विनय, दिनेश आणि सुधीर ढाका जिल्ह्यातील राऊत भोग गावात ११ सप्टेंबर १९०८ रोजी जन्मलेले विनय कृष्ण बसू अॅक्शनच्या वेळी ढाक्याच्या मिट फोर्ड मेडिकल स्कूलमध्ये चवथ्या वर्षाचा अभ्यास करीत होते. सुधीर गुप्त ढाका जिल्ह्यातील सिमुलिया गावचे तर, दिनेशचंद्र गुप्तचा जन्म ढाका जिल्ह्यातीलच यशलम गावातला. या तिन्ही वीरांची गावं आता बांगलादेशात आहेत. धगधगत्या वातावरणात वावरणारे हे वीर कळत नकळत क्रांतिकार्याकडे ओढले गेले. ज्यावेळी चितगाव भागात सूर्यसेनांची सेना जीवावर उदार होऊन जुलमी सरकारशी दोन हात करीत होती. त्याचवेळी कलकत्ता शहरात आणि बंगालच्या इतर प्रांतात ‘बंगाल वॉलेंटियर्स’ काम करीत होते. हेमचंद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली…
Read More