इथं वाहक चालणाऱ्यांना श्रेष्ठ मानतात अशी संस्कृती आहे इथली. सिग्नलवर पादचारी रस्ता ओलांडताना वळण घेऊन जाणाऱ्या वाहनांना तेथून पुढे जायची परवानगी असते परंतु वाहक नेहमीच पादचाऱ्यांना आधी जाऊ देतो. ती लांबलचक भव्य गाडी सहजच अदबीने मागे थांबताना तुम्हाला अदबीने रस्ता ओलांडायची विनंती करीत असते. गाडीवाला अरेरावीत आधी पुढे निघून गेलाय असं एकदाही माझ्या पाहण्यात आलेलं नाही. नियमाप्रमाणे त्याला जायचा अधिकार आहे. परंतु पादचाऱ्यांना श्रेष्ठ मानणं हे वर्षान् वर्षाच्या त्यांच्या उच्च संस्कृतीवरून आलं असलं पाहिजे. -नि.श. गुळवणी, जपान झं सारं बालपण सत्तरच्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात सोळांकूरात अगदी मजेत…
Read MoreCategory: पर्यटन
कोकणातील निसर्गनवल
निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. उन्हाळी सुटी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच; पण येथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून हा अनुभव घ्यायला हरकत नाही. – आशुतोष बापट निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. पण फळांचा राजा आंबा, तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला…
Read Moreनाशिकचे काळाराम मंदिर
दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे. नाशिकमध्ये रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट्य काही आगळेच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच. पण त्याची बांधणीही काही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात…
Read More