प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं एक ध्येय ठरलेलं असतं. त्याच्या जगण्याची काही कारणं असतात. प्रयोजन असतं. मध्यंतरी सुप्रिया नावाची माझी मैत्रीण ‘purpose’ या पुस्तकासाठी सहलेखनाचं काम करणार असल्याचं सांगायला माझ्याकडे आली. ती हे अगदी सहजपणे बोलून गेली. पण माझं मन मात्र आजपर्यंत कधीच विचार न केलेल्या विषयाचा विचार करण्यात गुंतलं. आजकाल जी मंडळी काम करत आहेत, नोकऱ्या करत आहेत, त्यांना आपण हे काम का करतोय हेच माहित नसतं. परिणामी त्यांच्या जगण्याची कारणंच हरवत चालली आहेत. फक्त तरुण आणि शिकलेले लोक याला अपवाद असतील असं मला वाटतं.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं ध्येय काय असावं हे पुन्हा व्यक्ती सापेक्ष आहे. कोणाला आर्थिक सुबत्ता हवी असते. म्हणजेच कमी वेळात खूप काही मिळवायचं असतं. त्या व्यक्तींना सतत चर्चेत राहायला आवडतं. तर कोणाला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं असतं. कोणाला तरुण वयातच यशस्वी स्टार्टअप सुरु करायचं असतं. तर कोणाला आरोग्य, शिक्षण किंवा इतर क्षेत्रातील होतकरूंना मदत करायची असते. पण बाकीच्या लोकांची आयुष्य मात्र निरुद्देश असतात. समुद्रातील वादळात भरकटलेल्या एखाद्या जहाजासारखी.

आपण फक्त दिवसामागून दिवस वर्षानुवर्षे असेच जगत राहतो. आज काय कोणाचं लग्न झालं. कोणाची कामात बदली झाली. उद्या काय कोणाला कामात बढती मिळाली. आपल्या आयुष्यात मात्र स्वतःचं असं मोठं ध्येय असणारे खूप कमी लोक असतात. त्याबाबतीत मला पोलीस खात्यातील पोलिसांचा, संरक्षण दलातील सैनिकांचा, सीमेवर सुरक्षा करणाऱ्या जवानांचा नेहमीच हेवा वाटत आला आहे. जेन गुडॉल नावाच्या लेखिका म्हणतात ”आपल्या आयुष्यात जर सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ध्येयवादी नसणं.’’
६० वर्षांच्या माझ्या कामाच्या अनुभवानंतर मी आयुष्यातील ध्येयांविषयी विचार करण्यास सुरुवात केली आहे. पहिला मुद्दा म्हणजे दुर्लक्ष. लोक एकच गोष्ट वर्षांनुवर्षे करत राहतात. पण त्यांना माहितीच नसतं की आपण ती गोष्ट का करतोय. रेल्वे मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा अनुभव मी वाचला. रेल्वे च्या कारखान्यातून तो ४० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत होता. त्याच्या निरोपसमारंभाच्या वेळी व्यवस्थापकांनी त्याला विचारले. ४० वर्ष तुम्ही काम केलंत. पण काम करण्याचा आनंद तुम्हाला मिळाला का ? अर्थातच त्याने होकारार्थी उत्तर दिलं.
त्याचं काम काय होतं तर यार्डात उभ्या असलेल्या गाडीच्या चाकांवरती हातोडीने ठोकून बघणे. दिवसभर तो हेच काम करायचा. आणि तेच करण्यात त्याला आनंद वाटायचा. त्याला हे तरी माहित होतं का की चाकावर हातोडी मारून आलेल्या आवाजावरून ते चाक बदलावं लागणार आहे की नाही याचा निर्णय घ्यायचा असतो. तर नाही. म्हणजेच ४० वर्ष त्या गाडीतून प्रवास करणारे प्रवासी भाग्यवान म्हणायला हवे. की ४० वर्षात गाडीचा एकही अपघात झाला नाही. ४० वर्षात त्याच्यावर कधी दुरुस्ती करण्याची वेळच आली नाही. त्याला हातोडीने मारल्यावर येणारा चाकांचा आवाज माहितीच नव्हता. कारण त्याला तसे प्रशिक्षण दिले गेले नव्हते. ४० वर्षात दिवसातून २० वेळा तरी त्याने चाकांवर हातोडी मारली असेल पण काय उपयोग? थोडक्यात अज्ञानात आनंद असा प्रकार झाला.

दुसरं कारण म्हणजे भिती. लुवी अजायी नावाचे लेखक म्हणतात. ”भिती आपल्याला आपल्या ध्येयांपर्यंत पोहचू देत नाही”. बरीच लोक ध्येय निश्चित करायला, त्याप्रमाणे योजना आखायला आणि पुढे जायला घाबरतात. त्यांना त्यांच्या comfort zone मध्ये राहायला आवडते. त्यांना अपरिचित क्षेत्रात पाऊल ठेवायचे नसते. माझ्याच एका नातेवाईकाने ३५ वर्ष एकाच फॉरेन कंपनीत जुनियर अकॉउंटन्ट म्हणून काम केले. आणि ३५ व्या वर्षी तो सिनियर अकॉउंटन्ट म्हणून निवृत्त झाला. तेच काम, थोडासा वाढलेला पगार. पण तो त्याच्या comfort zone मध्ये आनंदी होता. त्याच्या आयुष्यात कुठलंच ध्येय नव्हतं.
तिसरं कारण म्हणजे कमकुवत पाया. नीतिमूल्य जपणारा आयुष्याचा पाया घडवला गेला नाही. जर मुलांना चांगल्या सवयी लावल्या नाहीत. उत्तम संस्कार केले नाहीत. स्वार्थ आणि निस्वार्थी भावना यातील फरक ओळखायला शिकवले नाही तर मुलांसमोर कोणताही आदर्श असणार नाही. परिणामी ध्येयही असणार नाही. ज्ञानी माणसाचे लक्षण काय आहे? तर डोक्याने विचार करणे आणि मनापासून समजून घेणे.- जेन गुडॉल. भारताच्या राजकारणाची सध्याची स्थिती पाहता अजून खूप लांब जायचं आहे असच म्हणावं लागेल. २०२२ साली बुडीत कर्जखात्यांची संख्या २ लाख कोटींपर्यंत पोहोचणे हे वाईट आहे. भारताचे माजी राष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती पदावर असताना घेतलेल्या आपल्याच चुकीच्या निर्णयाचे समर्थन करतात. तेव्हा ध्येयवादी असण्याविषयी प्रश्नच पडतो.
चौथे कारण म्हणजे बदलण्याची क्षमता. आपले आयुष्य हे कधीच साधे सरळ नसते. ते कायम खाचखळग्यांनी भरलेले असते. आपल्या ध्येयापर्यंत पोचायला जर अडचणी येत असतील तर काळानुसार आपण आपल्या दृष्टीकोनात, ध्येयापर्यंत पोचायच्या मार्गात बदल करायला हवा. कधी बदल पटकन होईल. तर कधी हळू हळू होईल. आपल्याला दोन्ही परिस्थितीत समतोल साधता यायला हवा. कॉर्पोरेट एगजीक्यूटिव्ह पासून सरळ स्टार्टअप सुरु करण्यापर्यंत येणे हा केवढा मोठा बदल आहे.

आयुष्याचे ध्येय शोधताना या ४ गोष्टी जमल्या. स्वतःच्या मनाशी संवाद साधता आला. नवीन दृष्टिकोन मिळाला. आपण कुठे चाललो आहोत कशासाठी याची उत्तरं मिळाली तर ध्येयापर्यंतचा तुमचा प्रवास आनंददायी होईल. वाटेत तुम्हाला असेही लोक भेटतील जे तुमच्यापेक्षा हुशार असतील . तेव्हा स्वतःला कमी लेखू नका. आपल्या देशासाठी प्राण देणाऱ्या क्रातिकारकांचे आदर्श डोळ्यासमोर असू द्या.
महात्मा गांधी, सरदार पटेल इत्यादी ,मदर तेरेसा. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबातील २ पिढयांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात आयुष्य खर्ची घातले. काही असेही लोक आहेत ज्यांच्याबद्दल अजून कोणाला फारसे माहित नाही. जसे डॉ रवी आणि अंकुली. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर येथून शिक्षण घेऊन लग्न केल्यानंतर दोघांनी आदिवासींच्या सेवेसाठी आयुष्य घालवले. जमशेदजी टाटा, अझीम प्रेमजी यांच्यासारखे उद्योजक व्यवसाय पण करतात आणि आपल्या नफ्यातील काही हिस्सा समाजोपयोगी कामाला देतात. हे सगळे खरोखरच आपल्या देशाचा मजबूत पाया आहेत. कारण समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

श्री वाल्टर व्हिएरा हे Institute of management consultant of india चे सभासद आहेत. Corporate executive म्हणून त्यांनी १४ वर्षे काम केले आहे. १९७५ साली भारतात त्यांनी Marketing consulting ची सुरुवात केली. सल्लागार म्हणून त्यांनी ४ खंडात कामे केली आहेत. ४५ देशांच्या समूहाचे ते पहिले आशयायी अध्यक्ष आहेत. त्यांनी १६ पुस्तके लिहिली आहेत. तसेच व्यवसाय या विषयावर ते विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करतात. अमेरिका, आशिया आणि युरोप खंडात गेली ४० वर्षे Visiting professor म्हणून जातात. त्यांनी लिहिलेली पुस्तके Marketing in Digital data सहलेखक ब्रियन अल्मेडा, Customer value starvation kills सहलेखक श्री गौतम महाजन. आता ते एका NGO चे काम बघतात. Consumer education and research society of india चे ते अध्यक्ष आहेत.
