देशभक्ती

deshbhakti

विनय, दिनेश आणि सुधीर

ढाका जिल्ह्यातील राऊत भोग गावात ११ सप्टेंबर १९०८ रोजी जन्मलेले विनय कृष्ण बसू अॅक्शनच्या वेळी ढाक्याच्या मिट फोर्ड मेडिकल स्कूलमध्ये चवथ्या वर्षाचा अभ्यास करीत होते. सुधीर गुप्त ढाका जिल्ह्यातील सिमुलिया गावचे तर, दिनेशचंद्र गुप्तचा जन्म ढाका जिल्ह्यातीलच यशलम गावातला. या तिन्ही वीरांची गावं आता बांगलादेशात आहेत.

धगधगत्या वातावरणात वावरणारे हे वीर कळत नकळत क्रांतिकार्याकडे ओढले गेले. ज्यावेळी चितगाव भागात सूर्यसेनांची सेना जीवावर उदार होऊन जुलमी सरकारशी दोन हात करीत होती. त्याचवेळी कलकत्ता शहरात आणि बंगालच्या इतर प्रांतात ‘बंगाल वॉलेंटियर्स’ काम करीत होते. हेमचंद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली एकेक मोहीम आखून ती सफल करीत होते. याच गुप्त संस्थेच्या सदस्यांनी मिदनापूरच्या गोऱ्या कलेक्टरला स्वर्गाची वाट दाखविली. त्या घटनेपासून कलेक्टर म्हणून मिदनापूरला जायला गोरे अधिकारी घाबरू लागले. ढाका विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होता. त्या समारंभाला बंगाल प्रांताचे गव्हर्नर सर ह्यूज स्टीव्हन्सन जातीनं हजर राहणार होते. त्याचवेळी त्यांना टिपायचं आणि जुलमी सरकारला धडा शिकवायचा, असा संस्थेच्या सभासदांनी निर्णय घेतला. ही कामगिरी त्यांनी सळसळत्या रक्ताच्या विनय बसूंवर टाकली.

सोपविलेली कामगिरी पार पाडायची. काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही’ असं त्या तिघांनी ठरवून टाकलं होतं. त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी जितकी धाडशी होती, तितकीच वेगळीही होती. भरवस्तीतील रायटर्स बिल्डिंगमध्ये शिरुन अत्याचारी सरकारी अधिकाऱ्यांना यमसदनाला पाठवायची ती अॅक्शन होती. आणि ही कामगिरी पार पाडायची होती भरदिवसा, दुपारच्या बाराच्या ठोक्याला. ‘बंगाल वॉलेंटियर्स’ ने आखलेल्या या मोहिमेचं नेतृत्व करणार होते विनय बसू आणि त्यांना मदत करणार होते सुधीर गुप्त आणि दिनेश गुप्त.

ढाका जिल्ह्यातील राऊत भोग गावात ११ सप्टेंबर १९०८ रोजी जन्मलेले विनय कृष्ण बसू अॅक्शनच्या वेळी ढाक्याच्या मिट फोर्ड मेडिकल स्कूलमध्ये चवथ्या वर्षाचा अभ्यास करीत होते. सुधीर गुप्त ढाका जिल्ह्यातील सिमुलिया गावचे तर, दिनेशचंद्र गुप्तचा जन्म ढाका जिल्ह्यातीलच यशलम गावातला. या तिन्ही वीरांची गावं आता बांगलादेशात आहेत.

धगधगत्या वातावरणात वावरणारे हे वीर कळत नकळत क्रांतिकार्याकडे ओढले गेले. ज्यावेळी चितगाव भागात सूर्यसेनांची सेना जीवावर उदार होऊन जुलमी सरकारशी दोन हात करीत होती. त्याचवेळी कलकत्ता शहरात आणि बंगालच्या इतर प्रांतात ‘बंगाल वॉलेंटियर्स’ काम करीत होते. हेमचंद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली एकेक मोहीम आखून ती सफल करीत होते. याच गुप्त संस्थेच्या सदस्यांनी मिदनापूरच्या गोऱ्या कलेक्टरला स्वर्गाची वाट दाखविली. त्या घटनेपासून कलेक्टर म्हणून मिदनापूरला जायला गोरे अधिकारी घाबरू लागले.

ढाका विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होता. त्या समारंभाला बंगाल प्रांताचे गव्हर्नर सर ह्यूज स्टीव्हन्सन जातीनं हजर राहणार होते. त्याचवेळी त्यांना टिपायचं आणि जुलमी सरकारला धडा शिकवायचा, असा संस्थेच्या सभासदांनी निर्णय घेतला. ही कामगिरी त्यांनी सळसळत्या रक्ताच्या विनय बसूंवर टाकली.

संस्थेच्या सदस्यांनी टाकलेल्या विश्वासामुळे विनयची छाती अभिमानानं फुगली आणि वेगळ्याच धडाडीनं ते कामाला लागले.

ज्या गाडीनं गव्हर्नर कलकत्त्याहून ढाक्याला जात होते त्याच गाडीतून विनय बसू प्रवासाला निघाले. वधाच्या दृष्टीनं त्यांनी सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं. गव्हर्नरला नीटपणे पाहून घेतलं. विनय बसूंनी ढाक्यात पाय ठेवला आणि निरोप आला ‘गव्हर्नराच्या वधाचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. त्याऐवजी आय.जी.पी.लोमॅनला मार्गी लावा.’

लोमॅन एका पोलीस अधिकाऱ्याची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याची बातमी क्रांतिकारकांना कळली.  लोमॅनसोबत ज्येष्ठ पोलीस अधिकारी हडसनही जाणार होता. विनय बसूंनी झटपट सगळी तयारी केली. संस्थेचे एक सदस्य अनिमेष रॉय यांच्याकडून त्यांनी रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली आणि बरोबर नऊ वाजता विनय बसू सावजाच्या मागावर हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. सिव्हिल सर्जन ब्रूमफिल्डबरोबर लोमॅन आणि हडसन बोलत होते. विनयनी संधी साधली आणि गोळ्या झाडल्या. लोमॅनला लागलेल्या दोन गोळ्यांमुळे तो भुईसपाट झाला. हडसनला तीन गोळ्या लागल्या पण तो वाचला. झालेल्या आवाजाने आजूबाजूचे लोक सावध झाले आणि त्यांनी विनयला पकडण्यासाठी धावाधाव सुरु केली. चपळ विनय भींतीवरुन उड्या मारुन आमेंनी टोला मैदानापर्यंत पोहोचले. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने, कधी  पायी तर कधी वाहनाने प्रवास करीत ते कलकत्त्याला पोहोचले.


सुफी अंबाप्रसाद

ज्याच्या हृदयात देशभक्तीची ज्योत तेवत असते, तो शिक्षा भोगूनही शांत राहत नाही. आपलं कार्य करीतच राहतो. भगतसिंहाचे काका अजित सिंह आणि सुफी अंबाप्रसादांनी पुन्हा ‘भारतमाता युवा सोसायटी’ च्या कामाची सुरुवात केली. वेगवेगळी पुस्तकं लिहून आणि प्रकाशित करुन सुफीजी हिंदी लोकांची मनं पेटवीत होते. १९०९ साल उजाडलं. बंगालात क्रांतिघटना वेगानं घडत होत्या. त्याचवेळी सुफी अंबाप्रसाद ‘पेशवा’ नावाच्या वर्तमानपत्रातून पंजाब प्रांतात क्रांतीचे विचार पसरवीत होते.

या देशाच्या, मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य उधळून टाकले. त्यातील काहीची नावं भारतीयांच्या ओठावर आहेत; तर काहींची नावं फक्त इतिहासालाच ठाऊक आहेत. त्या प्रत्येकाची देशभक्ती प्रामाणिक होती, त्या प्रत्येकाचा त्याग मोठा होता. त्यातलेच एक मातृभूमी-भक्त होते सुफी अंबाप्रसाद!

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी जेव्हा पहिले स्वातंत्र्ययुद्ध- सुरु होते त्याच काळात १८५८ ला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे सुफीजींचा जन्म झाला. जन्मत:च त्यांचा उजवा हात तुटलेला होता. ‘सत्तावन्नच्या युद्ध-ात आपण एक सैनिक होतो. लढता लढता आपला हात तुटला. त्यामुळे मरण आलं. पुढच्याच वर्षी आपला पुनर्जन्म झाला. मात्र, तुटलेला हात तसाच राहिला.’ आपल्या तुटलेल्या हाताची अशी गमतीदार कथा ते सांगत.

मुरादाबाद, बरेली आदी शहरांतील शाळांमधून प्राथमिक-माध्यमिक, शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरु केला. अभ्यास केला तरी वकिली केली नाही. कारण त्यांना वकिली करायची ती हिंदुस्थानची. आपल्या मातृभूमीची !

अठराशे नव्वदच्या दरम्यान मुरादाबाद शहरातून ‘जमिउल इलम’ नावाचं उर्दू पत्र निघू लागलं. लिखाणाची आवड असणाऱ्या सुफीजींनी ‘जमिउल इलम’ मधून लिखाण सुरु केलं. सरकारच्या धोरणावर न घाबरता टीका करणाऱ्या सुफीजींकडे सरकारचं लक्ष होतंच. उत्तर प्रदेशमधल्या संस्थानांतील गोऱ्या रेसिडेन्टसच्या कृत्यांवर त्यांनी आसूड ओढला. कुणाचीही तमा न बाळगता त्यांनी रेसिडेन्टची कृत्ये वेशीवर टांगली. एका हिंदी माणसानं केलेले आरोप इंग्रज लोक थोडेच सहन करणार. त्यांनी सुफी अंबाप्रसादांवर खटला भरला. त्यांना सहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. इतकं करुनही सरकारचं समाधान झालं नाही म्हणून शेवटी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

१९०६ साली सुफीजी शिक्षा भोगून बाहेर आले. हैदराबादच्या निजामाचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. तरीही ते तिथं जास्त काळ थांबले नाहीत. पंजाबात परतून त्यांनी हिंदुस्थान वर्तमानपत्रात नोकरी धरली. पगार खूपसा मिळत नव्हता. पण सुफीजी लोकजागृती करीत पंजाबातच थांबले.

अजित सिंग यांनी त्यावेळी पंजाबात ‘भारतमाता सोसायटी’ या गुप्त संस्थेची स्थापना केली होती. देशासाठी, देश स्वातंत्र्यासाठी तळमळणाऱ्या सुफीजींनी भारतमाता सोसायटीत प्रवेश केला. सरकारच्या विरुद्ध- जनजागृती करणाऱ्यांना सरकारने अटक करायला सुरुवात केली. तेव्हा अजित सिंग व सुफी अंबाप्रसाद नेपाळला गेले. तिथंही त्यांनी गव्हर्नर जंगबहादुर यांच्या मदतीने इंग्रजांविरोधात लोकांमध्ये जागृती सुरु केली. इंग्रज सरकारने जंगबहादूरला पदावरुन काढून टाकले आणि सुफीजींना अटक करुन लाहोरला आणण्यात आले. ‘इंडिया’ नावाच्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखाबद्दल त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. मात्र त्या खटल्यातून ते निर्दोष सुटले.

ज्याच्या हृदयात देशभक्तीची ज्योत तेवत असते, तो शिक्षा भोगूनही शांत राहत नाही. आपलं कार्य करीतच राहतो. भगतसिंहाचे काका अजित सिंह आणि सुफी अंबाप्रसादांनी पुन्हा ‘भारतमाता युवा सोसायटी’ च्या कामाची सुरुवात केली. वेगवेगळी पुस्तकं लिहून आणि प्रकाशित करुन सुफीजी हिंदी लोकांची मनं पेटवीत होते. १९०९ साल उजाडलं. बंगालात क्रांतिघटना वेगानं घडत होत्या. त्याचवेळी सुफी अंबाप्रसाद ‘पेशवा’ नावाच्या वर्तमानपत्रातून पंजाब प्रांतात क्रांतीचे विचार पसरवीत होते. बंगालप्रमाणे पंजाब पेटून उठू नये म्हणून सरकारने दडपशाही सुरु केली. देशभक्त क्रांतिकारकांची धरपकड सुरु केली. पण तोपर्यंत अजित सिंह आणि सुफीजी सावध झाले होते. त्यांनी हिंदुस्थान सोडला, काही दिवसांतच ते इराणमध्ये पोहोचले.

गोऱ्या इंग्रजांनी तिथंही त्यांची पाठ सोडली नाही. व्यापाऱ्यांच्या तांड्यात सुफीजी आणि अजित सिंह आहेत अशी बातमी लागताच इंग्रज शिपायांनी त्या तांड्याला घेरले. आपण पकडले जाणार याची त्या दोघांना खात्री पटली. पण व्यापाऱ्यांनी त्यांना उंटांच्या पाठीवरच्या पेटाऱ्यांमध्ये लपविलं. तांडा पुढे निघाला. पण पकडायला आलेल्या इंग्रज शिपायांना सुफीजी सापडले नाहीत आणि अजित सिंहही !

एका श्रीमंत गृहस्थाच्या घरी सुफीजी थांबले असताना इंग्रजांनी धाड घातली तेव्हाही बुरखा घालून ते इंग्रजांच्या घेऱ्यातून निसटले. इराणमध्ये सुफीजी ‘आका सुफी’ नावानं लोकप्रिय झाले होते.

अजित सिंह टर्कीला गेल्यानंतर सुफीजी एकटेच इराणमध्ये राहिले. ‘आबेहयात’ नावाचं पत्र सुरु करुन त्यांनी इंग्रजांचे कुटिल डाव जनतेसमोर मांडायला सुरुवात केली. १९१५ साली इंग्रजांनी इराणवर सत्ता गाजविण्यासाठी, सिराज शहराला वेढा घातला. सुफीजीने स्वस्थ बसणं शक्य नव्हतं. आपल्या हाती रिव्हॉल्व्हर घेऊन ते इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी पुढे सरसावले. पण शस्त्रसज्ज इंग्रजांपुढे त्यांची शक्ती तोकडी पडली. अनेकदा इंग्रजांना गुंगारा देणारे सुफीजी अखेर इंग्रजांच्या हाती सापडले. इंग्रजांनी त्यांना लष्करी कोर्टात उभं केलं. हिंदुस्थानातच नव्हे तर इराणमध्येही गोऱ्यांच्या विरोधात रान उठवणाऱ्या सुफीजींना गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षेची अंमलबजावणी दुसऱ्या दिवशी होणार होती. तोपर्यंत त्यांना कोठडीत बंद करण्यात आलं.

सकाळ झाली. शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी सुफीजींच्या कोठडीचा दरवाजा उघडण्यात आला. पण गोळ्या झाडण्याची वेळच आली नाही. कारण सुफी अंबाप्रसादांनी समाधी अवस्थेतच आपल्या जीवनाची समाप्ती केली होती. १९१५ च्या फेब्रवारी महिन्यात देशकार्य करताना समाधिस्थ झालेल्या सुफी अंबाप्रसादांचा ‘आका सुफी’ चा उत्सव आजही इराणात साजरा होत असतो.


इंदुभूषण रॉय

चंद्रनगर हे फ्रेंच वसाहतीतील एक ठिकाण होतं. चंद्रनगरमध्ये राहून कन्हैयालाल दत्त कलकत्त्यातील क्रांतिकारकांना मदत करीत होतं, त्यांना लागणारी शस्त्रास्त्रे पाठवीत होते. पण चंद्रनगरच्या मेयरने वसाहतीत शस्त्रास्त्रांच्या आयातीस बंदी घातली. ‘आपली अडचण करणाऱ्या मेयरलाच उडवायचा’ निर्णय युगांतरच्या क्रांतिकाराकांनी घेतला. मेयरवर बॉम्ब टाकण्याची कामगिरी इंदुभूषण आणि नरेंद्रवर सोपविण्यात आली. दिवस ठरवून दिला १० एप्रिल १९०८…

युगांतरच्या जागेत राहणाऱ्या इंदुभूषण रॉय यांच्या वाचनात अनेक ऐतिहासिक ग्रंथ आले. ‘आपल्या गुलाम मायभूच्या स्वातंत्र्यासाठी काही तरी करायला हवं’ असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याच वेळी बंकीमचंद्राची ‘आनंदमठ’ इंदुभूषण यांनी वाचली नि ते तन-मनानं चिडून उठले. त्यांनी मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचं ठरविलं.

त्याचं नाव होतं इंदुभूषण रॉय. खुलनाजवळच्या एका लहानशा खेडेगावचे ते रहिवाशी. वंगभंगाची चळवळ बंगालात जोर धरु लागली त्यावर्षी ते हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शिकत होते. प्रवेश परीक्षेत पास होऊ न शकलेल्या इंदुभूषणच्या डोक्यात नको त्या गोष्टी येण्यापूर्वी त्यांना संसारात अडकवावे असा घरच्या मंडळींनी विचार केला. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाचा विषय काढला. मात्र इंदुभूषण यांनी निक्षून सांगितलं, ‘मला लग्न करायचं नाही.’

घरात राहिलं की कधीना कधी लग्नाचा विषय हा निघणारच. हे लक्षात येताच इंदुभूषणांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

मुक्तपणे जगणाऱ्या पक्ष्यांनाही घरट्यांचा आधार असतोच. इंदुभूषण रॉयना माणिकताळा बागेतील युगांतरची जागा राहायला मिळाली. आपल्या घरातून बाहेर पडलेल्या इंदुभूषण यांनी कलकत्ता गाठलं. तिथं त्यांची गाठ नरेंद्र गोस्वामीशी पडली. नरेंद्रमुळे ते कन्हैयालाल दत्तांपर्यंत पोहोचले. तेव्हापासून त्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली. कालिमातेच्या साक्षीनं गुप्ततेची शपथ घेतलेल्या इंदुभूषण यांनी स्वत:ला ‘युगांतर’ संघटनेच्या कार्यात झोकून दिले.

युगांतरच्या जागेत राहणाऱ्या इंदुभूषण रॉय यांच्या वाचनात अनेक ऐतिहासिक ग्रंथ आले. ‘आपल्या गुलाम मायभूच्या स्वातंत्र्यासाठी काही तरी करायला हवं’ असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याच वेळी बंकीमचंद्राची ‘आनंदमठ’ इंदुभूषण यांनी वाचली नि ते तन-मनानं चिडून उठले. त्यांनी मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचं ठरविलं.

‘युगांतर’ चे एक-एक कार्यक्रम आखले जायचे. प्राणावर उदार झालेले तरुण प्रत्येक मोहिमेत सहभागी व्हायला मिळावं म्हणून धडपडत असायचे आणि या सर्व तरुणांमध्ये आघाडीवर असायचे इंदुभूषण रॉय.

चंद्रनगर हे फ्रेंच वसाहतीतील एक ठिकाण होतं. चंद्रनगरमध्ये राहून कन्हैयालाल दत्त कलकत्त्यातील क्रांतिकारकांना मदत करीत होतं, त्यांना लागणारी शस्त्रास्त्रे पाठवीत होते. पण चंद्रनगरच्या मेयरने वसाहतीत शस्त्रास्त्रांच्या आयातीस बंदी घातली. ‘आपली अडचण करणाऱ्या मेयरलाच उडवायचा’ निर्णय युगांतरच्या क्रांतिकारकांनी घेतला. मेयरवर बॉम्ब टाकण्याची कामगिरी इंदुभूषण आणि नरेंद्रवर सोपविण्यात आली. दिवस ठरवून दिला १० एप्रिल १९०८…

ठरल्या दिवशी ठरल्या वेळी दोघे मेयरच्या बंगल्याजवळ पोहोचले. हातातल्या बॉम्बची पिन ओढून इंदुभूषणांनी बॉम्ब टाकला.

धडका उडाला. आभाळभर धूर पसरला. दोघांनाही काम फत्ते झाल्यासारखं वाटलं. पण स्फोटात कुणीही जखमी झालं नव्हतं. हे समजलं तेव्हा इंदुभूषण निराश झाले.

काही दिवसांतच दुसरा बॉम्ब फेकला गेला. खुदीराम प्रफुल्लकुमार चाकी यांनी टाकलेल्या बॉम्बने केनडी स्त्रियांचा घास घेतला. सरकार जागं झालं. क्रांतिकारकांची धरपकड सुरु झाली. माणिकताळा बागेतील कचेरीवर पोलिसांनी छापा घातला आणि अनेक क्रांतिकारक गजाआड गेले. त्यात अठरा वर्षे वयाचे इंदुभूषण रॉयही होते.

अलिपूर खटला उभा राहिला. निकाल लागला. क्रांतिकारकांना वेगवेगळ्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. काही जणांना हद्दपार करण्यात आलं. काही देशभक्तांना सक्त मजुरीची शिक्षा झाली, तर काहींना जन्मठेपेची शिक्षा बहाल करण्यात आली. इंदुभूषण रॉय यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावून अंदमानला पाठविण्यात आलं.

देशासाठी त्याग करायला सिद्ध- झालेले इंदुभूषण क्रूर जेलर बारीच्या हाती सापडले. गजबंदी पाहिले की बारीच्या कपाळावर आठ्या पडत. चोर, दरोडेखोरांना मिळणाऱ्या सवलतीही राजबंद्यांना देण्याची त्याची तयारी नसे. राजबंद्यांना बैलासारखं घाण्याला जुंपलं जायचं. दिवसभर घाणा ओढून त्यांना जनावरांच्या चौपट तेल काढावं लागायचं.

घाणा ओढताना कुणी थांबला की चाबूक ओढला जायचा. क्रांतिकारकांची पाठ सोलली जायची.

दहा वर्षांनतर आपल्याला परत हिंदुस्थानात जायला मिळणार या आशेवर इंदुभूषण बारीचे सगळे अत्याचार सहन करीत होते. आपण तुरुंगाबाहेर पडू त्यावेळी आपली मातृभूमी स्वतंत्र झालेली असेल असं त्यांना वाटत होतं.

कोलूला जुंपलेल्या रॉयना एके दिवशी तुरुंगाबाहेरच्या कामावर पाठविण्यात आलं. लाकूडफाटा गोळा करताना होणारा त्रास आणखी भयानक असे. जंगलातील गांधीलमाशा कडकडून चावा घेत आणि धडधाकट माणूसही तापानं बेजार होई. ताप आला, शरीरातील शक्ती संपली तरी कैद्यांना काम करावंच लागे.

जंगलात काम करताना गांधीलमाश्या चावल्या आणि इंदुभूषणांना ताप चढला. ते त्रासदायक काम त्यांनी नाकारलं म्हणून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकण्यात आल्या. रॉयना पहायला स्वत: बारी आला. आजारी इंदुभूषणांवर तोंडसुख घेऊन बारीनं त्यांना परत कोलू पिसायला पाठवायची वॉर्डरला आज्ञा केली.

इंदुभूषण रॉय यांच्या अंगात ताप होता. त्यांना नीट उभं राहता येत नव्हतं. अंगभर मोठमोठे फोड आले होते. हाताची बोटंही हलविता येत नव्हती. पोटात अन्नाचा कणही नव्हता. तोंडही लालेलाल झालं होतं. अशा अवस्थेत वॉर्डर, जेलरच्या शिव्या खात ते घाणा ओढत होते.

शेवटी या कष्टातून अपमानी जगण्यातून सुटका करुन घ्यायचं असं इंदुभूषण रॉयनी ठरविलं. विश्रांतीचा अर्ज केल्यावर चिडलेल्या बारीने त्यांना तुरुंगाच्या कोठडीत डांबून टाकलं. अपमानाने कष्टी झालेल्या इंदुभूषणांनी अंगावरचे कपडे काढले. ते फाडून कपड्याच्या चिंध्या केल्या. त्या जोडून त्याचा फास तयार केला आणि तुरुंगाच्या गजाला फास लावून त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला. परकीयांचा जुलूम सहन करण्यापेक्षा मरण बरं असा विचार करुन इंदुभूषणांनी आत्मत्याग केला ती तारीख होती. २८ एप्रिल १९१२ आणि स्थळ होतं अंदमानच्या तुरुंगाची काळकोठडी.


मास्टर अमीरचंद

शाळेतील नोकरी सोडल्यानंतर अमीरचंदांची काही वर्षे हलाखीची गेली. पण देशभक्त हनुमंत सहाय यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय शाळेत त्यांना मुख्य शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्यांची स्थिती सुधारली. पण बेकारीच्या काळातही सरकारविरोधी पत्रकं काढणं, बॉम्ब तयार करायला शिकवणं, सरकारविरोधात उठाव करण्यासाठी लोकांना तयार करणं अशा प्रकारची क्रांतिकार्ये मास्टर अमीरचंद करीतच होते.

इंग्लंडच्या बादशहाचा प्रतिनिधी लॉर्ड हार्डिंज २३ डिसेंबर १९१२ रोजी कलकत्त्याहून दिल्लीत येणार ही वार्ता भारतभर पसरली. पंजम जॉर्जच्या मिरवणुकीसारखीच व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज याची मिरवणूक काढण्याचं सरकारनं ठरविलं होतं. त्याच मुहूर्तावर बलाढ्य ब्रिटिशांच्या या प्रतिनिधीला दणका द्यायचा असा रासबिहारी बोस यांनी निर्णय घेतला. ताबडतोब त्यांनी आपल्या क्रांतिकारक मित्रांची दिल्लीतच बैठक घेतली. कुणी काय करायचं, कुठे थांबायचं, कुठून बॉम्ब टाकला की हार्डिंजवर नेमका पडेल याची पाहणी करण्यात आली.

बंगालपासून पंजाबपर्यत क्रांतिकारकांची साखळी बांधण्याचं काम रासबिहारी बसूंसारख्या दूरदृष्टीच्या क्रांतिकारकानं सुरू केलं होतं. सरकारी नोकरी करणाऱ्या रासबिहारींचा सरकारला अजिबात संशय येत नव्हता. पण त्यांच्या मार्गदर्शनानुसारच गोऱ्यांवर बॉम्ब फेकले जात होते. अशीच एक घटना घडली भारताच्या राजधानीत, तारीख होती २३ डिसेंबर १९१२ आणि स्थळ होतं दिल्ली शहरातील गजबजलेला भाग चांदनी चौक.

वर्षापूर्वी म्हणजे १९९१ च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीला पंजम जॉर्ज बादशहाचा दरबार भरला होता. त्या सोहळ्यातच बॉम्बचा धडाका उडवून ब्रिटिश सत्तेलाच धडक देण्याचं क्रांतिकारकांच्या मनात होतं पण काही कारणांमुळे क्रांतिकारकांना ते शक्य झालं नाही.

मात्र तशीच संधी वर्षभरात चालून आली. कोणत्याही कारणांनी ही संधी हातची जाऊ द्यायची नाही असा देशभक्त क्रांतिकारकांनी विचार नव्हे निश्चय केला. हजारो लोकांच्या उपस्थितीत बॉम्बचा स्फोट करायला तयार झालेल्या चार निधड्या छातीच्या क्रांतिकारकांना रासबिहारींचं मार्गदर्शन लाभलं होतं आणि ते वीर होते मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद, अवधबिहारी आणि वसंतकुमार विश्वास.

या चौघांमध्ये वयानं ज्येष्ठ होते मास्टर अमीरचंद. १८६९ साली अमीरचंदांचा जन्म झाला. तशी त्यांच्या घऱची स्थिती खूपच चांगली होती. त्यांचे वडील हुकूमचंद हे सरकारी खात्यात वरच्या हुद्यावर होते. बढतीची एक एक पायरी चढत ते असिस्टंट कमिशनरच्या पदापर्यंत पोहोचले होते. अमीरचंदांचे धाकटे बंधू लाला रतनचंद हे हैदाराबादमध्ये न्यायाधीश होते. कुटुंबातील माणसं सरकारची सेवा करण्यात गुंतलेली असताना अमीरचंदांच्या मनात देशभक्तीचे, देशाच्या स्वातंत्र्याचे विचार घोळत होते. दिल्लीच्या सेंट स्टिफन महाविद्यालयातून इंटरपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अमीरचंदांनी शिक्षण थांबविलं आणि शिक्षणप्रसार, विधवा विवाह यांसारख्या सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. उदरनिर्वाहासाठी त्यांनी सेंट स्टिफन शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. इंग्रजी आणि संस्कृत हे दोन विषय ते उत्तम शिकवीत असत. अमीरचंद याचा विवाह झाला होता. मात्र अपत्य नसल्यामुळे १८९८ साली त्यांनी आपल्या पुतण्याला रतनचंदांचा मुलगा सुलतानचंद याला दत्तक घेतले.

शाळेत शिक्षकाची नोकरी करीत असताना अमीरचंद राजकीय सभाना जात. त्या सभांतून आपले विचारही मांडत. त्यांचे हे उद्योग शाळेच्या संचालकांना पसंत पडले नाहीत त्यामुळे शेवटी त्यांना शाळेतील नोकरी सोडावी लागली.

रूपाने जेमतेम आणि रंगाने काळे असलेले अमीरचंद मित्रांमध्ये ‘बंदर मास्तर’ म्हणून ओळखले जात. आपल्या या टोपणनावाचा त्यांनाही कधी राग आला नाही.

शाळेतील नोकरी सोडल्यानंतर अमीरचंदांची काही वर्षे हलाखीची गेली. पण देशभक्त हनुमंत सहाय यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय शाळेत त्यांना मुख्य शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्यांची स्थिती सुधारली. पण बेकारीच्या काळातही सरकारविरोधी पत्रकं काढणं, बॉम्ब तयार करायला शिकवणं, सरकारविरोधात उठाव करण्यासाठी लोकांना तयार करणं अशा प्रकारची क्रांतिकार्ये मास्टर अमीरचंद करीतच होते. अवधबिहारी, भाई बालमुकुंद यांच्यासारख्या क्रांतीकारकांच्या मदतीनं मास्टरजींचे हे उद्योग सुरू होते.

आणि इंग्लंडच्या बादशहाचा प्रतिनिधी लॉर्ड हार्डिंज २३ डिसेंबर १९१२ रोजी कलकत्त्याहून दिल्लीत येणार ही वार्ता भारतभर पसरली. पंजम जॉर्जच्या मिरवणुकीसारखीच व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज याची मिरवणूक काढण्याचं सरकारनं ठरविलं होतं. त्याच मुहूर्तावर बलाढ्य ब्रिटिशांच्या या प्रतिनिधीला दणका द्यायचा असा रासबिहारी बोस यांनी निर्णय घेतला. ताबडतोब त्यांनी आपल्या क्रांतिकारक मित्रांची दिल्लीतच बैठक घेतली. कुणी काय करायचं, कुठे थांबायचं, कुठून बॉम्ब टाकला की हार्डिंजवर नेमका पडेल याची पाहणी करण्यात आली. बंगालमधल्या वसंतकुमार विश्वास यांना त्यांनी आधीच दिल्लीला बोलावून घेतलं. मिरवणुकीच्या आदल्या दिवशी लाहोरमधून अवधबिहारी, डेहराडूनहून रासबिहारी आणि जोधपूरहून बालमुकुंद दिल्लीला येऊन पोहोचले.

ठरलेल्या वेळी लॉर्ड हार्डिंज दिल्लीला येऊन दाखल झाला. त्याच्या स्वागतासाठी इंग्रज अधिकारी, राजेरजवाडे, दिल्ली नगरपालिकेचे सदस्य आदी लहानथोर उपस्थित होते. हार्डिंजच्या स्वागताची भाषणं झाली. एकतीस तोफांची सलामी झाली. खास सजविलेल्या हत्तीच्या पाठीवरच्या अंबारीत लॉर्ड हार्डिंज आणि त्याची पत्नी बसली नि शाही मिरवणूक निघाली.

दिल्लीच्या रेल्वे स्थानकांवरून निघालेली मिरवणूक चांदनी चौकाकडे आली. धीम्या गतीने सरकत सरकत मिरवणूक पंजाब नॅशनल बँकेच्या इमारतीसमोर आली आणि काही कळण्यापूर्वीच कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज झाला. मिरवणूक पाहणारी जनता भयानं थरथरून उठली. सगळा सोहळाच उधळला.

बुरखा पांघरलेल्या वसंतकुमार विश्वास यांनी टाकलेला बॉम्ब हत्तीच्या पाठीवरच्या हौद्याला आपटला.त्याचा स्फोट झाला. त्यातील पिना, स्कू, खिळे चहू दिशांना उधळले. हौद्याच्या मागे बसलेला जमादार जागच्या जागी मरण पावला. हार्डिंजचा मुकुट रस्त्यावर पडला. त्याचा उंची पेहराव जळून गेला. शरीरात अनेक ठिकाणी दुखापती झाल्या. काही वेळातच हार्डिज बेशुद्ध- पडला.

क्रांतिकारकांनी आपला डाव इतक्या पद्ध-तशीरपणे तडीस नेला की या कानाची बातमी त्या कानाला लागली नाही. पण ज्या देशात जिवावर उदार झालेला क्रांतिकारक होते, त्याच हिंदुस्थानात फितुरांचीही कमी नव्हती. अशाच एका दीनानाथने घात केला आणि दोन वर्षानंतर क्रांतिकारक सरकारच्या हाती सापडले. मग झालं, नेहमीचं न्यायदानाचं नाटक आणि हार्डिंजवर टाकलेल्या ‘बॉम्ब’ची शिक्षा म्हणून ८ मे १९१५ रोजी चार क्रांतिकारकांना फाशीवर चढविण्यात आलं. त्यातले एक होते. बंदर मास्टर – मास्टर अमीरचंद!

Related posts

Leave a Comment