एका महत्वाच्या कायदेशीर कारवाई मधे असे दिसून आले आहे की कोविड चाचण्या किंवा आरटीपीसीआर चाचण्या बेभरवशाच्या आहेत. पीटर अन्डरयु हे आयरिश गृहस्थ विज्ञान पत्रकार असून त्यांनी जीवशास्त्र शाखेतून शिक्षण घेतले आहे. आणि जेनेटिक्स मध्ये पदवी घेतली आहे. काही पर्यटकांचे बेकायदेशीर पणे विलगीकरण करण्यात आल्याने त्यांनी 97% आरटीपीसीआर चाचण्या बेभरवशाच्या आहेत असे सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला पोर्तुगीज न्यायालयातील न्यायाधीशांनी अशा एका निर्णयाला मान्यता दिली ज्यामुळे, सुट्टी मजेत घालवायला आलेल्या आणि कोविड नसलेल्या काही पर्यटकांना बळजबरीने विलगीकरणात रहावे लागले. म्हणून आरटीपीसीआर चाचण्यांच्या विश्वासार्हते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या निर्णयामुळे 4 पर्यटकांनी ओझोरस आरोग्य प्राधिकरणाविरोधात वरील खटला दाखल केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यामधे असे दिसून आले की 4 जणांपैकी एकालाच कोविड, झाला असून बाकी 3 जणांना कोविड नसूनही बेकायदेशीरपणे विलगीकरणात ठेवले होते.
