अभ्यासक्रमासाठी नेमलेले विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हा दोष आपल्या शिक्षणपद्ध-तीत आढळतो. विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात. इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात. शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणाऱ्या माहिती व कौशल्याचे त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते. त्यामुळेच असेल कदाचित. पण परीक्षेत उत्तम गुण…
Read MoreCategory: शैक्षणिक
ज्ञानाधिष्ठित उद्योगांच्या जाळ्यातून महाराष्ट्राचा विकास शक्य
महाराष्ट्र उद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान व शिक्षण या क्षेत्रांमध्ये अग्रेसर होताच; मात्र हे स्थान टिकवून ठेवून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी निश्चितच ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबतीमध्ये एक होऊन महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. – शरद मेस्त्री आपापल्या राज्यातील शास्त्रज्ञांचा, संस्थांचा खुबीने उपयोग करून घेत शेजारी राज्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. या स्थितीत संस्थांना स्वायत्तता, भक्कम आर्थिक पाठबळ आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊनच महाराष्ट´ाला आपले स्थान टिकवता येईल. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट´ाचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे. भारतातील पहिल्या…
Read More