ज्ञानतपस्वी भारतरत्न – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

– प्रा. शांताराम हिवराळे

मुंबईला आल्यानंतर खूप प्रयत्नांनी त्यांना तीन वर्षासाठी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यांनी खूप काटकसर करून पैसा जमविला. सन् १९२० मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा ते लंडनला गेले. तेथे एका इंग्रजबाईकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागले. १९ तासांपेक्षा अधिक अभ्यास त्यांनी केला. एक कप चहा, थोडे दूध, थोडा जॅम, एक-दोन पापड अन् पोटभर थंडगार पाणी हा त्यांचा आहार असायचा. कधी अर्धपोटी राहून भीमरावांनी इ.स. १९२१ मध्ये अर्थशास्त्रात लंडन विद्यापीठाची एम.एस्सी पदवी प्राप्त केली. इ.स. १९२२ मध्ये प्रॉब्लेम ऑफ रूपी हा प्रबंध डी.एस्सी. या अर्थ शास्त्राच्या पदवीसाठी विद्यापीठास सादर केला. बॅरिस्टरची परीक्षा ही उत्तीर्ण झाले.

शिक्षण ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. शिक्षणामुळे माणसाला सद्सद् विवेक बुद्ध-ीची जाणीव होते. शिक्षणामुळे आत्मभान, आत्मविश्वास प्राप्त होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होतो. शिक्षणामुळे अंधश्रद्ध-ा, अज्ञान, अनिष्ट रूढी, परंपरा, दारिद्रय, सनातन वृत्ती, कर्मकांड यावर मात करता येते.
अशा या प्रदीर्घ शिक्षण प्रक्रियेतूनच राष्ट्रीय पुढारी, थोर विचारवंत समाजसुधारक, शास्त्रज्ञ, महामानव, युगंधर निर्माण होतात. समाजप्रबोधन घडवून आणतात. देशाला, मानवजातीला गुलामगिरीतून मुक्त करतात.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्ध-ा ज्ञानाचा यज्ञकुंड अखंड प्रज्वलित ठेवला. ज्ञानग्रहणासाठी अखंड तपश्चर्या केली. त्यांच्या शैक्षणिक जीवनात अनेक संकटे आली त्यावर मात करून त्यांनी शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण तसेच परदेशातील उच्च शिक्षण, पूर्ण केले. आजही हा ज्वलन्त इतिहास भारतीयांना स्फुर्ती देणारा, प्रेरणादायक आहे. म्हणूनच त्यांना ज्ञानतपस्वी, ज्ञानाचा अथांग महासागर असे म्हणतात.

सुभेदार रामजी आंबेडकर यांना शिक्षणाबद्दल आदर होता. घरातील वातावरण अत्यंत धार्मिक व सुसंस्कृत होते. इ.स. १८९६ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी भीमरावांना सातारच्या कॅम्प स्कूलमध्ये दाखल केले. त्यांचा सुरुवातीचा शाळेय जीवनाचा कालावधी खोड्या करणे, मित्रांशी भांडणे, टीमचे नेतृत्व करणे, अशा दांडगाईमध्येच गेला. इ.स. १८९६ मध्ये भीमाबाई यांचे निधन झाले. त्यात रामजी आंबेडकरांची सातारच्या नोकरीची मुदत संपली. ते साताऱ्याहून मुंबईला आले. मुंबईच्या डबक चाळीत भाड्याने खोल्या घेवून कुटुंबासहित स्थायीक झाले.

मुंबईला आल्यानंतर भीमरावांच्या अंगभूत गुणांना वाव मिळाला. याच कालावधीमध्ये त्यांना नवीन पुस्तके वाचण्याचा छंद जडला. वडिलांनी दिलेल्या पैश्यांतून ते नवीन पुस्तकासाठी हट्ट करीत असत. अवांतर पुस्तके वाचण्यासाठी ते चर्नीरोड गार्डन मधील निवांत ठिकाणी जात असत. याच ठिकाणी त्यांची श्री. अर्जुन कृष्णाजी केळुस्कर यांची ओळख झाली. ते विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. इ.स. १९०७ साली भीमराव मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. डबक चाळीतील लोकांनी भीमरावांचा सत्कार केला. त्यावेळेस केळूस्करांनी स्वत: लिहिलेले बुद्ध- चरित्राचे पुस्तक भीमरावांना भेट दिले.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी भीमरावांचे नाव एल्फिस्टन कॉलेजमध्ये दाखल केले. त्याच वर्षी भीमरावांचे लग्न रमाबाईशी झाले. शिक्षणात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यात. तेव्हा केळूस्कर गुरूजींनी सर नारायणराव चंदावरकर यांच्या मध्यस्थीने बडोदा संस्थानच्या महाराजांची भेट घेवून दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती मंजुर करून घेतली.

इ.स. १९१३ साली भीमराव बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा सुभेदारांना अस्मान ठेंगणे झाले होते. कारण भीमराव बी.ए. च्या परीक्षेचा अभ्यास करताना रात्रीच्या वेळेला सुभेदार सुद्ध-ा भीमरावांबरोबर जागरण करीत असत. पदवीधर झाल्यानंतर भीमरावांनी बडोदे संस्थानात नोकरी मिळावी म्हणून अर्ज केला होता. तेव्हा त्यांची लेफ्टनंट पदावर नेमणूक झाली होती. काही दिवसांनी त्यांचे वडील आजारी पडले. मृत्युशय्येवर असतांनाच भीमरावांची भेट झाली. सुभेदार रामजींनी जगाचा निरोप घेतला. भीमरावांवर आभाळ कोसळले. घरसंसाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. तरीही त्यांच्या मनामध्ये उच्च शिक्षणाची प्रबळ इच्छा होती. त्यांनी बडोद्याच्या सयाजीराव महाराज गायकवाडांची भेट घेतली. त्यांना
परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. इ.स. १९१३ सालच्या जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भीमराव न्यूयॉर्कला पोहचले. अर्थशास्त्र हा मुख्य विषय व समाजशास्त्र, असे दुय्यम विषय त्यांनी निवडले. वसतिगृहात राहून त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला. कधी कधी त्यांना अर्धपोटीही राहावे लागले. पण त्यांनी अभ्यासाचा ध्यास सोडला नाही.

प्राचीन भारतातील व्यापर (एशियन्ट इंडियन कॉमर्स) या विषयावर त्यांनी इ.स. १९१५ मध्ये प्रबंध लिहून एम.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी ‘भारताचा राष्ट्रीय नफ्याचा वाटा’ एक ऐतिहासिक पृथ:करणात्मक परिशिलन हा प्रबंध पूर्ण केला.

कोलंबिया विद्यापीठाने त्यांना इ.स. १९१६ साली डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही बहुमानाची अत्युच्च पदवी दिली. पुन्हा त्यांनी इंग्लंडमध्ये जावून विद्याभ्यास करण्याचा ठाम निर्णय घेतला. परंतु अशा वेळी त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. तरीही ते वाट्टेल त्या अडचणी सोसून २ जून १९१६ रोजी आगबोटीने लिव्हरपूरला पोहचले. तेथून त्यांनी लगेच लंडन गाठले.

लंडनला आल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पोलिटिकल सायन्स या संस्थेत प्रवेश मिळविला. तसेच बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी ग्रेज इन मध्ये नाव दाखल केले. लंडनला आल्यानंतर त्यांनी ज्ञान ग्रहणासाठी, ज्ञानउपासनेसाठी अधिक उग्र तपश्चर्या केली. लंडन
विद्यापिठातून अर्थशास्त्रात एम.एस्सी. ही पदवी प्राप्त करण्यासाठी ही अखंड ज्ञानसाधना होती. परंतू त्यांच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे त्यात वाढ करणे शक्य नसल्याने त्यांना जड अंत:करणाने भारतात परत यावे लागले.

मुंबईला आल्यानंतर खूप प्रयत्नांनी त्यांना तीन वर्षासाठी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यांनी खूप काटकसर करून पैसा जमविला. सन् १९२० मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा ते लंडनला गेले. तेथे एका इंग्रजबाईकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागले. १९ तासांपेक्षा अधिक अभ्यास त्यांनी केला. एक कप चहा, थोडे दूध, थोडा जॅम, एक-दोन पापड अन् पोटभर थंडगार पाणी हा त्यांचा आहार असायचा. कधी अर्धपोटी राहून भीमरावांनी इ.स. १९२१ मध्ये अर्थशास्त्रात लंडन विद्यापीठाची एम.एस्सी पदवी प्राप्त केली. इ.स. १९२२ मध्ये प्रॉब्लेम ऑफ रूपी हा प्रबंध डी.एस्सी. या अर्थ शास्त्राच्या पदवीसाठी विद्यापीठास सादर केला. बॅरिस्टरची परीक्षा ही उत्तीर्ण झाले. वयाच्या ३२ वर्षापर्यंत भीमरावांची अखंड शैक्षणिक तपश्चर्या सुरू होती.

परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्ध-ा त्यांच्या वाचन, मनन, चिंतनात कधी खंड पडला नाही. ‘बुद्ध- अॅण्ड हिज् धम्म’ या ग्रंथ लिखाणापर्यंत ही अखंड ज्ञानसाधना सुरूच होती. स्वत:च्या अनुभव सिद्ध-ीतून त्यांनी दलित समाजाला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा महामंत्र दिला. आजही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अखंड ज्ञानसाधना दलित समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहे.

मोठ्या गोष्टीचे बेत
करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने
आरंभ करणे आधीच
श्रेयस्कर ठरते.

– एप्रिल २०१८

Related posts

Leave a Comment