रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागत आहेत. म्हणूनच ‘ओल्याबरोबर सुकेही जळते या म्हणीचे प्रत्यंतर क्षणोक्षणी येत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी डिझेल आणि पेट्रोल च्या वाढलेल्या किमतीच्या बातमीनंतर आता पाळी आहे ती सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेल्या तेलाची. चला बघूया सूर्यफुलाच्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे पाम तेलाच्या उत्पादकांचा कसा फायदा होणार आहे. सूर्यफुलाच्या बियांपासून बनवलेल्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे साहजिक पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणाव स्थितीमुळे सूर्यफुलाच्या बियांपासून बनत असलेल्या तेलाच्या आयात निर्यातीवर परिणाम होत आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सूर्यफुलाच्या तेलाचं सर्वात जास्त उत्पादन होतं आणि…
Read More