हिंदू धर्मगुरुचे ५०० वर्षांपूर्वी केलेले भाकित

इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याने हिंदू धर्माचे वैभव परत कसे येईल हे धर्मगुरूंनी केलेले भाकीत वाचा. २६ ऑक्टोबर रोजी यावर्षी सुकूमावती सुकार्नोपुत्री इंडोनेशिया तील बाली येथे सिंगराजा शहरात औपचारिकपणे इस्लाम मधून हिंदू धर्मात आल्या आहेत. सुकर्णोपुत्री या इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष सुकर्णो आणि त्यांची तिसरी पत्नी फातमावती यांची मुलगी आहे. त्या इंडोनेशियाच्या पाचव्या राष्ट्रपती मेगावती सोकर्णोपुत्री यांच्या बहीणही आहेत. यामुळे सुकूमावती हाय प्रोफाइल लोकांपैकी आहे ज्यांनी इस्लाम धर्माची निष्ठा नाकारून हिंदू धर्म स्वीकारला.

हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय तिने तिची आजी इदा आयु न्योमन राय श्रीबेन यांच्यामुळे घेतला. लहानपणापासून तिच्या आजीचा तिच्यावर खूप प्रभाव होता. तिची आजी बाली येथे राहत होती. सुकर्णोपुत्री यांनी यापूर्वी अनेक हिंदू समारंभांना हजेरी लावली होती आणि हिंदू धर्मातील धर्मगुरुंशी चर्चा केली होती. तिच्या धर्मांतराच्या निर्णयाला तिचे भाऊ गुंटूर सोयकर्णोपुत्रा आणि गुरु सोयकर्णोपुत्रा आणि बहीण मेगावती सोयकर्नोपुत्री यांचा पाठिंबा मिळाला. तिचा निर्णय मान्य केला आहे. आज इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिमसंख्यांक देश आहे. एकेकाळी याच बेटावर हिंदू धर्माचा प्रभाव होता. पहिल्या शतकाच्या सुरुवातीला ते जावा आणि सुमात्रा बेटांवर गेले आणि स्थिरावले. पण 

 

इस्लामच्या आगमनानंतर हिंदू धर्माचा प्रभाव कमी झाला आणि बहुसंख्य मुस्लिम असलेल्या देशात हिंदू  अल्पसंख्याक झाले. आज इंडोनेशियातील हिंदू त्यांच्या पूर्वजांच्या, विशेषतः राजा जयाबाया आणि धर्मगुरू सब्दापालोन यांच्या भाकितांवर विश्वास ठेवतात.

हिंदू पुजारी शब्दपालोनचे भाकीत

सबदापालोन हा इंडोनेशियातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य असलेल्या मजपाहित साम्राज्याचा राजा ब्रविजया पंचम याच्या दरबारात एक गूढ पुजारी होता. जेव्हा राज्य इस्लामिक प्रभावाखाली आले आणि १४७८ मध्ये ब्राविजया पाचवाने इस्लाम स्वीकारला तेव्हा सबदापालोनने राजाला शाप दिला. नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय भ्रष्टाचाराच्या वेळी मी ५०० वर्षांनंतर परत येईन अशी शपथ घेतली. धर्मगुरूंनी बेटाला इस्लाम मधून मुक्त करून हिंदू धर्माचे वैभव परत मिळणार असे भाकीत केले.

आख्यायिकेनुसार शब्दपालोन म्हणाले होते की ‘मी राणीचा आणि जावाच्या भूमीतील सर्व डांग हयांग (देव आणि आत्मे) चा सेवक आहे. विकू मनुमानसा, सकुत्रेम आणि बामबांग साक्री या तुमच्या महिमाच्या पहिल्या पूर्वजापासून सुरुवात करून, पिढ्यानपिढ्या आजपर्यंत, जावानीज आम्ही राजांचे सेवक आहोत. गेल्या २००० वर्षांपासून त्यांच्या धर्मात बदल झालेला नाही. मी येथे जावानी राजांची सेवा करण्यासाठी आलो होतो मी माझ्या मुळाकडे परत जात आहे. तरीही राजाला आठवण करून द्या की ५०० वर्षांनी मी संपूर्ण जावा मध्ये बुडा धर्म स्थापन करीन.

त्याने भाकीत केले होते की महाराज जर तुम्ही इस्लाम धर्माकडे गेलात तर तुमच्या मुलाला धोका निर्माण होईल. आणि जावी जावा सोडतील आणि जावानीजांना इतर राष्ट्रांचे अनुसरण करावे लागेल. पण एक दिवस असा येईल की जावी लोक जगाचे नेतृत्व करतील. त्यांनी ताकीद दिली की ५०० वर्षांनी मी परत येऊन धर्माची स्थापना करीन जे नकार देतील ते कमी होतील. ते राक्षसांचे भक्ष होतील ते सर्व उध्वस्त झाल्याशिवाय मी समाधानी होणार नाही. इंडोनेशियातील लोकांना त्याच्या परत येण्याविषयी तो म्हणाला की जेव्हा माऊंट मेरापि चा उद्रेक होईल आणि त्याचा लावा आणि राख दक्षिणेत पसरेल तेव्हा मी परत येईन असे समजावे. आणि अचानक १९७८ साली बेटावर हिंदू मंदिरांचे काम पूर्ण झाले अनेक लोक इस्लाम मधून हिंदू धर्मात येऊ लागले. त्या वेळी माऊंट समेरूचा उद्रेक झाला होता. हिंदूंना वाटले की शब्दपालोन खरच परत  आला.

राजा जय भयाचे भाकीत

जय भया केंडेरी राज्याचा ११३५ ते ११५७ उए पर्यंत राजा होता.  त्याच्या काळात राज्य खूप भरभराटीला आले. भविष्य वर्तवणाऱ्या या हिंदू राजाला रत्तू आदिल म्हणून ओळखले जात असे. संघर्षाच्या काळात त्याने बेटावर सामाजिक सुव्यवस्था राखली. आजही इंडोनेशिया मध्ये त्याच्या भाकितांना सांस्कृतिक महत्व आहे. जय भया यांनी हिंदू साहित्याचे समर्थन केले आणि अम्प पनूलुहु या कवींना राजाश्रय दिला. त्याच्या कार्यकाळात जावा मधील लोक हिंदू राजाला भगवान विष्णूंचा अवतार समजत असत. आपण हिंदू देवतांपैकी एकाच्या वंशातले आहोत हा दावा जय भयाने सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला. विविध ऐतिहासिक ग्रंथांनुसार त्याला ब्रम्हदेवाचा पणतू म्हणून गौरवण्यात आले. जयभया यांनी ‘भविष्यसूचक श्लोक’ लिहिले, जे ‘सेरत जयभया’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते मौखिक पठणातून पिढ्यानपिढ्या प्रसारित केले गेले आणि सर्वात जुनी लिखित प्रत शेवटी १८३५ मध्ये अनुवादित झाली. 

त्याच्या प्रसिद्ध भाकितापैकी एक म्हणजे जावानीज लोकांचे गोऱ्या लोकांकडून दीर्घकाळ वसाहतीकरण ही होय. जावावर डच लोकांनी राजाच्या मृत्यूनंतर १५९५ पासून ४०० वर्ष राज्य केले. जयभयाने असेही भाकीत केले होते की ‘पिवळ्या कातडीचे पुरुष’ गोऱ्या कातडीच्या माणसांकडून बेटाचा ताबा घेतील. दुसऱ्या महायुद्धावेळी हे भाकीत खरे झाले जेव्हा जपानी लोकांनी इंडोनेशिया वर ताबा मिळवला आणि

डच राज्य संपुष्टात आले. हिंदू राजाने भाकीत केले होते की पिवळी माणसे मक्याच्या देठाच्या आयुष्यापेक्षा कमी काळ राज्य करतील. हे भाकीत जरी खोटे ठरले असले तरी जय भया हा विष्णूंचा पुनर्जन्म आहे. या अख्यायीकेमुळे  त्याचा वारसा कायम दृढ झाला.

 

Related posts

Leave a Comment