवणाऱ्यास द्यावे लागते.

घरमालकास द्यावे लागते.

अनामत रक्कम

२-३ महिन्याचे भाडे भरावे लागते

८-१० महिन्याचे भाडे भरावे लागते

कालावधी

ठराविक कालावधी नाही.

११ महिन्याचा ठराविक कालावधी असतो

सवलत

न कळवता कधीही घर सोडता येते

१ महिना आधी कळवावे लागते

सामायिक जागेची देखभाल

भाड्याच्या रकमेमध्ये समाविष्ट असते

भाड्याच्या रकमेमध्ये समाविष्ट नसते

युटिलिटी चार्जेस

भाड्याच्या रकमेमध्ये समाविष्ट असतात

भाड्याच्या रकमेमध्ये समाविष्ट नसतात

जेवणाची सोय

काही ठिकाणी समाविष्ट असते

काही ठिकाणी समाविष्ट नसते

घराची स्वच्छता

भाड्याच्या रकमेमध्ये समाविष्ट असते

भाड्याच्या रकमेमध्ये समाविष्ट नसते

सोयी सुविधा

सोयी सुविधा असतात

सोयी सुविधांसाठी जादा पैसे द्यावे लागतात

Co- living मध्ये दिल्या गेलेल्या सोयी सुविधा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. फर्निचर सकट खोल्या, घराची स्वच्छता, घराभोवतालचा परिसर वापरणे या गोष्टी समाविष्ट असतात. तर जेवणासाठी, स्वैपाकघराचा वापर करण्यासाठी, पार्किंग हे सर्व वापरायचे  की नाही ते तुमच्यावर असते. काही ठिकाणी वाचनालय गच्ची यांचा वापराचा सुद्धा पर्याय दिलेला असतो. Co- living चे मार्केट भारतात वेगाने वाढत आहे. तसेच त्यात गुंतवणूक करायला गुंतवणूकदारही इच्छुक आहेत. आज जशी भाड्याच्या घरांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. त्याचप्रमाणे Co-living लाही पसंती मिळत आहे. Co-living च्या क्षेत्रात असलेल्या बहुतेक सगळ्याच कंपन्या व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना घरे देतात. त्याचप्रमाणे अशाही कंपन्या आहेत ज्या विशिष्ट वर्गालाच सेवा पुरवतात.

Stanza living आणि Oxford caps (जी आता abuzz ने घेतली) विद्यार्थ्यांना राहण्यासाठी घरे देतात. तर grester living ही कंपनी फक्त बंगलोर मधल्या व्यावसायिकांना सेवा पुरवते. सध्या वेगवेगळ्या शहरात अशा  १५ कंपन्या कार्यरत आहेत. आजकाल लोकांच्या घराबद्दलच्या गरजा बदलत चालल्या आहेत. त्यामुळे हा व्यवसाय ही वाढीस लागला आहे. घर भाड्याने देण्याच्या पद्धतीतील काही तरतुदी या अडचणीच्या असल्याने साहजिकच लोक Co-living ला पसंती देतात. हळू हळू पूर्वापार चालत आलेली घरे भाड्याने देण्याची पद्धत नामशेष होऊन त्याची जागा Co-living घेणार हे नक्की.

सध्या तरी Co- living साठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे co living च्या व्यवसायात असलेल्या लोकांना नवनवीन प्रयोग करता येत आहेत. जर co living साठी पोषक वातावरण तयार झाले तर बरेच लोक दोन्ही पद्धतींचा वापर करू शकतील. जर co living ला सरकारने पाठिंबा दिला तर नवीन पिढीतील तरुणांसाठी तो चांगला पर्याय असू शकेल. पण त्यासाठी योग्य तो कायदा हवा. जशी घरे भाड्याने देण्यासाठी सरकारची परवानगी आहे. तशीच co-living च्या व्यवसायात असणाऱ्या लोकांना सुद्धा सरकारने परवाने द्यायला हवेत. त्यामुळे या व्यवसायात असणाऱ्या लोकांचा फायदा होईल आणि co-living चं मार्केट वाढीस लागेल.

Related posts

Leave a Comment