राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात ७३ जणांना पद्म पुरस्कार प्रदान केले. काहींचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत पद्म पुरस्कार विजेते. या पैकी ४ पदमविभूषण, ८ पदमभूषण आणि २०२० सालातील ६१ पदमश्री पुरस्कार विजेते होते. असे राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पद्म पुरस्कार ३ श्रेण्यां मध्ये देण्यात येतात आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. 

 पदमविभूषण, पदमभूषण, पदमश्री अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पदमविभूषण पुरस्कार दिला जातो, उच श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पदमभूषण दिला जातो तर कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पदमश्री पुरस्कार दिला जातो. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस ( मरणोत्तर), अरुण जेटली (मरणोत्तर), सुषमा स्वराज ( मरणोत्तर)आणि पंडित छन्नूलाल मिश्रा हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सेमी क्लासिकल गायक यांना पुरस्कार देण्यात आले.

राष्ट्रपती कोविंद यांनी माजी अर्थमंत्री जेटली यांना (मरणोत्तर )सार्वजनिक व्यवहारासाठी पदमविभूषण पुरस्कार दिला. एक उत्कृष्ट संसद पटू आणि नावाजलेले वकील, त्यांनी न्यायिक सुधारणा, निवडणूक सुधारणा आणि प्रगतिशील सामाजिक आणि आर्थिक कायदे यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. जेटली यांच्या पत्नीने हा पुरस्कार स्वीकारला. कोविंद यांनी माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री स्वराज यांना मरणोत्तर सार्वजनिक व्यवहारांसाठी पदमविभूषण प्रदान केला.

एक दूरदर्शी नेत्या, भारतीय परंपरांमध्ये खोलवर रुजलेल्या श्रीमती स्वराज यांनी महिला सक्षमीकरणाला मूर्त रूप दिले. त्या अनेक महिलांचे प्रेरणास्थान होत्या. असे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हणाले आहे. हा पुरस्कार स्वराज यांच्या मुलीने स्वीकारला.

कोविंद यांनी बॅडमिंटन पटू पी वि सिंधू, डॉ अनिल प्रकाश जोशी यांना समाजकार्यासाठी, डॉ. एल. सी. जमीर यांना सार्वजनिक घडामोडींसाठी आणि मुमताज अली यांना अध्यात्मवादासाठी पुरस्कार दिले. त्यांनी संताली भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक दमयंती बेश्रा, टी व्ही आणि सिनेमा अभिनेत्री सरिता जोशी संगीतकार अदनान सामी आणि निर्माती आणि अभिनेत्री कंगना रानौत यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींनी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी आणि नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चे एपिडेमियॉलॉजि आणि कम्युनिकेबल डिसीज विभागाचे प्रमुख डॉ रमण गंगाखेडकर यांना पद्मश्री पुरस्कार दिले. यावेळी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह उपस्थित होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कंगना रानौत यांना पदमश्री पुरस्कार प्रदान केला. एक उत्तम चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री म्हणून कंगना रानौत ओळखली जाते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  शटलर पी वि सिंधू यांना राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमादरम्यान पदमभूषण पुरस्कार दिला.

भारताच्या पहिल्या एअर मार्शल डॉ पद्मा बंदोपाध्याय यांना वैद्यकीय क्षेत्रातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पदमश्री पुरस्कार मिळाला.

गायक अदनान सामी पद्मश्री ने सन्मानित

कोविंद यांनी राणी यांना पद्मश्री पुरस्कार दिला. ती भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आहे. तिने २०० हुन अधिक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांना (मरणोत्तर ) पद्मविभूषण पुरस्कार नवी दिल्लीत प्रदान केला.  त्यांची मुलगी बांसुरीस्वराज हिला हा पुरस्कार मिळाला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे अरुण जेटली यांना (मरणोत्तर ) पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला. त्यांच्या पत्नी संगीत जेटली यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

राष्ट्रपती कोविंद यांनी श्री तरुणदीप राय यांना खेळासाठी पदमश्री पुरस्कार दिला. तो एक तिरंदाज आणि दोन वेळचा ऑलम्पिक पटू आहे. ज्याने विविध स्पर्धांमध्ये देशासाठी नाव कमावले आहे.

कोविंद यांनी श्री एस. रामकृष्णन यांना समाजकार्यासाठी पदमश्री पुरस्कार दिला. श्री रामकृष्णन हे कार्यकर्ते आहेत. त्यांनी दक्षिण तामिळनाडू मधील दिव्यांग व्यक्तींसाठी अमर सेवा संगम हा प्रक्लप सुरु केला आहे.

कोविंद यांनी कला क्षेत्रातील योगदानासाठी पंडित  छन्नूलाल मिश्रा, हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सेमी क्लासिकल गायक यांना पदमविभूषण पुरस्कार दिला. लोकसंगीत, क्लासिकल, सेमिक्लासिकल संगीतामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात डॉ डउ जमीर यांना सार्वजनिक व्यवहारासाठी पदमभूषण प्रदान केले. एक जेष्ठ राजकीय नेते, अनेक राज्यांचे राज्यपाल डॉ जमीर नागालँडच्या संस्थापकांपैकी एक आहेत. 

रामनाथ कोविंद यांनी अनिल प्रकाश जोशी यांना पदमभूषण पुरस्कार समाजकार्यासाठी राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात दिला. डॉ जोशी हे हिमालयन एन्व्हायर्नमेंटल स्टडीज अँड कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक आहेत. आणि ग्रामीण भागातील जनतेच्या सामाजिक उन्नती साठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गफुरभाई एम. बिलाखिया यांना व्यापार आणि उद्योगासाठी पद्मश्री प्रदान केले. सामान्यतः बापूजी म्हणून ओळखले जाणारे, ते एक प्रख्यात गांधीवादी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात खेळासाठी ओइनम बेंबेम देवी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. ती भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार आहे आणि तिला ‘भारतीय फुटबॉलची दुर्गा‘ म्हणूनही ओळखले जाते. 

राष्ट्रपती कोविंद यांनी डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. डॉ गंगाखेडकर हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नवी दिल्लीच्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीज विभागाचे प्रमुख आहेत. 

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते श्री अगुस इंद्र उदयना यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री  पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते गांधी आश्रम बालीचे संस्थापक आहेत.  आणि इंडोनेशियामध्ये गांधीवादी मूल्यांचा प्रसार करण्यात सक्रिय आहेत.

राष्ट्रपती कोविंद यांनी श्रीमती कलेशाबी महबूब यांना कलेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला. त्या नादस्वरम विद्वान आहेत आणि त्यांनी जगभरात नादस्वरम मैफिली केल्या आहेत. 

राष्ट्रपती कोविंद यांनी डॉ कुशल कोंवर सर्म यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी पदमश्री पुरस्कार दिला. डॉ सरमा यांना ‘एलीफंट मॅन ऑफ आशिया‘ म्हणून ओळखले जाते आणि वन्यजीव आरोग्य सेवा, व्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाते.

कोविंद यांनी श्री यडला गोपाला राव यांना पदमश्री पुरस्कार दिला. पद्य नाटकम मधील ते नावाजलेले कलाकार आहेत. पौराणिक नाटकांमध्ये काम करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. 

मदन सिंग चौहान यांना राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे कला क्षेत्रातील पदमश्री पुरस्कार दिला. ते छत्तीसगढ मधील नवाजलेले सुफी गायक आहेत.  

जयप्रकाश अग्रवाल यांना कोविंद यांनी व्यापार आणि उद्योगासाठी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात सन्मानित केले. ते सूर्या रोशनी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत आणि एक सक्षम आणि यशस्वी उद्योगपती आहेत. समाजसेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. 

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे सार्वजनिक व्यवहारांसाठी जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण प्रदान केले. त्यांच्या पत्नी लीला कबीर यांना हा पुरस्कार मिळाला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे सार्वजनिक व्यवहारांसाठी सय्यद मुअज्जेम अली (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला. त्यांची पत्नी तुहफा जमान अली यांना हा पुरस्कार मिळाला. 

राष्ट्रपती कोविंद यांनी पशुसंवर्धनासाठी श्री बाता कृष्ण साहू यांना पद्मश्री प्रदान केले. ते बाटा बाबू म्हणूनही ओळखले जातात. वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून शेतकऱ्यांना मत्स्यपालनाचा सराव करण्यास प्रवृत्त करणारे ते एक नाविन्यपूर्ण शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. छायाचित्र: राष्ट्रपती भवन टि्वटर.

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते श्री सुंदरम वर्मा यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते कोरडवाहू कृषी वनीकरणाचे प्रवर्तक, कृषी-जैवविविधता संवर्धन आणि पावसाच्या पाण्याची साठवण करणारे आहेत.

कोविंद यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी येशे दोरजी थोंगजी यांना पदमश्री पुरस्कार दिला. ते अरुणाचल प्रदेश लिटररी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत जे अरुणाचल प्रदेशातील लोकांमध्ये साहित्याचे महत्त्व पसरवण्याच्या चळवळीत सक्रिय आहेत. 

राष्ट्रपती कोविंद यांनी श्री शेख महबूब सुभानी यांना पद्मश्री प्रदान केले. ते नाधस्वरम विद्वान आहेत. आणि त्यांनी जगभरात नाधस्वरम मैफिली सादर केल्या आहेत. 

राष्ट्रपती कोविंद यांनी श्री श्याम सुंदर शर्मा यांना कलेसाठी पद्मश्री प्रदान केले. ते  प्रिंटमेकिंग कलेत सर्जनशील कलाकार आहेत. गेल्या ६० वर्षांपासून ते सतत प्रिंटमेकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.

राष्ट्रपती कोविंद यांनी डॉ विजय संकेश्वर यांना व्यापार आणि उद्योगासाठी पद्मश्री प्रदान केले. ते तठङ समूहाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जातात. छायाचित्र: राष्ट्रपतीभवन टि्वटर.

राष्ट्रपती कोविंद यांनी कृषीसाठी श्रीमती ट्रिनिटी साईओ यांना पद्मश्री प्रदान केले. व्यवसायाने एक शालेय शिक्षिका, तिने मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्समध्ये हळदीच्या लाकाडोंग जातीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले.

राष्ट्रपती कोविंद यांनी कृषी क्षेत्रासाठी श्री चिंतला वेंकट रेड्डी यांना पद्मश्री प्रदान केले. ते नैसर्गिक शेतीतील एक प्रयोगशील शेतकरी आहेत. आणि त्यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या कृषी प्रक्रियांचे पेटंट घेतले आहे. 

 

राष्ट्रपती कोविंद यांनी श्री शाहबुद्दीन राठोड यांना साहित्य आणि शिक्षणासाठी पद्मश्री प्रदान केले. ते शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ आणि लेखक आहेत. ते प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विनोदी कलाकार  आहेत. छायाचित्र: राष्ट्रपतीभवन टि्वटर

राष्ट्रपती कोविंद यांनी कुमारी साबरमती यांना कृषी क्षेत्रासाठी पद्मश्री प्रदान केले. ’टिकी आपा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या, त्या संभाव या पर्यावरण आणि लिंग समस्यांना समर्पित संस्थेच्या सह-संस्थापक आहेत. सेंद्रिय शेती आणि जैवविविधता संवर्धनासाठीही ती ओळखली जाते.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक आभार!

– सतीश सिन्नरकर, संपादक 

महानगरी वार्ताहर

 

Related posts

Leave a Comment