कलीयुगातील राम सीता

आज नाशिकरोड येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या गरीब केविलवाण्या दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाच विचारलं तर ते नको म्हणाली मग मी त्यांना १००/- रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले ,मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय मग सुरू झाला त्यांचा जीवनपट ,- ते २२०० किमी चा प्रवास करून आता द्वारका ला स्वतःच्या घरी चालले होते त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे १ वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले तिने श्रीकृष्णमंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येइल म्हणून “मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय”

मग मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली मग मी ते २५%हिन्दी ७५ %इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं तर माझी बुद्धी ऐकून सुन्न झाली त्यांनी लंडन येथे ऑक्सपोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ७ वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय (एव्हढं शिकून सुधाग त्यांच्या चेहऱ्यावर गर्व सुद्धा नाही नाहीतर आपल्या कडे १०वी नापास वालासुद्धा छाती ताणून हिंडतो ) एव्हढंच नाहीतर व सी रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर ,तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रेचे संबंध होते तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एक अंध ट्रस्ट ला ते देऊन टाकतात सध्या ते सोशल मिडियापासून लांब राहतात,

रोडच्या कडेन जाणार प्रत्येक जोडपं भिकारी असतच असं काही नाही एखादं जोडपं हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होत आणि आपल्या पतीसोबत कोणी सीता सुद्धा होत म्हणूनच आज भेटलेली माणसे कली युगातील मी तर राम सीता च समजतो आम्ही जवळ जवळ एक तास त्यांच्याशी गप्पा मारल्या रोडवर उभा राहूनच. इतके प्रगल्भ विचार एकूण मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटलं की आपण उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोहचायला एक महिना लागेल.
आधुनिक (सीता श्रीराम) त्यांचे खरे नाव …..

Related posts

Leave a Comment