स्वातंत्र्यवीर सावरकर….इंद्रधनुष्यासम शोभिवंत चमत्कार…. एक उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न लेखक, उत्तुंग कल्पनाविलासी कवी, दशसहस्रेषु वक्ता, इतिहासकार, बुद्धि-निष्ठ विचारवंत, क्रियाशील समाज क्रांतिकारक…. किती पैलू वर्णावे. सावरकरांच्या या अनेक पैलूंवर भरपूर लिहिलं गेलंय आणि जाईल. जितकं लिहावं, वर्णावं, बोलावं तितकं कमी पडेल असं त्यांचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतं. पण त्यांच्या जीवनपटाचा जितका अभ्यास करू तितका एक मुद्दा ठळकपणे समोर येतो आणि तो म्हणजे, ‘ते मुळात एक संपूर्ण क्रांतिकारक होते.’ सर्वसाधारणत: क्रांतिकारक हा शब्द आपण देशभक्ती आणि भारताचा स्वातंत्र्यलढा या संदर्भात योजतो. पण सावरकरांच्या अनेक विषयातल्या विचार आणि कृती अभ्यासल्या तर या शब्दाची खरी व्याप्ती…
Read MoreTag: स्वातंत्र्यवीर सावरकर
पुण्यस्मरण – स्वातंत्र्यवीर सावरकर : एक अविस्मरणीय पुरुषार्थ !
हिंदू समाजाचे संघटन हा, तर स्वातंत्र्यवीरांचा ध्यास होता. अर्थात याबाबतचा त्यांचा विचार जेवढा मूलगामी होता त्यापेक्षाही तो कमालीचा व्यापक व चौफेर होता. हिंदू समाजाला श्रुतिस्मृतिपुराणोक्त काळातून अद्ययावत काळाकडे वेळ पडल्यास हाडाची कांडे करून आणलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचर्चा प्रवर्तते’ हे जेवढे खरे आहे तद्वतच शास्त्रचर्चा केल्याशिवाय राष्ट्रधारणेची व रक्षणेची सिद्ध-ताही अचूकतेने होऊ शकणार नाही हेही तात्यारावांनी वेळीच व सावधानतेने हेरलेले होते. – सुरेश सावंत, भाजप नेते, पनवेल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच जणूकाही अचाट साहस, अफाट धाडस, अतुलनीय देशप्रेम, जाज्ज्वल्य राष्ट्रनिष्ठा, अनिवार स्वातंत्र्याकांक्षा, स्वदेश संरक्षण सिद्ध-तेची कमाल…
Read More