आई

aai

‘गर्भातून पिल्लू बाहेर येते आणि त्याचक्षणी एका आईचा ‘जन्म’ होतो. आई होण्यासाठी आतुरलेली स्री, आई होतानाचे सर्व कष्ट सोसते आणि आई झाल्यावर आयुष्यभर आनंदाने आपले ‘आईपण’ जगते. मूल वाढविण्याचे तिचे प्रयत्न यशस्वी झाले तरी टाळ्या वाजविणारे फारसे नसतात. पण मूल बिघडले तर मात्र तिचा उद्ध-ार झाल्याशिवाय रहात नाही.

हे आईपण चिकाटी शिकविते, सहनशक्ती वाढवते, अभिनय करायला लावते, आळस व कंटाळा करु देत नाही. रात्रभर सलग झोप नाही मिळाली तरी सकाळी घरभर पळायला लावते.

गंगेच्या काठावर राहणाऱ्यांना जसे तिचे माहात्म्य समजत नाही तसे आई जवळ असेपर्यंत तिला गृहीत धरले जाते आणि ती कायमची दृष्टीआड झाल्यावर तिची उणीव भासून जीव तळतळतो. गेली २०-२५ वर्षे संपादक  असणाऱ्या मला या वर्षी माझी आई गेल्यावर ‘आई’ विशेषांक काढण्याचे सुचावे यातच सर्व काही आले.

आईची महती अथांग आहे. आईबद्दल प्रत्येक भाषेत साहित्यही प्रचंड आहे. तरी देखिल तिच्याबद्दल लिहावे असे अजुनही खूप आहे. या अंकासारखे कितीही विशेषांक प्रसिद्ध- केले तरी हा विषय अपूर्णच राहील. आईबद्दलची अनमोल अशी असंख्य वचने आहेत. ‘ती म्हणजे स्वर्गातील फूलं’ ‘तिची आर्त विनवणी थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते.’ ‘तिच्या चरणांमध्ये स्वर्ग आहे.’ ‘मुलांना पंख येण्यापूर्वी आईचे पाय रक्ताळलेले असतात’ अशी एकापेक्षा एक हृदयाला जाऊन भिडणारी सुवचने जागोजागी वाचायला, ऐकायला मिळतात. पण तिचा सहवास, तिची माया, तिचे बारीक लक्ष यांचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. त्यामुळेच कळत नकळत तिची ओढ वाटते.

आईचे कुटुंबातील स्थान सर्वोच्च असून कुटुंब एकत्र राहणे हे आईवरच अवलंबून असते. एकाच आईची मुले विविध प्रवृत्तीची असली तरी आईच त्यांच्यात सामंजस्य ठेवू शकते. मुलांच्या आपसातील मतभेदांवर मात करण्याची अद्भूत क्षमता ‘आई’ मध्येच असते.

आई म्हणजे संस्कार! नकळतपणे घडणे. तिचा ठसा आपल्या संपूर्ण आयुष्यावर असतो. आपण जेव्हा अंतर्मुख होऊन आरशात पाहतो तेव्हा तिचचं प्रतिबिंब पाहतो. तिचचं तर रक्त आपल्या धमन्यातून वहात असतं. तिचा अबोला असो की रागावणं असो, त्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेमच असतं. उन्हात खेळणाऱ्या मुलाला जेव्हा ती म्हणते. ‘अरे तिकडे सावलीत मर की!’ तेव्हा त्यामागे फक्त तिची मायाच असते. तिच्या शब्दांचे अर्थच वेगळे असतात. तिने भरवलेल्या ज्या अन्नावर आपला पिंड पोसलेला असतो, त्याची चव जन्मभर आपल्या जीभेवर रेंगाळते.

आई म्हणजे मुलांच्या स्वप्नांची साक्षीदार! आपली मुले नुसतीच आज्ञाधारक न बनता स्वतंत्र विचारांची झाली याचे तिला समाधान असते. मग म्हातारपणी तिच्याकडे मुलांकडून दुर्लक्ष झाले तरी तिची तक्रार नसते.

हे सर्व वर्णन करीत असताना सतत माझी आई डोळ्यांपुढे येते. १५ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर तिने सात दशकं संसार केला. आणि तिचा उत्साह व जगण्याची उमेद शेवटपर्यंत टिकून होती. स्वत:च्या शेवटच्या आजारपणातही तिला थोरल्या मुलाच्या तब्येतीची काळजी वाटत होती. स्वत:च्या यातना विसरून ती त्याची चौकशी करीत असे. भेटायला येणाऱ्या नातेवाईकांशी जुन्या आठवणी काढून गप्पा मारीत असे. तिच्या अंतिम क्षणी आमचा एक भाऊ सोडला तर आम्ही कोणीच जवळ नव्हतो. आता ही सल जन्मभर राहणार! तिची आई म्हणजे आमची आजी सुद्ध-ा संपूर्ण कुटुंबाची महाआई होती. तिच्या नुसत्या जवळ असण्याने आमच्यात उत्साह संचारायचा, आत्मविश्वास वाढायचा आणि कर्तृत्व फुलायचे. आई आपले किती अपराध व चुका पोटात घेते याला काही गणतीच नसते.आणि ते कधी तिच्या ओठांवर पण येत नाही. तिच्या बरोबरच तो भूतकाळ समाप्त होतो. आमच्या आईचे बालपण अत्यंत धार्मिक वातावरणात गेल्याने तिच्या जीवनात व्रते, वैकल्ये, नेमधर्म, उपासना या गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व होते. पण तरी तिला नाटके, सिनेमे, फिरणे, प्रवास यांची पण तितकीच आवड होती.

अलीकडे मुलांशी तिचा संवाद कमी असला तरी जेव्हा तिची खास मंडळी भेटायला येत तेव्हा ती भरपूर बोलायची व प्रत्येकवेळी नवीन काहीतरी ऐकायला मिळायचे. वाटायचे हे सर्व रेकॉर्ड करून किंवा लिहून ठेवावे. पण तसे व्हायचे नाही.

अस्वस्थ करणाऱ्या याच विचारांमुळे या अंकाची घडण करताना व्यष्टी ते समष्टी असा दृष्टीकोन ठेवून जनन-जन्मभूमी-जगत् जननी अशी आईत्वाची संकल्पना केली. कथा, कविता, लेख, मनोगते, आठवणी असा अत्यंत वाचनीय, मननीय मजूकर आमच्या लेखकांनी सादर केला आहे. दिवसरात्र काम करून महानगरी वार्ताहरच्या संपादक, डिझाईनींग, जाहिरात, छपाई व वितरणातील सहकाऱ्यांनी ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर साहित्याचे हे लेणे प्रिय वाचकांसाठी कोरले आहे. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हा ठेवा पोहोचावा ही भावना ठेवून अनेकांनी सप्रेम भेट योजनेत भाग घेतला आहे. याचबरोबर अनेक जणांनी जाहिरातींच्या रूपाने आर्थिक सहकार्य केले आहे. या सर्वांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन!

कुटुंब हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असून तिचा पाया म्हणजे ‘आई’ असते. तिला शतश: वंदन!

————————————————————–

संपादकीय

जननी जन्मभूमी

– सतीश सिन्नरकर

तृपूजनाची महान परंपरा आपल्या देशात अनादी काळापासून चालत आलेली आहे. राष्ट्राला मातृरूप मानण्याची आपली संकल्पना अलौकिक आहे. इतिहासपूर्व काळात आपले Fषि-मुनी, तत्त्वज्ञ व महात्मे यांना या धरतीचा मातेच्या स्वरुपात साक्षात्कार झाला आणि त्यातून मातृभूमीची संस्कृती उदयाला आली. म्हणूनच या भूमीला आपण ‘भारतमाता’ म्हणू लागलो.

यामध्ये ‘दुर्गा सप्तशती’चे आध्यात्मिक व साहित्यिक महत्त्व असंदिग्ध आहे. या ग्रंथामध्ये मातृपूजनाचे माहात्म्य वर्णन केले असून यातूनच अनेकांना मातृभक्ती व देशभक्तीची प्रेरणा मिळालेली आहे. ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रगीताचे उद्गाता बंकिमचंद्र यांना देखिल अशीच स्फूर्ती मिळून ते अजरामर गीत जन्माला आले. ‘दुर्गा सप्तशती’च्या ७०० श्लोकांचे सार हे ‘वन्दे मातरम्’ या सात शब्दांमध्ये सामावलेले आहे. संपूर्ण जगतामध्ये मातृभूमीला वन्दन करण्याची उदात्त अभिव्यक्ती फक्त आपल्या भारत देशातच प्रकट व्हावी, हा आपल्या महान परंपरेचा गौरव होय! हा दिव्य वारसा, हा गौरव सुरक्षित ठेवून पुढे चालत ठेवण्याची मोठी जबाबदारी आपल्या प्रत्येक पिढीवर आहे.

अनेक प्रलयंकारी आक्रमणे सोसून देखिल आपला हा वारसा आजही जिवंत आणि रसरसलेला आहे, हे एक आश्चर्य मानले जाते. या मृत्युंजयी शक्तीचे रहस्य काय? भारतीय संस्कृती धर्माधारित असल्यानेच हे शक्य झाले आहे. जगामध्ये अनेक संस्कृती जन्मल्या, फुलल्या आणि नष्ट पावल्या. परंतु सनातन धर्माच्या अजेय सिद्ध-ांतांवर उभी राहिलेली भारतमाता मात्र काळावर मात करण्यात यशस्वी ठरली आहे.

ब्रिटीशकालीन दीडशे वर्षांचे कुत्सित शासन व शिक्षणाने जरी आपल्या समष्टि चेतनेवर राखेचे आवरण घातले असले तरी आपण हे विसरता कामा नये की व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राचीही एक अस्मिता असते. या अस्मितेचा आधार आहे एक स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व! हीच आपली प्राणशक्ती आहे. आजही आपण आपल्या प्राचीन भावजगत् आणि प्राणशक्तीने ओतप्रोत आहोत. श्रीराम, श्रीकृष्ण, गौमाता, गंगामाता या बाबतीत Fग्वेदकाळी जी श्रद्ध-ा होती तीच आजही विद्यमान आहे. हीच आपली ईश्वरीय चेतना आहे. संकटकाळी याचेच आपण स्मरण करतो. श्रीकृष्णाचा गीतोपदेश, Fषींचा कर्तव्यबोध, चाणक्याचा संकल्प, रामदासांचा कर्मसंदेश आणि अखंड स्थितीचा निर्धारू झालेले शिवराय या सर्वांमध्ये भगवंताचे चैतन्यच साकारलेले होते.

याच चैतन्याचे आवाहन ‘वन्दे मातरम्’ या दोन शब्दांनी केले. स्वातंत्र्याची उत्कट इच्छा उत्पन्न करणाऱ्या या मंत्राने अनेक तेजस्वी नायक उत्पन्न झाले. विवेकानंद, अरविंद, दयानन्द, सावरकर, टिळक, हेडगेवार हे आधुनिक द्रष्टे यातूनच प्रकट झाले. या मंत्रामध्ये अशी एक अद्भूत शक्ती अन्तर्निहित होती की जिने असंख्य तरूणांना आत्मयज्ञ शिकवला. ही चेतना हेच आपल्या मातृभूमीचे अंतिम सत्य आहे. या सत्याची अवहेलना केल्यास आपण आत्मवंचना आणि आत्मविस्मृतीच्या विळख्यात सापडतो. या अवहेलनेतूनच भ्रष्टाचार, जातीयता, गृहकलह आणि असंतोषाचे पेव फुटते; विधर्मीयांचे दु:साहस वाढते आणि विदेशी शक्ती त्यांच्या आर्थिक साम्राज्याचा विस्तार करण्यास धजावतात. यातूनच अयोग्य, अनधिकारी व अभारतीय सत्ताधारी पुढे येतात आणि समाजास परावलंबी, आत्मविश्वासहीन, दैववादी अंध उपासक बनवतात. याचना करणारा एक मूर्ख जनसमुदाय निर्माण करणारी ही दुष्ट प्रक्रिया थांबविणे, उलटविणे आणि समाजास पुन्हा मूळ पदावर आणणे हे एक आव्हान बनून राहते. असे आव्हान स्वीकारून कण्टकाकीर्ण मार्गावर चालणाऱ्यांना साथ देणे आणि यथाशक्ती समर्पण करून अजरामर असलेल्या आपल्या प्रिय मातृभूमीस पुनर्वैभव प्राप्त करून देणे हेच आपणा सर्वांचे जीवितध्येय बनते. अशा प्रेरणा सर्वांस मिळो हीच जगन्नियंत्याच्या चरणी विनम्र प्रार्थना !

Related posts

Leave a Comment