पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये १२०० वर्ष जुनं मंदिर आहे. अयोध्येत ज्यावर बाबरी मशीद पाडल्यावर पाकिस्तानच्या समाजकंटकांनी या मंदिरावर ताबा मिळवला होता. त्यांना आता तिथून हुसकून लावून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याचे भग्नावस्थेतील मंदिरांची देखभाल करणाऱ्या समितीने सांगितले.
फोटो- हिंदू मंदिराच्या समोर सैनिक गस्त घालताना.
एवाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने ( ETBP ) मागील महिन्यात अनारकली बाजार, लाहोर येथील वाल्मिकी मंदिराचा ताबा एका ख्रिश्चन कुटुंबाकडून स्वतःकडे घेतला. कृष्ण मंदिराव्यतिरिक्त वाल्मिकी मंदिर सध्या वापरात आहे आणि ते लाहोर मध्ये आहे. तेथील ख्रिश्चन कुटुंब आता हिंदू धर्मात धर्मांतरित झाले आहे. ते फक्त वाल्मिकी हिंदूंनाच मंदिरात प्रवेश करू देतात. ETBP चा प्रवक्ता श्री अमीर हाशमी याच्या म्हणण्यानुसार वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार येत्या काही दिवसात मास्टर प्लॅन प्रमाणे करण्यात येईल. १०० हिंदूंबरोबरच काही शीख आणि ख्रिश्चन पुढारी या मंदिरात जमले होते. हिंदूंनी पारंपरिक पद्धतीने पूजा केली आणि पहिल्यांदा लंगर सुरु केला. मंदिर ताब्यात आल्यापासून हे प्रथमच करण्यात आले. २० वर्षांपूर्वी त्या मंदिरावर ख्रिश्चन कुटुंबाचा ताबा होता.
मंदिराची जमीन ETBP ला हस्तांतरित करण्यात आली होती. पण ते कुटुंब २०११-१२ पासून तेथे राहत होते. त्यांनी हे मंदिर फक्त वाल्मिकी हिंदूंसाठी खुले केले. त्यामुळे संस्थेला कोर्टात जाण्यावाचून पर्याय नव्हता. कोर्टाने याचिका दाखल करणाऱ्याने खोटी तक्रार केली म्हणून ती फेटाळून लावली, असे प्रवक्त्याने सांगितले. १९९२ साली बाबरी मशीद पाडल्यावर संतप्त जमाव वाल्मिकी मंदिरात घुसला होता. त्यांनी श्रीकृष्णाची आणि वाल्मीकींच्या मूर्तीची विटंबना केली. स्वयंपाक घरात मोडतोड केली. आणि देवाच्या अंगावरील सोने चोरले. मंदिर उध्वस्त केले आणि आग लावली. मंदिर परिसरातील दुकानेही आगीच्या तडाख्यात सापडली. ती आग विझवायला मंदिर प्रशासनाला खूप दिवस लागले.

ETBP चा प्रवक्ता वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाला की पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने सरकारला लवकरात लवकर मंदिराचे नूतनीकरण करण्यास आणि हिंदू भाविकांना उत्तम सुविधा पुरवण्यास सांगितले. पण त्या मंदिराच्या भूखंडावर खटला सुरु असल्याने जीर्णोद्धाराचे काम सुरु होऊ शकत नाही. हे मंदिर शहराच्या अगदी मधोमध आहे. ETBP अशाच भग्नावस्थेतील मंदिरांची काळजी घेण्याचे काम करते. ज्यामध्ये फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंची मंदिरे आणि शिखांचे गुरुद्वारे आहेत. संपूर्ण पाकिस्तानात २०० गुरुद्वारा आणि १५० मंदिरे आहेत.
