परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार – कमलाकर तांबे परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. आईवडील – परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला. कार्य – अधम अशा क्षत्रियांचा वध : ‘वाल्मीकीने त्याला ‘क्षत्रविमर्दन’ न म्हणता ‘राजविमर्दन’ म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.’ कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व…
Read More