गोळा नका करू !!! तुकडे करा….त्याचे !!!!

ब्रिटीशांनी अत्यंत हुशारीने ज्या व्यवस्था आपल्या देशावर लादल्या आहेत. त्यामध्ये न्यायव्यवस्था ही एक व्यवस्था आहे. भारतीय लोक मुळात चोर, दरोडेखोर आहेत त्यांना आम्ही आमच्या कायद्याच्या चौकटीत कसा न्याय देतो हे दाखवून कठोर शासन करायचे होते. तीच आजची आपली न्याय रचना आहे. रांझ्याच्या पाटलाने कुकर्म केले हे लक्षात येताच छत्रपती शिवाजी राजांनी त्याचा तात्काळ चौरंग (दोन्ही हातपाय तोडणे) करण्याचा आदेश दिला आणि पुढे स्वराज्यात असे कृत्य घडल्याचा दाखला नाही. कारण एखादे वाईट कृत्य घडल्या नंतर शासनकर्त्यावरचा आणि न्यायावरचा विश्वास टिकवायचा असेल आणि समाजात योग्य संदेश जायचा असेल तर न्यायपद्धती विलक्षण गतिमान…

Read More

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर – एक संपूर्ण क्रांतिकारक

freedom -fighter-vinayak-damodar-savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकर….इंद्रधनुष्यासम शोभिवंत चमत्कार…. एक उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न लेखक, उत्तुंग कल्पनाविलासी कवी, दशसहस्रेषु वक्ता, इतिहासकार, बुद्धि-निष्ठ विचारवंत, क्रियाशील समाज क्रांतिकारक…. किती पैलू वर्णावे. सावरकरांच्या या अनेक पैलूंवर भरपूर लिहिलं गेलंय आणि जाईल. जितकं लिहावं, वर्णावं, बोलावं तितकं कमी पडेल असं त्यांचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतं. पण त्यांच्या जीवनपटाचा जितका अभ्यास करू तितका एक मुद्दा ठळकपणे समोर येतो आणि तो म्हणजे, ‘ते मुळात एक संपूर्ण क्रांतिकारक होते.’ सर्वसाधारणत: क्रांतिकारक हा शब्द आपण देशभक्ती आणि भारताचा स्वातंत्र्यलढा या संदर्भात योजतो. पण सावरकरांच्या अनेक विषयातल्या विचार आणि कृती अभ्यासल्या तर या शब्दाची खरी व्याप्ती…

Read More