कम्युनिस्ट दहशतवादाचा भयानक चेहरा !

communists-terrorism

– शरद मेस्त्री.

दहशतवाद म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते जम्मू-काश्मीर; परंतु तेवढाच भयावह,   त्यापेक्षाही अधिक आणि क्रूर दहशतवाद केरळमध्ये कम्युनिस्टांचा सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये किमान त्यांची घटना आणि कायदे तरी वेगळे आहेत. येथे तर आपली घटना लागू असून तरतुदींचीही पायमल्ली होते. तरीही कोठेही वाच्यता नाही. केवळ आपलेच विचार आणि आचार महत्त्वाचे असून अन्य विचार ंिकवा कृती त्यांच्या साम्राज्यात आलेले त्यांना रुचत नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना यमलोकी पाठविण्यात येते. या विचारांना विरोध कराल, तर मृत्यूला तयार राहा, अशीच अराजकता देशातील या सर्वोच्च सुशिक्षित राज्यात आहे.

केरळ म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण. तेथील प्रेक्षणीय स्थळे आणि रुचकर पदार्थ प्रसिद्ध- आहेत. सोबत केरळला कम्युनिस्ट दहशतवादाचा भयानक चेहराही आहे. राष्ट´ भावनेचा आणि सेवेचा संदेश देणाऱ्या कोणत्याही स्वयंसेवक, तसेच संघटनेला येथे काम करण्यास विरोध केला जातो. तो झिडकारला तर त्याची अमानुष हत्या केली जाते. याला महिलासुद्ध-ा अपवाद नाहीत. ज्याप्रमाणे रशियात स्टॅलिनच्या काळात हत्यांचे सत्र सुरू असायचे, तसेच कन्नूर येथे घडत आहे. याबाबत राष्ट´ीय स्तरावर कोठेही साधी चर्चाही होत नाही, हे आपले दुर्दैव. दिल्लीमध्ये असहिष्णुतेवर आपण चर्चा घडलेली पाहिली; परंतु पाच दशकांपेक्षा अधिक कालखंडाच्या रक्तरंजित केरळमधील कम्युनिस्टांचा इतिहास पाहता असहिष्णुतेवर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. उलट राष्ट´ाचा विचार घेऊन चालणाऱ्या संघटना अल्पसंख्याकविरोधी आणि उग्रवादी स्वरूपातच दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला. केरळच्या लाल दहशतवादाचे सर्वात मोठे सावज लोकशाही विचारप्रणालीचे समर्थकच आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेत प्रत्येक व्यक्तीला आपले विचार, आचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्यामुळे देशात मुस्लीम, ख्रिश्चन व अन्य धर्मीय त्यांचा प्रचार व प्रसार करताना दिसतात. केरळमध्ये ंिहदू वगळून अन्य धर्मियांना त्यांच्या आचार-विचार प्रचाराची मुभा कम्युनिस्टांनी दिली असल्याचे आजपर्यंतच्या त्यांच्या क्रौर्यावरून दिसून येते. घटनेच्या तरतुदीची कम्युनिस्ट उघडपणे पायमल्ली करताना दिसतात. त्याबद्दल कोणतीही मानवतावादी संघटना चकार शब्द बोलायला तयार नाही.

कम्युनिस्टांच्या रडारवर केवळ त्यांच्या विचारांना छेद देणारी विचारधारा आहे, हे आधीपासूनच दिसून येते. १९६९ मध्ये संघ स्वयंसेवकाची पहिली हत्या झाली होती. त्यानंतर सातत्याने हे प्रकार होत राहिले. हत्यांचे सत्र व त्याची क्रूरता पाहून मकन्नूर मॉडेलच तयार झाले. माकपाने त्यांना जो अडेल त्याला धडा शिकविण्यासाठी ंिकवा संपविण्यासाठी कन्नूर मॉडेलचा अवलंब केल्याने हे मॉडेल कुप्रसिद्ध- झाले. वैचारिक विरोधकांची हत्या घडवून आणण्यात माकपा अग्रस्थानी असून राहिलेली कसर मुस्लीम उग्रवाद्यांनी भरून काढली आहे. जिसकी लाठी उसकी भैस या म्हणीप्रमाणे कम्युनिस्टांच्या दहशतवादासमोर कसला कायदा आणि कोणती सुव्यवस्था? लाल बावट्यांच्या राष्ट´विरोधी कृत्याला विरोध करणाऱ्या ंिकवा जे लोक यांच्यासोबत होते; परंतु त्यांचा खरा चेहरा कळून बाजूला झाले. त्यांच्यावरही पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अत्याचार करणे ही केरळमध्ये सामान्य गोष्ट आहे. सीपीएमने आपल्या सत्तेचा वापर त्यांच्या विचारांना विरोध करणाऱ्या विचारसरणी उखडून टाकण्यासाठीच केला. साम्यवादी निष्ठूर असून हल्ले करताना लहान बालके, महिला व पुरुष असा कोणताही भेद ते करत नाहीत. तर केवळ राष्ट´विचारी कार्यकर्त्यांवरच हल्ले करत नाहीत, तर त्यांच्या परिवारावरसुद्ध-ा हल्ले करून अत्याचार करतात. माणसांचे गळे कापतात आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवरदेखील अत्याचार करतात. उत्तर केरळमध्ये हे प्रमाण अधिक आहे. माकपाचा गड असलेल्या कन्नूरमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

साम्यवाद्यांना विरोध केलेल्या व्यक्तींच्या हत्येचा असुरी आनंद व्यक्त करण्यासाठी कम्युनिस्ट गोमांस उत्सव आणि उघडपणे उग्र संवाद करतात. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अराजकतेचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनात माकपाने काही अधिकारी जाणीवपूर्वक घुसविले असल्याचे चर्चिले जाते. त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे फळ नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपात मिळाले आहे. केरळमध्ये अनेक वर्षे कम्युनिस्टांची राजवट राहिली आहे. कामगार व दलितांच्या उद्ध-ाराच्या गोष्टी करायच्या आणि सत्तेत आले की, ंिहसाचार करायचा. उजवी विचारसरणी चिरडून टाकायची, असा प्रकार ते अवलंबत असतात.

केरळमध्ये सत्तांतर होत असते; परंतु समविचारी पक्षाच्या नेत्यांवरसुद्ध-ा हल्ले करण्यास कम्युनिस्ट मागे-पुढे पाहत नाहीत. लाल पंजाच्या जोखडातून त्यांचीसुद्ध-ा सुटका होत नाही. चांगल्या विचार आणि आचारांमुळे डाव्या विचारसरणीला जोडलेले काही सुजाण बाजूला होऊन राष्ट´विचारात सामील झाल्याने लाल दहशतवाद्यांनी त्यांना कंठस्नान घातले आहे. यावरून यांच्या दहशतीची कल्पना येते. जम्मू-काश्मीरच्या दहशतवादाला पाकिस्तान आणि फुटीरवाद्यांची रसद मिळते; परंतु केरळचे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

केरळ कम्युनिस्टांच्या मते, केवळ लाल भूमी आहे. माकपा त्यांची संस्था आहे. अन्य पक्ष ंिकवा विचारांना येथे स्थान नाही. कुणी प्रयत्न केला, तर यातना भोगून मृत्यूला तयार राहा, असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संदेश लाल बावटा समर्थक देताना दिसतात. राष्ट´ाला समर्पित जो यज्ञ सुरू झाला आहे त्यात हजारो स्वयंसेवकांनी केरळसाठी आपली आहुती दिली आहे. कोणत्याही आपत्तीच्यावेळी मदत कार्यात अग्रस्थानी असणाऱ्या स्वयंसेवकांचे हत्यासत्र कम्युनिस्टांनी सुरू ठेवले आहे. दुर्दैवाने मानवाधिकारी आणि असहिष्णुतावादी याबद्दल मौन बाळगून आहेत. विद्यमान मुख्यमंत्र्यांवर स्वयंसेवकांच्या हत्येचा संशय असल्याने मुख्यमंत्र्यांकडून कायदा व सुव्यवस्था, तसेच घटनेच्या तरतुदीचे पालन होईल की नाही याबद्दल शंकाच आहे.

Leave a Comment