चिरंजीव झाला पुनीत राजकुमार

46 तास उलटून गेले प्रत्येक कन्नडा चॅनल एकच बातमी देत आहे.

जिंदगी के परदे पे इतना खूब निभाओ किरदार,
कि परदा गिरने पर भी तालियां बजती रहे ?❤️
#अप्पुसर ? Puneeth Rajkumar

पुनीत राजकुमार गेला ..
कन्नडचा सुपरस्टार हार्ट अटॅकने गेला ..
वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी!!
त्याच्या जाण्याची बातमी एवढी धक्कादायक आहे की कर्नाटकात आता कलम 144 लावल्याची घोषणा झालीय.
काय प्रेम कमवतात ही माणसे ..? कारण माणसे ही मुळातच माणसासाठी जगतात.
पुनीतने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता.
पुनीतच्या जाण्याने कन्नड सिनेसृष्टीचे नुकसान झालंय पण त्याच्या सेवाधर्माची जाणीव गडद झालीय.

पुनीत 21 सुपरहिट सिनेमे दिले .
पण हाच पुनीत 26 अनाथाश्रम चालवत होता.
46 मोफत शाळा चालवत होता.
16 वृद्धाश्रम चालवायचा ,
19 गोशाळा चालवण्याचे मोठे कामही पुनित करत होता आणि
1800 अनाथ मुलांचा पालक होता.
हे सर्व स्वत:च्या खर्चातून करायचा. ?
आपल्याकडे दहा वीस हजार दान केलं तर मिडिया सोशल मीडियावर वाहवा होते .. तिथे पुनीत राजकुमार आणि एवढं सगळं महान कार्य करत असताना कधीच सोशल मीडिया सारख्या साधनांवर आपल्या कामाचे दाखले न दाखवणारा दिलदार असा अभिनेता ही आज आपल्यातून गमावला आहे ?


पंतप्रधान मदत निधीसाठी 50 लाख रुपये देखील दान केले होते आणि आता त्यांना मुलींच्या शिक्षणावर काम करायचे होते. त्यांनी 1800 अनाथ मुलांनाही दत्तक घेतले होते, ज्यांचे शिक्षण ते घेत असत. कोणत्याही खेळासाठी, सामाजिक कार्यक्रमासाठी एक पैसाही घेतला नाही. कौन बनेगा करोडपती हा कन्नडमधला अँकर होता आणि एकदा आयोजकांनी हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रश्न टाकल्यावर त्यांनीच शो बंद केला. अनेकवेळा त्यांनी स्वतः गाणे गाऊन चॅरिटीसाठी पैसे गोळा केले होते. आणि ही सर्व धार्मिक कामे तो आपल्या कष्टाच्या पैशातून करत असे. धर्माप्रती आदर आणि श्रद्धा असलेल्या अशा धर्माभिमानी आणि सामाजिक व्यक्तीचे जाणे ही अत्यंत दुःखद घटना आहे.
त्याने जे कमावलं ते बाॅलीवुडचा एकही स्टार कमावू शकत नाही ?
कुठे पुनित आणि कुठे चरसी बाॅलीवुड !!
काय अफाट माणूस असेल राव हा ♥️
एक महान दाता ,धर्माभिमानी, सामाजिक कार्यकर्ता , सुपर स्टार, हजारो मुलांचा पालक आपल्यातून निघून गेला
भावपुर्ण श्रध्दांजली ?♥️❤️
#मरावेपरीकिर्तीरुपी_उरावे ?

असा सुपरस्टार होणे नाही
#यासम_हाच ?

Related posts

Leave a Comment