वयाच्या १५व्या वर्षापासून जो देह सतत देशकार्यासाठी झिजला, त्यापायी नानाप्रकारचे त्रास व अपमान भोगले, त्याच्याकडून पुन्हा वार्धक्यातही नव्याने कार्य करण्याची अपेक्षा करणे हेच मुळी स्वार्थीपणाचे आहे. परंतु त्याही परिस्थितीत सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात हिंदुसंघटनासाठी तरतूद केल्याचे दिसून येते. यावरुनच सावरकरांना सामाजिक कार्याबाबत वाटत असलेली कळकळ लक्षात घ्यावी. सावरकरांचे मूल्यमापन द्वेषपूर्ण अथवा विरोधी भूमिकेतून न करता वस्तुनिष्ठपणे केल्यास, आजही भयाण असलेल्या सामाजिक वास्तवात सावरकरांचे कार्य व त्यासाठी त्यांनी वापरलेले अभिनव मार्ग दीपस्तंभ बनून मार्गदर्शन करताना दिसतील!! – विक्रम एडके सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा…
Read MoreTag: देशभक्ती
अभिनव भारतचे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांतील आधारस्तंभ देशभक्त बॅरिस्टर सरदारसिंह राणा मवाळ कामात न रमणारे राणा !
भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशात राहून कार्य करणारे अनेक देशभक्त होऊन गेले आहेत. त्यांच्या परदेशातील या देशकार्याचे फळ त्यांना काय मिळाले? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे देशभक्त जिवंत आहेत का ? त्यांचे कुटुंबीय कोण किंवा त्यांच्या स्वदेशप्रेमाच्या अनावर भावनांना लगाम घालत त्यांनी परकीय भूमीवर कसे आयुष्य कंठले? याची विचारपूस करणे तर दूरच; पण सत्तेवर आलेल्या काँग्रेसने त्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे, हालअपेष्टा भोगणारे किंवा कारावासात अनेक काळ घालवलेले सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतीवीर जसे पडद्याआडच राहिले, तसेच काहीसे या परदेशात राहिलेल्या देशभक्तांचे झाले. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, वीरेंद्र…
Read Moreपाकिस्तानी युद्ध-नौका गाझीची पारध करणारे भारतीय नौकाधिपती नीळकंठ कृष्णन !
१९७१ च्या बांगलादेश युद्ध-ात भारतीय नौदलाने पाकिस्तानची गाझी पाणबुडी बुडवून आणि कराची धक्क्यावर (बंदरावर) छोट्या; पण वेगवान क्षेपणास्त्र नौकांनी आक्रमण करून अपूर्व कर्तव्याचे (कामगिरी) पालन केले (बजावले) होते. नौदलासाठी छोट्या क्षेपणास्त्र नौका अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, हे बांगलादेश युद्ध-ाच्या काही वर्षे आधीच नौदल विकासाचा आराखडा सिद्ध- करणाऱ्या नावाधिपती (अॅडमिरल) कृष्णन यांच्या लक्षात आले होते आणि त्यांनी संरक्षण खात्याकडे या नौका विकत घेण्याची जोरदार प्रशस्ती (शिफारस) केली होती. एवढेच नाही, तर पुढे या नौका विकत घेण्यासाठी प्रारंभिक बोलणी त्यांनीच रशियन आरमाराचे प्रमुख ग्रँड अॅडमिरल गॉर्शकॉव्ह यांच्याशी केली होती. त्यानंतर मुंबईत नौदलाच्या…
Read Moreझुंजार क्रांतिकारक हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल !
भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते ‘बिना खड्ग’ बिना ढाल नव्हे’, तर सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या रक्तरंजीत बलिदानाने ! रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील झुंजार क्रांतीकारक हुतात्मा भाई ऊर्फ अण्णासाहेब ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल हे यांपैकीच एक थोर क्रांतीकारक! कचेरीत गोरा साहेब सकाळी येई. सर्वजण उठून त्याला सलाम करत. त्यांना ही गोष्ट खटकू लागली. एक दिवस साहेब आल्यावर आण्णा वर्तमानपत्र वाचत राहिले. साहेबाने जाब विचारल्यावर ते म्हणाले, ‘मला माझ्या कामाचे वेतन मिळते, सॅल्यूट ठोकण्याचे नाही.’ साहेबाला कोतवालांचे उद्ध-ट वर्तन आवडले नाही. तो त्यांना म्हणाला, ‘गेटआऊट !’ तेव्हा ते म्हणाले, ‘आम्हीच तुम्हाला हिंदुस्थानातून गेटआऊट करणार…
Read Moreदेशभक्ती – आझाद हिंद सेना क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुष
सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध- सुरू असताना, इंग्रजांशी लढण्यासाठी, त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा, हा आज भारताचा राष्ट´ीय नारा बनला आहे. मध्ये अमेरिकन पत्रकार लुई पाश्चर ह्यांच्याशी चर्चा करताना, महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता, की काही जाणकार असे मानतात, की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर कदाचित भारताची फाळणी न होता, भारत एकसंध राष्ट´ म्हणून टिकून…
Read Moreनेताजी, बाळासाहेब आणि हिंदुत्व!
२३ जानेवारी, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. याच दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीपासून हा दिवस ‘देशभक्ती दिन’ म्हणून साजरा केला जातोय. या दिनाचे औचित्य साधून आम्ही ‘महानगरी वार्ताहर’चा ‘देशभक्ती विशेषांक’ आपल्या हाती देत आहोत. यात ज्ञात-अज्ञात अशा अनेक देशभक्त क्रांतिकारकांची प्रेरक अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चित्रपटातील ‘देशभक्ती गीते’ हा स्वातंत्र्यकाळापासूनच्या चित्रपटांपासून १९९०-९५ पर्यंतच्या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्यांचा अभ्यासपूर्ण असा आढावा घेणारा लेख, ‘चीन-भारत युद्ध-ां’ची वास्तवता दर्शविणारा लेख, ‘बेगडी देशभक्त’ हा देशभक्तीच्या बदललेल्या आयामांचे वास्तव विशद करणारा लेख, नेताजी सुभाषचंद्रांनी भारताच्या…
Read More