गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशदायी, मंगल मुहूर्त आहे. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खऱ्या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, घर, बंगला खरेदी करणे, नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे, जमीन, प्लॉट खरेदी इतकेच काय, पण वाहन खरेदी, सोने खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम व आदर्श मानला जातो. ज्या वास्तुत ब्रह्मतत्त्व बाधित झाले असेल, दूषित झाले आहे त्या वास्तूमध्ये गुढी पाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्त्वदोष काही प्रमाणात कमी होतो. शास्त्रोक्त गुढी कशी उभारावी : ढी पाडव्याला घराची…
Read MoreTag: सण समारंभ
होली | मनातील अपप्रवृत्तीचे दहन करणारी होलीकोत्सव
देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट´ात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतगमनोत्सव’ म्हणजे वसंत Fतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलतः अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच…
Read Moreहनुमान जयंती विशेष
पवनपुत्र हनुमान – सारंग कुलकर्णी काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. जन्माचा इतिहास राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमानजयंती’ म्हणून साजरा करतात. वाल्मीकीरामायणा मध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला.…
Read More