चारधाम म्हटलं की डोळ्यासमोर तीर्थ यात्रा येते. सर्च टीमने ने ३ हरवलेले चारधाम तीर्थयात्रेसाठी जाण्याचे मार्ग पुन्हा शोधले आहेत.

चारधाम ट्रेकला जाण्याचे मार्ग शोधायला गेलेल्या सर्च टीमला ३ हरवलेले मार्ग सापडले आहेत. आणि तेच थोडीफार दुरुस्ती करून पुन्हा सुरु करता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. जर हे ट्रेकचे मार्ग पुन्हा सुरु केले तर तीर्थ यात्रेला अधिक यात्रेकरू जाऊ शकतील आणि त्यामुळे उत्तराखंडमधील पर्यटनास चालना मिळेल. असे टीम लिडर राकेश पंत यांनी मोहीम संपल्यावर पीटीआयला सांगितले. पंत आणि टीममधील इतर सदस्य सुमारे ५० दिवसात अत्यंत कठीण असा ११५८ किमीचा प्रवास करून जिथे हवामान चांगले असेलच असे नाही. अशा प्रदेशातून सोमवारी ऋषिकेशला परत आले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास त्यांनी पायी केला. मान्य आहे की हा प्रवास कठीण होता. पण प्रवासाचा अनुभव खूप छान होता. आता हरवलेले किंवा वापरात नसलेले मार्ग जेव्हा वापरात होते आणि यात्रेकरू त्यांचा वापर करत होते त्यावेळेचे काही अनुभव आम्हाला स्थानिकांकडून ऐकायला मिळाले.

पंत म्हणाले. जेव्हा इकडे पक्के रस्ते नव्हते, कोणतेही वाहन घेऊन जात यायचे नाही तेव्हा पायवाटेने जावे लागत असे त्यावेळेस यात्रेकरूंमध्ये लोकप्रिय असलेल्या मार्गांवर ही टीम कुटीमध्ये किंवा ट्रान्सीट कॅम्पमध्ये राहिली. जे तीन ट्रेकचे मार्ग पुन्हा सुरु केले जाऊ शकतात ते असे आहेत. ऋषिकेश देवप्रयाग हायकिंग ट्रेल, गंगोत्री ते केदारनाथ ट्रेक वाया भाटवरी-बेलक पास बुधा, केदार पानवली- कंठात्री, जुगी नारायण आणि धरसु  ते यमुनोत्री वाया फलचा टॉप पंत म्हणाले. जर सरकारने प्रयत्न केले तर हे मार्ग पुन्हा सुरु होऊ शकतात असे ते म्हणाले. टिहरी धरणाच्या बांधकामामुळे आता बरेच मार्ग पूर्ण बंद झाले आहेत ‘ट्रेक द हिमालय’ संस्थेचे पंत म्हणाले. ज्यांनी उत्तराखंड पर्यटन विकास मंडळासोबत ही मोहीम राबवली.

त्यांनी सांगितले की त्यांची संस्था आणि UTDB मिळून एक पुस्तक काढणार आहेत. ज्यामध्ये त्यांचा २ महिन्यातील प्रवासाचा आणि संशोधनाचा अनुभव दिलेला असेल. ही मोहीम म्हणजे जुने मार्ग पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचा भाग होता. चारधाम कडे जाणारे हे मार्ग वाहतुकीच्या चांगल्या सोयी झाल्यामुळे बंद झाले होते. कारण यात्रेकरू हायवेचा किंवा मोटारीचा उपयोग करत असत. या टीममध्ये SDRF अधिकारी मीडिया, संशोधक यांचा समावेश होता. चारधाम यात्रेमध्ये उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री, गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ या प्राचीन ठिकाणांचा समावेश होतो.

पूर्वी चारधाम यात्रा ही जास्त करून साधू संन्यासी करायचे. अशी एक आख्यायिका आहे की वयाची पंच्याहत्तरी ओलांडली की चारधाम यात्रेला निघायचे आणि परत यायचे नाही कारण पायवाटेचा प्रदेश त्यात उंचीवरच्या ठिकाणी गेल्यावर मग काही त्रास झाला आणि मरण आलं तर म्हणून संसारातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून मग यात्रेला जायचे काही वाईट होईलच अशातला भाग नाही, पण अशी एक समजूत होती. खळाळत्या नद्यांमधून वाट काढत उंच डोंगर कपाऱ्या पार करत टीमने अतिशय खडतर प्रवास केला. आणि दूर खेडोपाड्यात शोध घेतला. आणि त्या लोकांशी प्रत्येक्ष बोलले ज्यांनी यात्रेचा, यात्रेत भाग घेण्याचा आणि एकूणच यात्रेमध्ये कशाप्रकारचे वातावरण असतं त्याचा अनुभव सांगितला.

त्या काळात बाबा कमळी नावाच्या ग्रुप ने यात्रेच्या विविध टप्प्यांवर खाण्यापिण्याच्या पदार्थांची सोय केली होती. तसेच यात्रेकरूंसाठी तात्पुरत्या धर्मशाळा बांधल्या होत्या. प्रवासा दरम्यान टीमने अशा अनेक छाटीचा (राहुट्या) अभ्यास केला तेव्हा त्यांना कळले की प्रवाश्याना तेव्हा मोफत अन्नधान्य आणि निवासाची व्यवस्था करण्याची विशिष्ट अशी पद्धत होती जेणेकरून प्रवास सुखकर व्हावा.

बाबा काली कमळी ग्रुप ने तेव्हा ८० राहुट्या बांधल्या होत्या. त्यापैकी आता फक्त काहीच राहण्यायोग्य अवस्थेत आहेत बाकी सर्व उध्वस्त झाल्या आहेत. यात्रेदरम्यान आमच्या टीमने विविध छाटी (राहुट्या)आणि धर्मशाळेत वास्तव्य केले आणि प्राचीन काळातल्या यात्रा त्यांच्या पद्धती याविषयी जाणून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. आमच्या टीमने पानवली कंठा यासारख्या काही  चढण्यासाठी उंच पर्वतरांगातुन प्रवास केला. उदाहरण द्यायचे तर गढवाल पर्वत रांग जी ११५०० फूट उंचीवर आहे. पानवली कंठाचा गवताळ प्रदेश हा तेथील नयनरम्य देखावे, सुंदर उंच पर्वतरांगा, कीर्ती स्तंभ केदारनाथ चौखांब इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे.

आमच्या टीमने अशी भरपूर ठिकाणे शोधली जी पुन्हा सुरु झाली तर तिथे वीक एन्ड ट्रेक. लॉन्ग ट्रेक बाईक राईड अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतात. आमच्या टीम ने प्रवासादरम्यान जमा केलेली माहिती जसे की, उंच पर्वतरांगांचे केलेले निरीक्षण, खाद्यपदार्थांबद्दल केलेले निरीक्षण सांस्कृतिक विषयांवर काढलेली टिपणे यांचा पुन्हा एकदा अभ्यास करून काही बदलांची आवश्यकता असल्यास ते करून तो डेटा UTDB कडे दिला जाईल.

Related posts

Leave a Comment