होली | मनातील अपप्रवृत्तीचे दहन करणारी होलीकोत्सव

holikosav

देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट´ात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतगमनोत्सव’ म्हणजे वसंत Fतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलतः अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच…

Read More

अवघे ७५ वयमान!

only-75

सतीश सिन्नरकर, संपादक चिरतरूण श्री. सुभाष देसाई यांचे वर्णन करताना जे वरील शब्द योजिले आहेत ते अत्यंत सकारात्मक भावनेने लिहिले आहेत. या अंकाच्या निमित्ताने ज्यांच्याशी बोलणे झाले त्या सर्वांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, ‘काय म्हणता? देसाई साहेबांचे वय ७५ आहे? अहो, अजिबात वाटत नाही’ असे आश्चर्याचे उद्गार काढून मग ते कसे तत्पर आहेत, त्यांनी आपली तब्येत कशी मेन्टेन केली आहे आणि दररोज योग व व्यायाम केल्याशिवाय त्यांचा दिवस कसा पुरा होत नाही वगैरे चर्चा होत राहते. गेली ५० ते ६० वर्षे वैयक्तिक व सामाजिक जीवनात श्री. देसाई हे ज्या तडफेने अहोरात्र…

Read More

सध्याची शिक्षणपद्ध-ती किती रोजगाराभिमुख?

present-education-system-how-much-employment-oriented-is-it

अभ्यासक्रमासाठी नेमलेले विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हा दोष आपल्या शिक्षणपद्ध-तीत आढळतो. विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले  जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात.  इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक  या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात.  शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणाऱ्या माहिती व कौशल्याचे  त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही  विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते. त्यामुळेच असेल कदाचित. पण परीक्षेत उत्तम गुण…

Read More

ज्ञानाधिष्ठित उद्योगांच्या जाळ्यातून महाराष्ट्राचा विकास शक्य

development-of-maharashtra

महाराष्ट्र उद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान व शिक्षण या क्षेत्रांमध्ये अग्रेसर होताच; मात्र हे स्थान टिकवून ठेवून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी निश्चितच ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबतीमध्ये एक होऊन महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. – शरद मेस्त्री आपापल्या राज्यातील शास्त्रज्ञांचा, संस्थांचा खुबीने उपयोग करून घेत शेजारी राज्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. या स्थितीत संस्थांना स्वायत्तता, भक्कम आर्थिक पाठबळ आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊनच महाराष्ट´ाला आपले स्थान टिकवता येईल. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट´ाचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे. भारतातील पहिल्या…

Read More