ESG मधील गुंतवणूक म्हणजे नेमके काय?

आपण आपल्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पर्यावरणाचा विचार करत असतो. मग एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी सुरु करताना देखील पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे. यातूनच ESG अर्थात एन्व्हायरोमेंटल सोशल गव्हर्नन्स ही संकल्पना प्रकाशात आली. आज पासून काही वर्षांपूर्वी ग्लोबल वॉर्मिंग विषयी लोकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. करोना च्या बाबतीतही आता तेच होते आहे. अचानक आलेल्या करोना मुळे लॉक डाऊन लागला. कंपनीत चांगल्या

हुद्द्यावर असलेल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या तिथे सामान्यांची काय कथा? त्यातूनच आपल्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अचानक जॉब गेला तर करायचं काय? ही असुरक्षिततेची भावना पूर्वी सुद्धा होती. फक्त करोना मुळे ती अधिक गडद झाली असं म्हणू

 

हवं तर. त्यामुळेच ESG मधील गुंतवणूक हळू हळू वाढीस लागली आहे. आतापर्यंत आपण. म्युच्युअल फंड, LIC, बँक FD या मध्ये गुंतवणूक करत होतो. पण ESG कंपन्यांतील गुंतवणूक आपल्यासाठी पूर्ण नवीन आहे.

ESG मध्ये गुंतवणूक करणे आणि ती तशीच सुरु ठेवणे हे काही सोपे नाही. व्यवसाय सुरु केल्यानंतर तो टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आणि समजा मधेच तो काही कारणामुळे बंद पडला तर त्याचा परिणाम अर्थातच त्या कंपनीवर,त्याच्या ग्राहकांवर, आणि शरहोल्डर्स वर होतो म्हणजेच कंपनी बाजारातील तिचे नाव घालवून बसते. उदाहरणच द्यायचे तर एका नावाजलेल्या FD कंपनी चे देता येईल. कंपनीच्या बॅलन्सशीट मध्ये आपण जे घटक दाखवू शकत नाही त्या घटकांचे परीक्षण आपण

ESG द्वारे करू शकतो. वातावरणातील बदलाचा व्यवसायावर होणारा परिणाम उदाहरणार्थ अवेळी होणाऱ्या पावसामुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते.याचा परिणाम फक्त शेतकऱ्यावर होत नाही.शेतकऱ्याकडून माल विकत घेणाऱ्या दुकानदारावर आणि परिणामी ग्राहकावर होतो. नैसर्गिक गोष्टी या काही आपल्या हातात नसतात किंवा आपण त्या बॅलन्सशीट मध्ये दाखवू शकत नाही. किंवा व्यवसाय करताना पाळायची तत्वे ही आपण प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट मध्ये दाखवू शकत नाही ती आपली आपल्यालाच पाळावी लागतात.

२०२० मध्ये आलेला कोविड आपल्याला अनेक गोष्टी शिकवत आहे. त्यापैकीच ही एक गोष्ट ती म्हणजे कंपनी च्या आर्थिक व्यवहारासोबतच ती कंपनी जास्तीत जास्त किती काळ सुरु राहू शकेल हे देखील बघणे गरजेचे आहे. आणि त्या बाबतीत आपण ESG वर अवलंबून राहू शकतो. पण ESG मधील गुंतवणूक म्हणजे नेमके काय ? तर ESG म्हणजे एन्व्हायरोमेंटल सोशल गव्हर्नन्स.

कोणतीही कंपनी जी आज चांगली कामगिरी करत आहे आणि भविष्यात ही प्रगती टिकवून ठेवण्याची आशा बाळगते ती ESG चे पालन करेल. ESG फंड हा पोर्टफोलिओ आहे जो कंपन्यांच्या इकविटी बॉण्ड मध्ये गुंतवणूक करतो. पर्यावरण, सामाजिक आणि मॅनेजमेंट या तीन गोष्टींवरून मूल्यांकन केले जाते. ESG चा निकष पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना विविध चाचण्यांतून जावे लागते.

ESG फॅक्टर्स मुळे आपल्याला त्या विशिष्ट कंपनीची मॅनेजमेन्ट, तिथली कामाची पद्धत,कल्चर या सर्वांविषयी माहिती मिळू शकते. जर तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिता ज्या कंपन्या खूप वर्ष टिकतील आणि पर्यावरणाविषयी जागरूक असतील तर ESG फंड तुमच्यासाठी योग्य आहेत. या लेखात आम्ही गुंतवणूकदार म्हणून ESG फंड बाबत आपल्याला काय माहित असायला हवे हे सांगणार आहोत.

ESG बद्दल अधिक

एखाद्या कंपनी ला तुम्ही तेव्हाच ESG कंप्लायंट म्हणू शकता जेव्हा कंपनीने पर्यावरणाबाबत सामाजिक आणि सरकारी निकष पूर्ण केले असतील. ESG फंड या कंपन्यांचे काटेकोर पणे मूल्यांकन करतात आणि पोर्टफोलिओ साठी फक्त अशा कंपन्यांची शेअर्सची निवड करतात ज्या खऱ्या अर्थाने

ESG चे पालन करतात.

1 E  ESG चा:-  E म्हणजे एन्व्हायरोमेंट म्हणजेच पर्यावरण मुळात नैसर्गिक संपत्तीचे  जतन आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट आहे. भारत हवामान बदल आणि प्रदूषण नियंत्रणात पूर्वीपेक्षा अधिक जागरूक होत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने मुंबई च्या बाहेर असतात. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी. मग अशा ठिकाणी कारखान्यात काम करताना कामाच्या ठिकाणच्या भोवतालच्या पर्यावरणाचा विचार केला जात असेल तिथे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून कंपनी बंद करणे हे प्रकार कमी घडतात. ज्या कंपन्या पर्यावरणा बद्दल जागरूक नसतात त्यांच्या कामावर मात्र विपरीत परिणाम होऊ शकतो. नियम आपण थोडा वेळ बाजूला ठेऊ.

पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढयांना आज सारखे दिवस पाहायला लागू नयेत असे जर वाटत असेल तर व्यवसाय करणार्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे आलेच पाहिजे. उदाहरणार्थ कागद बनवणारी कंपनी असेल तर कागद हे झाडांपासून बनवले जातात तर अशा कंपनीच्या परिसरात छान सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली पाहिजे आणि कागद झाडांपासून न बनवता दुसऱ्या कुठल्या मटेरियल पासून बनवता येतो का ते शोधायला हवे. जेणेकरून झाडांची कत्तल करावी लागणार नाही. किंबहुना असे म्हणावे लागेल की ज्या कंपन्या ‘E’ बद्दल जागरूक आहेत त्यांचा उद्देश तर चांगला असतोच पण ते पर्यवर्णीय गैरव्यवहारापासून सुरक्षित राहतात आणि चांगली कामगिरी दाखवतात.

2 S म्हणजे सोशल म्हणजे सामाजिक कोणत्याही व्यवसायाच्या केंद्रस्थानी लोक असतात सामाजिक दृष्ट्या विकसित कंपन्या कर्मचाऱ्यांशी आदराने वागतात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. उदाहरण द्यायचं तर कर्मचाऱ्यांची सुरक्षा,व्यावसायिक धोक्यांविरुद्ध उपाय, सर्वांशी सामान वागणूक

सामाजिक दृष्ट्या जागरूक संस्था दर्शवते. कर्मचाऱ्यांचे वर्क लाईफ बॅलन्स करण्यासोबत सामाजिक दृष्ट्या जबाबदार कंपन्या CSR उपक्रमांद्वारे सामाजिक आर्थिक कारणांसाठी त्यांना प्रोत्साहन देतात म्हणून भागधारक आणि कर्मचाऱ्यांकडून भरपूर कौतुक मिळवतात.

3 G म्हणजे गव्हर्नन्स हा पाया आहे ज्याद्वारे कंपनीचे परीक्षण केले जाते. पण केवळ GAAP

च्या नियमांचे पालन करणे आणि ऑडिट चे निकष पूर्ण करणे हेच केवळ कंपनीला गव्हर्नन्स च्या बाबतीत कंप्लायंट बनवत नाहीत. आर्थिक व्यवहार दाखवण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कंपनीचे व्यवहार स्वछ आणि सरळ असतात.आणि ती मॅनॅजमेंटच्या मानांकनाचे पालन करते. मॅनॅजमेंट हे गांभीर्याने घेत असल्याने ते कितीही कठीण असले तरी कोणत्याही सुधारणांचा त्यावर परिणाम होत नाही. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदार म्हणून तुमच्यासाठी सुरक्षित असते.

ESG आणि भारतीय बाजारपेठ

ESG जागतिक स्तरावर खूप मोठा आहे २०२० मध्ये त्याची AUM ४०.५$ ट्रिलियन सह गेल्या ४ वर्षात दुप्पट झाली आहे. काहींना २०१९ पर्यंत ESG बुल मार्केट लक्झरी आहे असे वाटले. पण २०२० च्या पॅन डॅमिक  वेळी ESG ने आपले खरे कौशल्य दाखवले. २०११ मध्ये निफ्टी १०० ESG इंडेक्स सुरु झाल्यापासून १०.६ % च्या परताव्यासह निर्देशांकाने ९.१% च्या पारंपरिक निफ्टी इंडेक्स

रिटर्न च्या विरुद्ध कामगिरी केली आहे. निफ्टी १०० ESG इंडेक्स साठी -२९.१% च्या तुलनेत -२७.१% वर कमी आहे. ४५ अब्ज AUM सध्या AMFI नुसार ESG  फंड अंतर्गत मॅनेज केली जाते फंड आणि गुंतवणूक दार दोघे त्याच्याशी जुळवून घेतात. म्हणून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे कंपन्यांना चांगले मॅनेजमेंट आणि कर्मचारी घ्यावे लागतील. पॉलिसीज, पर्यावरण रक्षण हे काही घटक आहेत जे ESG फंडातील वाढत्या गुंतवणुकीला कारणीभूत आहेत. त्यांना पुश फॅक्टर आणि पुलफॅक्टर म्हणतात. महत्वाच्या मूलभूत व्यावसायिक गरजांना पुश requirements म्हणतात. टॉप ५०० कंपन्यांमधील कंपन्या बाजारभांडवलासह असणे हे गुंतवणूक दारांचा इंटरेस्ट वाढण्यास आवश्यक आहेत. पुल फॅक्टर या घटकांमध्ये काही विशिष्ट घटकांचा समावेश होतो जसे परदेशी गुंतवणूकदाराची आवड वाढणे.

परदेशी गुतंवणूकदार आपली इन्व्हेस्टमेंट अशाच कंपनी मध्ये जास्त करत आहेत. ज्यांच्याकडे दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय आहेत. कोर्पोरेट गव्हर्नन्स च्या समस्या वाढत असताना भारतीय

ESG गुंतवणुकीकडे वळण्याची शक्यता आहे. भारतामध्ये गव्हर्नन्स हा पर्यावरण आणि सामाजिक गोष्टींपेक्षा वरचढ आहे. कारण मॅनॅजमेण्ट च्या अनुपस्थितीत लहान शरहोल्डर्स चे नुकसान होते. अशा प्रकारे गुंतवणूक दारांच्या  दबावामुळे कंपन्यांना नियम लागू होण्यापूर्वी बदलण्यास आणि ESG चे पालन करण्यास प्रवृत्त केले जाण्याची शक्यता आहे.

भारता मध्ये ESG चे भविष्य

कोर्पोरेट इंडिया ला आता आणि भविष्यात ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे ( जे गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे) नियम कठोर होत जाणार आहेत आणि त्यांचे पालन दिवसेंदिवस. कठीण होणार आहे. मग ते पर्यावरणाचे नियम असोत की समाजावर होणारा परिणाम असो नियमांचे उलंघन करणाऱ्या कंपनीवर कारवाई होईल आणि दंड ठोठावला जाईल.

जर कंपनी ESG चे पालन करत असेल तर त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा तिप्पट फायदा असतो त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नसते आणि जर नियम कडक केले तर ते अधिक सुरक्षित राहू शकतात. ESG कंप्लायंट असणारी कंपनी बाजारातील आपला हिस्सा वाढवू शकते. जेव्हा ESG साठी पात्र नसलेल्या कंपन्या त्यासाठी संघर्ष करत असतात. ESG चे पालन केल्याने गुंतवणूकदार आणि भागधारक यांच्यामध्ये कंपनीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते.

 शेर होल्डर्स ची भांडवलशाही मुळे दूरगामी परिणाम होतात. हे जगभरातील ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञांना मान्य आहे. ESG मधील गुंतवणुकीचा उद्देश हा शरहोल्डर्स च्या भांडवलशाही वरून फक्त शेरहोल्डर्सच्या गरजांवर लक्ष देणे हा आहे. ESG मधील गुंतवणूक ही कंपन्यांसाठी, इन्वेस्टर्स साठी आणि समाजासाठी उत्तम आहे म्हणूनच ती इन्वेस्टमेन्टच्या क्षेत्रातील न्यू नॉर्मल आहे.

 

Related posts

Leave a Comment