उत्तर प्रदेश मधील निवडणुकांपूर्वी मोदींच्या प्रोजेक्ट्सच्या आनंद वार्ता

सय्यद फिरदोस अश्रफ. यांनी उत्तरप्रदेशातील निवडणुकांपूर्वी मोदीजी सुरु करत असलेल्या प्रोजेक्ट्सच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. डेटा हेमंतकुमार श्रीनिवासन

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गंगेत स्नान करून प्रार्थना केली. १३ डिसेंबर २०२१. नववर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात होत असलेल्या निवडणुकांमुळे मोदीजी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व असलेल्या राज्यातील विकास प्रकल्प सुरु करण्याच्या जोरदार तयारीला लागले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही याचे कारण हे सुरु होणारे नवे प्रकल्प आहेत. ऑक्टोबर २०२१ पासून मोदींनी खूप नवीन प्रकल्प सुरु केले किंवा पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उदघाटन केले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उत्तरप्रदेशला उत्तमप्रदेश बनवून दाखवायचेच असा निश्चय त्यांनी केला आहे. जो जानेवारी २०२२ पर्यंत केव्हाही पूर्ण होऊ शकतो जेणेकरून भारतीय जनता पक्षाला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.

मोदींनी याची सुरुवात २० ऑक्टोबरला पूर्व उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन करून केली. कुशीनगर हा देशातील सर्वात मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पाची किंमत रु २६० कोटी इतकी आहे. जो कुशीनगर सारख्या मागासलेल्या भागाला हवाईमार्गाने भारतातील इतर ठिकाणांशी जोडेल.

मोदींच्या या कामावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगेच टीका केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांनी याच प्रकल्पाचे उदघाटन केले होते. विरोधकांच्या बोलण्याची फारशी पर्वा न करता मोदींनी त्याच दिवशी कुशीनगरमध्ये २८० कोटी रुपयांच्या राजकीय मेडिकल कॉलेजची पायाभरणी केली. या मेडिकल कॉलेजमध्ये ५०० बेड्सचे हॉस्पिटल असेल आणि २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

१६ नोव्हेंबरला मोदींनी अतिशय उत्तम काम केले. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पूर्वांचल इस्टन एक्सप्रेस-वेचे उदघाटन केले. त्यावर हवाईदलाच्या सुपर हर्क्युलस विमानातून उतरले. आणि हवाईदलाच्या सहकार्याने एअर-शोचे आयोजन केले. हवाईदलाने पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील रनवेवर चित्तथरारक हवाई-शोचे आयोजन केले. ज्यात मिराज २०००, सुखोई ३० आणि फायटर जेट्सने भाग घेतला.

३४०.८२४ किमी लांबीचा सहापदरी एक्सप्रेसवे बांधायला २२,४९४.६ कोटी रुपये खर्च आला हा एक्सप्रेसवे लखनौला गाझीपूरशी आजमगड मार्गे जोडतो. भाजप नेते मोदींच्या यशाचा आनंद साजरा करत असताना अखिलेश यादव यांनी पुन्हा टीका केली. पत्रकार परिषदेत २०१६ मध्ये  अखिलेशने याच प्रकलपाची पायाभरणी केल्याचे सांगितले. अखिलेश जी म्हणाले की पूर्वांचल एक्सप्रेसवे पूर्ण करण्याची आयडिया त्यांची होती ज्याचे श्रेय आता मोदी आणि योगी आदित्य घेत आहेत. कितीही टीका होत असली तरी मोदींनी त्यांचा उत्तरप्रदेशला उत्तम प्रदेश बनवण्याचा ध्यास सोडलेला नाही.

1.) श्री काशी विश्वनाथधाम, तारीख- १३ डिसेंबर २०२१, मोदींनी काशी विश्व्नाथधामच्या पहिल्या टप्प्यात २३ बिल्डींग्स चे उदघाटन केले. खर्च अंदाजे ३३९ कोटी रुपये. या प्रकल्पामुळे काशी विश्वनाथधाम मंदिराला थेट गंगा तटाशी जोडण्याचं मोदींचं स्वप्न पूर्ण होईल.

2.) सरयू नाहार नॅशनल प्रोजेक्ट तारीख ११ डिसेंबर २०२१, मोदींनी सरयू नाहार नॅशनल प्रोजेक्टचे बलरामपूरमध्ये उदघाटन केले. खर्च ९८०० कोटी रुपये (९८ अब्ज रुपये) या प्रोजेक्टमुळे १.४ दशलक्ष हेक्टर पेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल तसेच पूर्व उत्तर    प्रदेशातील ६२०० अधिक गावांमधील २.९ दशलक्ष शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सरयू, राप्ती, बाणगंगा, रोहिणी आणि घागरा या नद्यांना देखील या प्रोजेक्ट अंतर्गत जोडले जाणार आहे.

३.) केन बेटवा नद्यांना आपसात जोडणारा प्रोजेक्ट ०८ डिसेंबर २०२१ केंद्रीय मंत्रिमंडळाने केन बेटवा नद्यांना आपसात जोडणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि निधीही मंजूर केला आहे. खर्च ४४,६०५ कोटी रुपये अंदाजे. येत्या ८ वर्षात हा प्रोजेक्ट सुरु करण्याचे ठरवले आहे.

४.) एम्स गोरखपूर- ०७ डिसेंबर २०२१ एम्सचे उदघाटन अंदाजे खर्च १०११ कोटी रुपये  (१० अब्ज) EPC चे बांधकाम सुरु ८७.१% त्याची सुरुवात प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजने अंतर्गत झाली.

५.)  हिंदुस्थान फर्टीलाझर आणि केमिकल लिमिटेड तारीख ०७ डिसेंबर २०२१ गोरखपूर फर्टिलायझर प्लांट चे उदघाटन खर्च अंदाजे ८६०० कोटी रुपये पूर्ण झाले.

६.) ICMR रिसर्च सेंटर ची नवीन बिल्डिंग गोरखपूर येथे तारीख ०७ डिसेंबर २०२१ मोदींनी नवीन बिल्डिंग चे उदघाटन केले. पूर्ण झाले.

७.) नोएडा आंतरराष्ट्रीय विमान तळ तारीख २५ नोव्हेंबर २०२१ मोदींनी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. खर्च ३०,००० कोटी रुपये (३० अब्ज ) अंदाजे सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार.

८.) अर्जुन सहायक प्रोजेक्ट तारीख १९ नोव्हेंबर २०२१ मोदींनी उत्तरप्रदेश महोबा येथे विविध मोदींनी उत्तरप्रदेश महोबा येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. प्रोजेक्टची मूळ किंमत ८०६.५० करोड रुपये ८.०६ अब्ज २००९ मध्ये ,रेवाईज्ड प्रोजेक्ट कॉस्ट २६५५.३३

कोटी रुपये, २६.५५ अब्ज २५९३.९३ कोटी६१४ दशलक्ष  मार्च २०२१ पर्यंत एकूण २६३२.४१३५ कोटी खर्च प्रोजेक्टची सुरुवात २००९ -१० मध्ये झाली. जून २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती.

९.) रातोली वियर प्रोजेक्ट तारीख १९ नोव्हेंबर २०२१ मोदींनी विविध विकास कामांचे होबामध्ये  लोकार्पण केले.

१०.) भोनी धरण प्रक्लप तारीख १९ नोव्हेंबर २०२१ मोदींनी विविध विकास कामांचे
महोबामध्ये लोकार्पण केले. खर्च २१८.१६ करोड (२.१८ अब्ज) सिंचन सुविधा पुरवण्यासाठी हे धारण सजनम नदीवर बांधायचे ठरले आहे. या कॉन्ट्रॅक्टच्या अंतर्गत सर्वे, तपासणी,डिझाईन धरणाचे दरवाजे कालवे बांधण्याचे ठरले आहे.

११.) माझगाव चिली स्प्रिंकलर प्रोजेक्ट तारीख १९ नोव्हेंबर २०२१ मोदींनी विविध विकास कामांचे महोबा मध्ये  लोकार्पण केले. वरील चार प्रकल्पांची एकूण किंमत ३२५० कोटी पेक्षा जास्त आहे हे प्रकल्प सुरु झाले तर महोबा, हमीरपूर बांदा आणि ललित पूर जिल्ह्यातील सुमारे ६५,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होईल ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल.

१२.) भारत डायनॅमिकस लिमिटेड तारीख १९ नोव्हेंबर २०२१ भारत डायनॅमिकसचे मॅनुफॅक्चरिंग युनिट सुरु करण्यासाठी झाशी डिफेन्स कॉरिडॉर येथे मोदींनी पायाभरणी केलीं. खर्च ४०० करोड रुपये (४ अब्ज ) भारत डायनॅमिकस २०२३ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु होईल. भारत डायनॅमिकस २०२३ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु होईल ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळेल.

१३.) अटल एकता पार्क झाशी तारीख १९ नोव्हेंबर २०२१ झाशीतील गारोठ येथे ६०० मेगावॅटच्या अल्ट्रामेगा पॉवर पार्क ची पायाभरणी केली. खर्च ३००० करोड (३० अब्ज )

१४.) पूर्वांचल एक्सप्रेसवे तारीख १६ नोव्हेंबर २०२१ मोदींनी पूर्वांचल एक्सप्रेसवे चे उदघाटन केले. २२,४९४.६६ कोटी २२४ अब्ज ( जमिनीच्या किमतीसह) पूर्ण अँक्सेस कंट्रोल सहापदरी एक्सप्रेसवेची लांबी ३४०.८२४ किमी आहे सुरुवात चांद साराय गावापासून नॅशनल हायवे ७३१ लखनौ. शेवट नॅशनल हायवे १९ वर हैदरीया गावाजवळ यूपी बिहारच्या बॉर्डरच्या १८ किमी आधी गाझीपूर मध्ये.

१५.) कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ तारीख २० ऑक्टोबर २०२१ मोदींनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन केले. खर्च २६० करोड (२.६ अब्ज )

१६.) राजकीय मेडिकल कॉलेज कुशीनगर तारीख २० ऑक्टोबर २०२१ मोदींनी राजकीय मेडिकल कॉलेज कुशीपूरची पायाभरणी केली. ५०० बेड्सचे आधुनिक हॉस्पिटल शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून १०० विद्यार्थ्यांना MBBS करण्यासाठी प्रवेश देणार.

निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास एक महिना शिल्लक असताना आणखी किती प्रोजेक्ट्स सरकारच्या जादूच्या पिशवीतून बाहेर पडतात याची सर्वानाच उत्सुकता आहे. सय्यद फिरदोस अश्रफ

Related posts

Leave a Comment