मोदी यांचे आक्रमक नेतृत्त्व

आपल्या लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे – रजत मित्रा

‘‘हे नक्कीच त्याला गोत्यात आणू शकेल. हे त्याने का केले हे त्याला खूप समजावून सांगावे लागेल’’. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेविषयी बोलताना माझ्या प्रोफेसर मित्राच्या आवाजातील आनंद स्पष्टपणे जाणवत होता. मोदींचा त्रास अजूनच वाढला आहे हे पाहून त्याला आनंद होत होता. खरंतर तो विघ्नसंतोषी आहे. पण आजकालच्या परिस्थितीत तो एकटाच नाही. सभोवताली असे बरेच लोक आहेत ज्यांना साथीच्या रोगाची काळजी कमी आणि मोदींच्या भवितव्याची काळजी जास्त वाटते. एका साध्या सरळ माणसासाठी या टोकाच्या द्वेषाचे मूळ काय असू शकते? ते सुद्धा अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण देश पर्यायाने मोदी एकामागोमाग एक येणाऱ्या संकटांचा सामना करत आहेत. तरीसुद्धा मोदीजी सर्वाना सोबत घेऊन परिस्थितीचा सामना करण्यास सांगत आहेत. कोविड १९ च्या महामारीने आपल्यापैकी प्रत्येकालाच मुळापासून हादरवून सोडले आहे इतके की आपण करत असलेला द्वेष त्यापुढे काहीच नाही. तुलनाच करायची झाल्यास महामारीचे पारडे द्वेषापेक्षा काकणभर जडच आहे. ज्यामुळे आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते. माझ्या मित्रासारखे लोक उघडपणे त्यांची मते व्यक्त करू शकतात. आणि ते अडचणीत आले म्हणल्यावर त्यांना एक प्रकारचा असुरी आनंद होतो. 

नव्हे उलट मोदींच्या अडचणी आणखी कशा वाढतील या विषयावर ते ढीगभर चर्चा करतात. हे असे का होते ? हे मला नेहमीच कोडयात टाकणारे आहे. खरे पाहता मोदी सर्व समाजाच्या कल्याणाचाच विचार करत आहेत. मग तरीही आपल्या समाजातील एक मोठा गट त्यांच्याशी हाडवैर असल्यासारखे का वागत आहे. ही अनाकलनीय गोष्ट आहे. त्यांच्या भाषणानंतर एक मेसेज फिरू लागला. आणि नेमका तेव्हाच मी हा लेख लिहीत होतो. त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करणे आणि सरकार चालवण्याकडे लक्ष न देणे. अशा सरकारने देशावर राज्य करणे म्हणजे दुर्दैव आहे. आता केवळ देवच आम्हाला यातून वाचवू शकतो. तो मेसेज मी वाचला आणि लक्षात आले की, हे कोणा बुद्धिजीवी व्यक्तीने केलेले विडंबन आहे. मोदींनी दिलेला मेसेज आपल्याला संघटित होऊन लढण्यासाठी प्रेरित करतो. त्याचवेळेस अशा टीकेचा धनीही होतो. असे का होत असावे? पूर्वीचे भारतीय नेते जनतेशी कवचितच अशा भाषेत बोलले आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांची भाषा मवाळ होती. त्यामुळे ते जनतेच्या मनात देशाभिमान जागृत करू शकले नाहीत. किंबहुना लोकांच्या नजरेत ते अयशस्वी ठरले. आमच्याकडे अशी कोणीही व्यक्ती नाही जिला आम्ही आमच्या कठीण काळात आशेचा किरण समजू शकू. संकटकाळाचे व्यवस्थापन करू शकेल असे कोणीही नाही.

गांधीजींनी शांततेने माघार घेतली आणि स्वतःची सुटका करून घेतली. पण तेच जेव्हा जनतेला संकटाना तोंड द्यावे लागले तेव्हा मात्र त्यांच्या पाठीशी उभे न राहता चरखा फिरवीत बसले. फाळणीच्या वेळेस नेहरूंनी वास्तवाचे भान ठेवले नाही. चिनी आक्रमणादरम्यान त्यांनी जनतेला आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास देण्यात कमीपणा दाखवला. असे मला वाटते. बरेचदा तर ते डोकं आपल्या दोन्ही हातात खुपसून बसले आहेत असे निराशाजनक चित्र असायचे. शतकानुशतकांच्या गुलामगिरीच्या शृंखलातुन बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा आमच्यातील राष्ट्रभावना चेतवायला आणि आम्हाला एकत्र आणायला आमचे बहुतेक नेते अपयशी ठरले. आम्ही आमच्या नेत्यांमधील निष्क्रियतेसाठी त्यांना कधीच जबाबदार धरले नाही किंवा त्यांना त्यासंबंधी जाब ही विचारला नाही. आम्ही त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारले.

आणि आम्हीही तसेच वागत राहिलो आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत बसलो. हीच खरी शोकांतिका आहे. बांग्लादेशसोबत झालेल्या युद्धाच्या वेळी इंदिरा गांधी सुद्धा मवाळ राहिल्या. आणि खापर मात्र माणेकशॉ सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर फोडले गेले. इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली. हजारो लोकांना तुरुंगात टाकले. अत्याचार केले पण इंदिरा गांधींनी स्वतः याची जबाबदारी घेतली नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा राजीव यांनी पदभार न स्वीकारता जेव्हा एखादे मोठे झाड कोसळते तेव्हा पृथ्वी हादरते. असे विधान केले. या त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजातील दरी अजून वाढली जी अजूनतरी सांधली गेलेली नाही. मनमोहन सिंग यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘हिंदू दहशतवाद’ या नवीन शब्दाला परवानगी दिली. थांबा, शांत राहा, काहीही करू नका. धोरण हेच होते की आपल्यामधील निष्क्रियता कायम राहावी.

मोदीजी हे असे पहिले नेते आहेत जे ती भाषा बोलत नाहीत. एक दिवस इतिहासकार त्यांची ‘गुलामगिरीची मानसिकता नसलेले स्वतंत्र भारताचे पहिले नेते’ म्हणून नोंद करतील. मोदीजी हे एक उत्तम आपत्ती व्यवस्थापक आहेत. जे त्यांच्यापुढील समस्यांना अतिशय शांतपणे तरीही गंभीर पद्धतीने हाताळतात. उदा. ३७० कलम रद्द करणे, राममंदिराचा मुद्दा. जगाला असा हिंदू नेता पाहण्याची सवय नाही. जो नेहरूंसारखी भीक मागत नाही, विनवणी करत नाही. किंवा मनमोहनसिंग यांच्यासारखी हाताची घडी घालून उभा राहत नाही. मोदीजी असे नेते आहेत जे झालेल्या प्रत्येक जखमेचा, दुखापतीचा हिशोब ठेवतात आणि बचावात्मक न राहता व्याजासकट परत करतात. पूर्वीच्या नेत्यांनी अशाप्रकारे कधीच संकटाला तोंड दिलेले नाही. आपणही जर अशा पद्धतीने वागलो तर आपल्यातील निष्क्रियतेच्या अवगुणावरून जे आपल्याकडे बघितले जाते तो अवगुण पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच नष्ट होईल.

मला ब्रिटिशांबद्दल एक जुनी म्हण आठवली. शांततेच्या काळात त्यांना सांभाळणे अशक्य असते. परंतु जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा सर्व मतभेद विसरून जातात. आम्हा भारतीयांचे मात्र उलट आहे संकटाच्या काळात आम्ही एखाद्या विरलेल्या कापडाच्या धाग्याप्रमाणे वेगळे होतो. आणि आमच्या शत्रूला आम्ही विनंती करतो की आम्हाला मदत कर. आम्ही एकमेकांचे दोष दाखवण्यातच धन्यता मानतो. भारताच्या प्रत्येक शत्रूला अलेक्झांडर, मोहोंमद घोरीपासून ते सध्याच्या काळात ब्रिटिशांपर्यंत सर्वाना हे माहित आहे. हा बदल जर घडला तर आपण पुन्हा गुलाम होऊ शकणार नाही. आणि मला पक्की खात्री आहे की मोदींची भाषणे हा बदल घडवून आणू शकतील. हा आपल्यातील दोष पिढ्यानुपिढ्या तसाच चालत आलेला आहे. जो दुरुस्त केला जाऊ शकत नाही किंवा आपल्याला अशा एका नेतृत्वाची गरज आहे जे आपल्यातील ही कमतरता दूर करू शकेल.

माझी अशी खात्री आहे की उदारमतवादी, बुद्धिजीवी आणि वसाहती परंपरेत शिकलेल्याना मोदींविषयी वाटणाऱ्या द्वेषाचे कारण एवढेच आहे की मोदींच्या नेतृत्वाने या दोषाचे निराकरण केले आहे. त्यांनी राष्ट्राला दिलेल्या संदेशाचे मूल्यमापन कसे केले जाईल? राष्ट्राची ही मानसिकता बौद्धिक मार्गाने नक्कीच बदलू शकते ही मला खात्री आहे. ही फक्त सुरुवात असू शकते जी इतर कोणत्याही भारतीय नेत्याने केलेली नव्हती. जर आताच्या काळात गांधी, नेहरू असते तर दिशाहीनता, अकार्यक्षमता आणि असहायता याशिवाय दुसरे काहीही पाहायला मिळाले नसते. मोदींची विरोधी पक्षाशी वागण्याची शैली इतर नेत्यांपेक्षा वेगळी आहे. विरोधी पक्षाच्या चुकीच्या कामावर लक्ष ठेऊन योग्य वेळी त्यांना कोंडीत पकडणे हीच ती शैली मोदींची पद्धत बचावात्मक नसली तरी शत्रूवर हल्ला करणारी आहे.

आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाला ‘आक्रमक नेतृत्व’ म्हणले जाते. हे त्यांच्या प्रत्येक विरोधकाला माहित आहे आणि म्हणूनच जास्त धोका आहे. इतिहासातील महान नेते, पुढारी त्यांच्या जनतेतील निष्क्रियता दूर करण्यासाठी आणि पुन्हा एकजूट होऊन उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते फक्त आश्वासने देत नाहीत तर जनतेकडून बलिदानाची मागणी करतात. ज्यामुळे जनता मोठ्या राष्ट्रीय कारणासाठी त्यांच्या पाठीशी उभी राहते. आयसेन होवर, विन्स्टन चर्चिल, बिस्मार्क केनेडी हे संकट काळातच महान नेते बनले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चर्चिलने ब्रिटिशांचे नेतृत्व केले होते. आणि जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर बलिदान देण्यास मागेपुढे पाहू नका असे सांगितले. त्यांनी त्यांच्या भाषणात दुसरे काही हक्काने मागितले नाही. पण संघर्ष आणि धैर्य मागितले. मोदीही तेच करत आहेत. कदाचित म्हणूनच मोदींना हटवण्यासाठी त्यांचे विरोधक सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहेत. अगदी पाकिस्तान, चीन अमेरिकेकडूनही मदत मागत आहेत.

इतिहासामध्ये नरेंद्र मोदींची नोंद कशाप्रकारे होईल? ते एक असा नेता म्हणून लक्षात राहतील ज्यांनी लोकांना झोपेतून जागे केले. या आधी कोणत्याही नेत्याने असा प्रयत्न केलेला नाही. प्रत्येक वेळेस जेव्हा त्यांनी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचा उपहास केला गेला. या कडे इतिहास कोणत्या दृष्टीने पाहील. हजारो वर्षांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या जनतेस त्यांनी साखळदंडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. प्लेटोच्या गुहेच्या गोष्टीप्रमाणे लोकांना त्यांच्या भिंतीवरील सावल्यांशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. त्याचा पाठलाग करत त्यांना पुढे जावे लागले अशा प्रकारे इतिहासात मोदींचे वर्णन होईल असे मला वाटते.

Related posts

Leave a Comment